AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठीचा ‘ब्लॅक डायमंड’, हार्टपेशंटसाठीही उत्तम, पोल्ट्रीतून होते बक्कळ कमाई, कोणती ही कोंबडी ?

तुम्ही कडकनाथ कोंबडीचे नाव एकले आहे का? जर असेल तर हृदयरोग्यासाठी पोषक असलेल्या या कडकनाथ कोंबडीचा उगम नेमका कोठे झाला? याची माहिती तुम्हाला आहे का? चला, शेतकऱ्यांसाठी 'ब्लॅक डायमंड' असलेल्या या कोंबडीबद्दल अधिक माहिती..वाचूयात..

शेतकऱ्यांसाठीचा 'ब्लॅक डायमंड', हार्टपेशंटसाठीही उत्तम, पोल्ट्रीतून होते बक्कळ कमाई, कोणती ही कोंबडी ?
kadaknath chicken
| Updated on: Jun 08, 2026 | 6:23 PM
Share

तुम्ही जर नॉन-व्हेजचे शौकीन वा चिकन प्रेमी असाल तर चिकन खाताना तुम्ही गावडी कोंबडीला प्राधान्य देत असाल. मात्र, बाजारात ब्रॉयलर कोंबडी स्वस्त असल्याने जास्त विकली जाते. मात्र एका कोंबडीला भारतीय पोल्ट्री बाजारात ब्लॅक डायमंड म्हटले जाते. आपण चर्चा करत आहोत एका खास चिकनच्या जातीची. या कोंबडीचे नाव कडकनाथ कोंबडी असे आहे. कोंबडीचे नाव कडकनाथ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. मात्र, या कोंबडीचे मांस, त्वचा आणि एवढेच काय तर तिची हाडेही काळे असतात मात्र हेच या कोंबडीचा युएसपी आहे. देशभरातील चिकन प्रेमीमध्ये दिवसेंदिवस कडकनाथ कोंबडीला मोठी मागणी आहे. तुम्हाला माहिती आहे का या कोंबड्यांची उत्पत्ती कोठे झाली ?

कडकनाथ कोंबडी नेमकी कुठली ?

कडकनाथ कोंबडी या अत्यंत पौष्टीक असलेल्या कोंबडीच्या जातीची पैदास मुख्य रुपाने मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्ह्यात झाली आहे. या जिल्ह्यातील आदीवासी भागात शेकडो वर्षांपासून या जातीच्या कोंबड्यांची पैदास केली जात आहे. स्थानिय भिल्ल आणि भिलाला जमातीच्या जीवनात आणि संस्कृतीत कडकनाथ कोंबडीचे महत्व आहे. स्थानिक लोक या कोंबडीला ‘काली मासी’ म्हणून प्रेमाने बोलवतात. याचा अर्थच या कोंबडीचे मांस काळे असते. हीच्या शरीर आणि मांसाचा रंग दाट काळा असतो. या कोंबडीच्या शरीरात ‘मेलेनिन’ नावाचे या नैसर्गिक तत्व जास्त असल्याने ही कोंबडी जगातील इतर कोंबड्यांपेक्षा खूपच वेगळी दिसते.

तीन वेगळ्या जाती आणि भौगोलिक ओळख

दिसायला ही कोंबडी केवळ काळ्या रंगाची असली तरी कडकनाथच्या देखील येथे तीन वेग-वेगळ्या जाती आहेत. यातील पहिल्या संपूर्ण काळ्या रंगाची, दुसरी सोनेरी आणि तिसरी पेन्सिली सारखा रंग असतो. या तीन जातीतील फरक त्यांच्या पंखाची बनावट आणि बाहेरील रंग-रुपाने दिसते. मात्र, तिन्हींच्या औषधी गुण आणि चवीत कोणताही फरक नसतो. कडकनाथ कोंबडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये खूप कडक आरोग्य क्षमतेच्या असतात आणि कोणत्याही मोसमात वा कठीण परिस्थितीत त्या सहज जगतात. याची विशेषत: आणि झाबुआ क्षेत्रातील या अनमोल वारशाचे संवर्धन करण्यासाठी या कडकनाथ कोंबडीच्या मांसाला भारत सरकारने ३० जुलै २०१८ रोजी जीआय टॅगची खास मान्यता दिली आहे. झाबुआ प्रशासनाने या कोंबडीला एक जिल्हा एक उत्पादन योजनेत समाविष्ठ केले आहे.

आरोग्यासाठी पोषक

कडकनाथ केवळ चवीच्या बाबती अव्वल नाही, तर आरोग्यासाठी अमुल्य खजाना आहे. सर्वसाधारण चिकनच्या तुलनेत या कोंबडीच्या मांसात प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. यात फॅट म्हणजे चरबी अजिबात नसल्याने त्यात लो-कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे डॉक्टर देखील हृदयाच्या रुग्णांना, हायब्लडप्रेशर आणि डायबिटीजने पीडित लोक यांच्या सेवनाचा सल्ला देतात.

शेतकऱ्यांना फायदेशीर

शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील कडकनाथ मदत करते. आरोग्यासाठी पोषक असल्याने या कोंबडीचा दर सर्वसाधारण कोंबडीपेक्षा अनेक पटीने जास्त असतो. कडकनाथ कोंबडीची वाढती मागणी आणि वाढते दर पाहून देशभरातील शेतकरी हीचे पालन करु लागले आहेत. ग्रामीण भागात पोल्ट्री फार्मिंगद्वारे शेतकरी बंपर नफा कमवत आहेत. कडकनाथ कोंबडीची किंमत ४०० ते ८०० प्रति किलोग्रॅम पासून १००० रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत असते.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...