AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : भाजप नगरसेवकानं विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडलं! नेमकं कारण काय?

भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला. विद्युत विभागाला अनेक वेळा पत्रव्यवहार करुनही अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं भाजप नगरसेवक मुकेश शहाणे संतप्त झाले होते.

Video : भाजप नगरसेवकानं विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडलं! नेमकं कारण काय?
नाशिकमघ्ये भाजप नगरसेवकाचं आंदोलन
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 6:05 PM
Share

नाशिक : विद्युत विभागाच्या कारभाराला कंटाळलेल्या ग्राहकांनी अनेकदा अनेक प्रकारे निषेध नोंदवल्याचं आपण पाहिलं आहे. राजकीय पक्षांनीही अनेकदा आंदोलनं करुन विद्युत विभागाबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. असाच एक प्रकार नाशिकमध्ये पाहायला मिळाला. भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला. विद्युत विभागाला अनेक वेळा पत्रव्यवहार करुनही अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं भाजप नगरसेवक मुकेश शहाणे संतप्त झाले होते. (Mukesh Shahane slammed the power department official in Nashik)

भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला. अधिकारी दिलेल्या पत्राला उत्तरं देत नाहीत. विद्युत विभागाला अनेक वेळा पत्रव्यवहार करुनही अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं मुकेश शहाणे संतप्त झाले. त्यामुळे त्यांनी महापालिकेतील विद्युत विभागाला लॉक लावून कोंडलं. अधिकारी दिलेल्या पत्राला उत्तर देत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणार असल्याचा पवित्रा मुकेश शहाणे यांनी घेतलाय. विद्युत कर्मचारी अभियंता नाशिक रोड इथल्या विद्युत संबंधीचा ठेका चुकीच्या पद्धतीने दिलेल्या आरोप मुकेश शहाणे यांनी केलाय. धर्माधिकारी, वनमाळी आणि विद्युत विभागाचे कर्मचारी यात सहभागी असल्याचा आरोप शहाणे यांनी केलाय.

भाजप कार्यकर्त्यांचा पिंपळगाव टोल नाक्यावर राडा

जिल्हातील रस्ते एकीकडे खड्ड्यात गेलेले पाहायला मिळतात. अशावेळी दुसरीकडे नाशिकच्या पिंपळगाव टोल नाक्यावर चक्क केंद्र सरकारच्या डोळ्यात धूळफेक करत टोल वसूल केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावर राडा केल्यानंतर NHAI च्या अधिकाऱ्यांनी देखील गेल्या 4 महिन्यांपासून तांत्रिक अडचण असल्याचं मान्य केलं आहे. टोल प्रशासनाने या घोटाळ्याची कबुली दिली असून, परस्पर सॉफ्टवेअरमध्ये बदल करत पैशांची लूट केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

स्वत:च्या सॉफ्टवेअरचा वापर

नाशिकच्या पिंपळगाव टोल नाक्यावर भाजप कार्यकर्त्यांनी धाड टाकत हा प्रकार उघडकीस आणला आहे. टोल नाक्यावरच्या बरोबर दोन लेन मध्येच कॅश स्वीकारली जात असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप होता. शिवाय केंद्र सरकारने दिलेल्या सॉफ्टवेअर व्यतिरिक्त कंपनी स्वतःचे सॉफ्टवेअर वापरून टोल वसूल करत असल्याचा आरोपही करण्यात येत होता. याबाबत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी थेट दोन पावत्याच दाखवल्या आहेत. गेल्या अनेक दिवसंपासून या दोन लेनमधून जाणाऱ्या गाड्यांचा टोल तर जमा होतो. मात्र, केंद्राच्या सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंदच होत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. धक्कादायक बाब म्हणजे टोल नाक्यावर पॅरेलल यंत्रणा काम करत असल्याचा संशय असल्याचं आपण 4 महिन्यांपूर्वीच वरिष्ठांना कळवल्याची सारवासारव NHAI च्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

इतर बातम्या : 

अनंत चतुर्दशीला पुणे बंद! फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, अजित पवारांकडून स्पष्ट

पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणण्यास विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड, भाजपचं टीकास्त्र

Mukesh Shahane slammed the power department official in Nashik

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.