Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारातच हरभऱ्याची विक्री

खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असून आता साठवणूक करुन ठेवलेल्या सोयाबीनची आवक वाढली आहे तर दुसरीकडे हमीभावापेक्षा तुरीला बाजारपेठेत अधिकचा दर मिळत असल्याने तुरीचीदेखील आवक वाढलेली आहे. एकंदरीत जे सबंध हंगामात घडले नाही ते अंतिम होताना पाहवयास मिळत आहे. गेल्या अनेक दिवसानंतर शेतीमालाची आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरु झाली आहे.

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारातच हरभऱ्याची विक्री
बाजार भावापेक्षा हमीभाव केंद्रावर तुरीला अधिकचा दर असल्याने खरेदी केंद्रावर आवक वाढली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 3:11 PM

लातूर : (Kharif Season) खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असून आता साठवणूक करुन ठेवलेल्या सोयाबीनची आवक वाढली आहे तर दुसरीकडे हमीभावापेक्षा तुरीला बाजारपेठेत अधिकचा दर मिळत असल्याने (Toor Arrival) तुरीचीदेखील आवक वाढलेली आहे. एकंदरीत जे सबंध हंगामात घडले नाही ते अंतिम होताना पाहवयास मिळत आहे. गेल्या अनेक दिवसानंतर शेतीमालाची आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरु झाली आहे. (Soybean) सोयाबीन आणि तुरीच्या दरात सुधारणा झाल्याने यांची आवक वाढली असली तरी हरभऱ्याला हमीभावपेक्षा कमी दर असतानाही विक्रमी आवक होत आहे हे विशेष. सध्या राज्यात हरभरा खरेदी केंद्रही सुरु झालेली आहेत मात्र, केंद्रावरील किचकट प्रक्रिया आणि पैशासाठी होणारा विलंब यामुळे नुकसान होत असतानाही शेतकरी खुल्या बाजारातच विक्री करीत आहे. बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 500 ते 4 हजार 600 असा दर मिळत आहे. तर हमीभाव केंद्रावर 5 हजार 230 असा दर ठरवून देण्यात आला आहे.

तूर,हरभऱ्याची खरेदी केंद्र

खरीप हंगामातील तुरीसाठी तर रब्बी हंगामातील हरभऱ्यासाठी नाफेडच्यावतीने राज्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे खऱीप हंगामातील तुरीचे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून सध्या हमीभावापेक्षा बाजारपेठेत तुरीला अधिकचा दर आहे. हंगामाच्या सुरवातीला तुरीला 5 हजार 800 रुपये क्विंटल असा दर होता तर आता 6हजार 400 रुपये दर झाला आहे. हमीभाव केंद्रावर नाफेडच्यावतीने 6 हजार 300 रुपये दर आकारण्यात आला आहे. तर दुसरीकडे हरभऱ्याला हमीभाव केंद्रावर अधिकचा दर असतानाही शेतकरी हे खुल्या बाजारातच विक्री करीत आहेत. मात्र, सध्या बाजारपेठेत शेतीमालाची आवक वाढल्याने रेलचेल सुरु झाली आहे.

सोयाबीन स्थिरावले आवक मात्र कायम

चालू आठवड्यात सोयाबीनचे दर हे 7 हजार 300 वरच स्थिर आहेत. गतआठवड्यात दरात चढ-उतार झाल्याने नेमके काय होणार याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका होती. पण अखेर सोयाबीन स्थिरावले असले तरी शेतकऱ्यांना अजूनही वाढीव दराची अपेक्ष आहे. हंगामाच्या सुरवातीला 4 हजार 800 असलेले सोयाबीन आता 7 हजार 300 वर गेले असतानाही वाढीव दराच्या अपेक्षेने शेतकरी साठवणूकीवरच भर देत आहेत. पण गेल्या 4 दिवसांपासून आवक स्थिर असतनाही 20 हजार पोत्यांची आवक ही सुरु आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : योजनेचा लाभ घ्या अन् कृषीपंपाचे वीजबिल कोरे करा, आता उरले 22 दिवस

पुनर्वसनातील राखीव जमिनीचे सोडा हक्काच्या शेतजमिनीवरही पीक घेणे मुश्किल, नांदेडचे शेतकरी रब्बीला मुकले

उत्पादकता हरभऱ्याची की शेतकऱ्यांच्या नुकसानीची, कृषी विभागाच्या अहवालामुळे शेतकरीही चक्रावले!

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.