मोदी सरकारचे शेतकऱ्यांना ‘गिफ्ट’ शेतकऱ्यांची हीताची मोठी घोषणा

देशातील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचे (Kisan Credit Card) वाटप होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज ही घोषणा केली आहे. पँडेमिक काळातही सर्व शेतकऱ्यांना केसीसी उपलब्ध करण्यात आले होते. याकरिता गेल्या वर्षीपासूनच सरकार किसान क्रेडीट कार्डमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवून घेत आहे.

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना 'गिफ्ट' शेतकऱ्यांची हीताची मोठी घोषणा
संग्रहीत छायाचित्र

मुबंई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशीच केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या हीताची ही घोषणा असून प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ हा होणार आहे. गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारचा कृषी विभार ज्या मोहिमेवर काम आहे उपक्रम आता पुर्णत्वास आला आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचे (Kisan Credit Card) वाटप होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज ही घोषणा केली आहे. पँडेमिक काळातही सर्व शेतकऱ्यांना केसीसी उपलब्ध करण्यात आले होते. याकरिता गेल्या वर्षीपासूनच सरकार किसान क्रेडीट कार्डमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवून घेत आहे. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, केंद्रीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे आणि यामध्ये पैशांची कमतरता भासू नये हा उद्देश आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ योग्य त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना व्यवसयाकरिता स्वस्तामधे कर्ज उपलब्ध

आता केसीसी फक्त शेतीपुरते मर्यादित नाही. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना देखील या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे सरकार शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. कर्जावरील व्याज 9 टक्के असले तरी सरकारकडून 2% सबसिडी मिळते. यामुळे कर्जावर फक्त 7 टक्के व्याज शेतकऱ्याला भरावे लागते.

कोणाला मिळणार केसीसीचा लाभ

शेती, मत्स्यपालन आणि पशुपालन करणारी कोणतीही व्यक्ती, जरी ती दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल तरीही याचा लाभ घेऊ शकते. याचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे पाहिजे. जर शेतकऱ्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर सह-अर्जदार देखील आवश्यक असेल, ज्यांचे वय 60 पेक्षा कमी आहे. शेतकऱ्याने फॉर्म भरल्यानंतर बँक कर्मचारी तो या योजनेस पात्र आहे की नाही हे तपासून सांगतील.

कशाप्रकारे मिळवाल KCC?

KCC मिळवण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत साईटवर जावे लागणार आहे. येथून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करा. तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जमिनीची कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा लागेल. येथे तुम्हाला सांगावे लागेल की तुम्ही इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर कोणतेही किसान क्रेडिट कार्ड बनवले नाही. यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

यासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. तर अॅड्रेस प्रूफ म्हणून देखील मतदान कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे.

इतर बातम्या :

होय..! लातुरच्या डोंगराळ भागात काजूची बाग, अर्ध्या एकरात लाखोंचे उत्पन्न

Video : भाजपनगरसेवकानं विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडलं! नेमकं कारण काय?

महत्वाची बातमी! मुंबईत गणपती विसर्जन करण्याचा प्लॅन करताय? 20 पेक्षा जास्त नियम लक्षात ठेवा, बीएमसीकडून जारी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI