AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैठणमध्ये ‘लाल चिखल’, औरंगाबादमध्ये शेतमालाला मातीमोल दर, शेतकऱ्यांची परवड सुरुच

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचं सातत्यानं दिसून येतं. औरंगाबाद येथील बाजारसमितीमध्येही तेच चित्र दिसून आलं आहे.

पैठणमध्ये 'लाल चिखल', औरंगाबादमध्ये शेतमालाला मातीमोल दर,  शेतकऱ्यांची परवड सुरुच
शेतमालाची कमी भावात खरेदी
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 12:26 PM
Share

औरंगाबाद : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचं सातत्यानं दिसून येतं. औरंगाबाद येथील बाजारसमिती आणि मंडईमध्येही तेच चित्र दिसून आलं आहे. शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्यानं औरंगाबादच्या शेतकऱ्यांचे हाल होत असून भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या मालाला मातीमोल भाव मिळत असल्याचं दिसून आलं आहे. शेतमालाचा भाव लावत असताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मालाला कमी दर दिला जातोय. हे औरंगाबादमध्ये घडत असताना पैठणमध्ये एका शेतकऱ्यानं टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं ट्रॉलीभरुन टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिले आहेत.

शेतकऱ्यांची मंदी व्यापाऱ्यांची चांदी

बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या शेतमालाला कवडीमोल दर दिला जातोय. शेतकऱ्यांकडून अतिशय कमी किमतीत खरेदी करून व्यापाऱ्यांकडून भावात विक्री केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळतेय. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्याने क्विंटलहून अधिक मिरच्या रस्त्यावर कमी भाव असल्यामुळं रस्त्यावर फेकून दिल्या होत्या. व्यापाऱ्यांकडून लिलावात लावल्या जाणाऱ्या बोली मधून शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांची मंदी व्यापाऱ्यांची चांदी, अशी भावना काही शेतकरी व्यक्त करत आहेत.

पैठणमध्ये लाल चिखल

पैठणमध्ये भाव नसल्याने शेतकर्‍यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगाव इथं ही घटना घडली. गणेश अजिनाथ थोरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. योग्य भाव न मिळाल्याने घेतलेले पीक रस्त्यावर फेकून देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली. या शेतकर्‍यांनी ट्रकभर टॉमेटो रस्त्यावर फेकले. त्या ठिकाणावर जनावरे चरताना दिसत आहेत.

शेतकऱ्यांना हमीभावाची हमी यासाठी हवी

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही.पर्यायानं शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. किमान आधारभूत किंमत शेतमालाला दिली जात असली तरी शेतमालाच्या किमती स्थिर राहाव्यात आणि शेतकऱ्यांना कष्टाचं योग्य फळ मिळावं यासाठी शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीचा कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

इतर बातम्या:

VIDEO : अमित ठाकरेंचे अप्रतिम पास, उत्कृष्ट गोल, फुटबॉलच्या मैदानात भन्नाट कौशल्य

VIDEO : धावत जाऊन रिक्षात चढला, जाता जाता तरुणीला किस, भररस्त्यातील प्रकार

Aurangabd farmers are unhappy due to low rates of vegetables in Apmc market

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.