AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कालव्याच्या पाण्यामुळं 22 एकरातील धानाचं नुकसानं, शेतकऱ्यांकडून ठेकेदाराकडे नुकसानभरपाईची मागणी

भंडारा जिल्हाच्या लाखनी तालुक्यातील विविध भागात मागील अनेक वर्षांपासून कालव्याचं बांधकाम हे कासव गतीने सुरू आहे. या कामाचं कंत्राट असणाऱ्या कंपनीकडून अचानक पाणी सोडण्यात आल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

कालव्याच्या पाण्यामुळं  22 एकरातील धानाचं नुकसानं, शेतकऱ्यांकडून ठेकेदाराकडे नुकसानभरपाईची मागणी
22 एकर धान शेतीचं नुकसान
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 2:28 PM
Share

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : भंडारा जिल्हाच्या लाखनी तालुक्यातील विविध भागात मागील अनेक वर्षांपासून कालव्याचं बांधकाम हे कासव गतीने सुरू आहे. या कामाचं कंत्राट असणाऱ्या कंपनीकडून अचानक पाणी सोडण्यात आल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. 22 एकरावरील धानाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे यामुळं धान उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या कंत्राटदाराकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केली असता मदतीचं आश्वासन दिलं आहे. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

हाता तोंडाशी आलेलं धान हातचं गेलं

लाखनी तालुक्यातील कोलारा, मुरमाडी तूप येथे बांधकाम सुरू करण्यासाठी कालव्यात पाणी सोडण्यात आले. बांधकाम सुरू करण्यासाठी पाणी सोडण्यात आल्यानं आल्याने कोलारा व परिसरातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धानपीक गेलं आहे. पाणी शेतात आल्याने धानपीक कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या धानातही पाणी साचले आहे.जवळपास 22 एकर क्षेत्रातील धानपिकला या पाण्याचा फटका बसला आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांचंही नुकसान

अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतातील धान जलमय झाले आहे. 22 एकरावरील धानाचं नुकसान झाल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांनी या संदर्भात संबंधित कंत्राटदाराला जाब विचारला असता त्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना जे नुकसान झाले आहे. त्यांची आम्ही नुकसान भरपाई करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी एकरी पंधरा क्विंटल प्रमाणं नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केलीय. नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय काम सुरु करु देणार नसल्याचं गुणवंत बावनकुळे या शेतकऱ्यानं सांगितलं. शेतकऱ्यांना धान उचलण्यासाठी लागणारा खर्च नुकसानभरपाई म्हणून द्यायला तयार असल्याचं कंत्राटदार योगेश ब्राम्हणकर यांनी सांगितलं आहे.

हिंगोलीत वातावरणीय बदलाचा रब्बीच्या पिकांना फटका

हिंगोलीत मागील दोन दिवसापासून आकाशात ढग दादूत येत आहेत. त्यामुळं याचा रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसतांना दिसतोय, हिंगोलीत हरभरा पिकांवर मर नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव होतांना दिसत आहे. तर तुरीच्या फुलांची मोठी गळती होत असल्याने तुरीच्या पिकांना देखील फटका बसताना दिसत आहे.

इतर बातम्या:

NAS 2021 : नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण यशस्वी, 96 टक्के शाळा तर 92 टक्के विद्यार्थी सहभागी

NTA UGC NET 2021: नेट परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 20 नोव्हेंबरपासून परीक्षेला सुरुवात

Bhandara water of canal lodge in 22 acer farm farmers demanded compensation form contractor

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.