AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : आवक सोयाबीनची चर्चा तुरीची, बाजारातील दरानुसार शेतकऱ्यांची भूमिका..!

सध्या बाजार समितीमध्ये खरीप हंगामातील सोयाबीन बरोबरच तुरीची आवक देखील वाढलेली आहे. सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे तर आता तुरीची आवक होण्यास सुरवात झाली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनची आवक वाढली असली तरी शेतकऱ्यांचे लक्ष हे तुरीच्या दरावरच आहे.

Latur Market : आवक सोयाबीनची चर्चा तुरीची, बाजारातील दरानुसार शेतकऱ्यांची भूमिका..!
आठ दिवसानंतर सोयाबीनच्या दरात काहीशी घट झाली आहे.
| Updated on: Feb 03, 2022 | 1:01 PM
Share

लातूर : खरीप हंगामातील सोयाबीन आणि तूर या दोन शेतीमालाच्या बाबतीत (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे वेगळेपण हे मराठवाड्यातच नाही राज्यात आहे. येथील सोयाबीनच्या दरावर इतर बाजारसमित्यांचे दर हे ठरले जातात. सध्या बाजार समितीमध्ये खरीप हंगामातील सोयाबीन बरोबरच (Toor Arrival) तुरीची आवक देखील वाढलेली आहे. सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे तर आता तुरीची आवक होण्यास सुरवात झाली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनची आवक वाढली असली तरी शेतकऱ्यांचे लक्ष हे तुरीच्या दरावरच आहे. कारण सध्या हमीभावाच्या बरोबरीने तुरीला दर मिळत आहे तर दुसरीकडे (Soybean Rate) सोयाबीनचे दर हे घटत आहे. त्यामुळे खरिपातील या दोन शेतीमालाची आवक होत असली तरी अधिकचा फायदा कशामधून आहे यासाठी शेतकरी चाचपणी करताना दिसत आहेत. मात्र, शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांचा सल्लाही तेवढाच महत्वाचा राहणार आहे. कारण उत्पादनात घट झाली असली तरी वाढीव दरातून त्याची कसर शेतकऱ्यांना भरुन काढता येणार आहे.

सोयाबीनची आवक वाढली मात्र, दर स्थिरच

आतापर्यंत सोयाबीनच्या दरावरच मार्केट अवलंबून होते मात्र, तुरीची आवक सुरु झाल्यापासून चित्र बदलले आहे. गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 6 हजाराच्या दरम्यान स्थिरावलेले आहेत. शिवाय आगामी काळात उन्हाळी हंगामातील सोयाबीन बाजारात येण्याची धास्ती शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे आता अंतिम टप्प्यात मिळेल त्या किंमतीमध्ये सोयाबीन विक्रीची तयारी शेतकरी दाखवत आहेत. त्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार दर मिळत असताना दिवसाकाठी 18 ते 19 हजार पोत्यांची आवक ही होत आहे. आता साठवणूकीतले सोयाबीन शेतकरी बाहेर काढत आहेत मात्र, त्या प्रमाणात दर मिळत नाही.

आता तुरीवरच सर्वकाही अवलंबून

खरीप हंगामातील शेवटचे पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. हंगामाच्या सुरवातीलाच या पिकाने दमदार एन्ट्री केली आहे. दोन महिन्यांपूर्वी 5 हजार 600 असलेली तूर आता थेट 6 हजार 200 येऊन पोहचली आहे. शिवाय नाफेडच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या केंद्रावर 6 हजार 300 रुपये दर ठरवून देण्यात आलेला आहे. असे असतानाही शेतकरी हे खुल्याच बाजारात विक्री करीत आहेत. खरेदी केंद्रावरील अटी-नियम हे शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत म्हणून खुल्या बाजारातच अधिकचे व्यवहार होत आहेत. शिवाय मार्केटचा अंदाज घेऊनच तुरीची आवक होत असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी ‘tv9 मराठी’ शी बोलताना सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

स्ट्रॉबेरीचे आता उत्तर भारतामध्येच नव्हे.. योग्य नियोजन केले तर तुम्हीही घेऊ शकता उत्पादन, वाचा सविस्तर

Import of Pulses: कडधान्य उत्पादकांच्या वाटेला निराशाच, केंद्र सरकारच्या निर्णय शेतकऱ्यांच्या हीताचा की नुकसानीचा?

Department of Agriculture : रब्बीत निसर्गाचा लहरीपणा, खरिपात भासणार खताचा तुटवडा, सांगा शेती करायची कशी?

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.