AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘केंद्रीय पथकाकडून शेतकऱ्यांना 10 मिनिटांची भेट, ना व्यथा ऐकायला वेळ, ना आधार द्यायला’

ऑगस्टमधील पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याची दुसऱ्यांदा पाहणी करण्यासाठी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांची केवळ 10 मिनिटं भेट घेतली.

'केंद्रीय पथकाकडून शेतकऱ्यांना 10 मिनिटांची भेट, ना व्यथा ऐकायला वेळ, ना आधार द्यायला'
| Updated on: Dec 24, 2020 | 8:54 PM
Share

गडचिरोली : ऑगस्टमधील पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याची दुसऱ्यांदा पाहणी करण्यासाठी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांची केवळ 10 मिनिटं भेट घेतली. यावेळी ना मोबदला मिळाला ना, पथकाने व्यथा ऐकल्या. प्रश्न उपस्थित केल्यावर पथकाकडून नवे नियम सांगत काढता पाय घेण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. गडचिरोली पाहणीत वडसा तालुक्यातील सावंगी, कोंढाळा या गावांमध्ये तर आरमोरी तालुक्यातील देऊळगाव या गावात पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली (Central Government committee visit Farmer of Gadchiroli for only 10 minutes).

यावेळी पथकातील सदस्यांनी पूरपरिस्थितीनंतर शासनाकडून मदत मिळाली का? नुकसान झालेल्या क्षेत्रात आता काय आहे? किती उत्पन्न मिळाले? याबाबत त्यांनी चौकशी केली. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला मिळालाच नाही. शेतकऱ्यांनी मोबदल्याविषयी प्रश्न उपस्थित केल्यानंतर नवीन नियम सांगून केंद्रीय पथकाने तेथून काढता पाय घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

पुराने बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकात सहसचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि पथक प्रमुख रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर. बी. कौल उपस्थित होते. सोबत विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम आणि तहसिलदार देसाईगंज आणि आरमोरी यावेळी उपस्थित होते. यानंतर त्यांनी जिल्हास्तरावर संबंधित विभागाच्या प्रमुखांशी चर्चा केली.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला मिळालाच नाही. शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केल्यास नवीन नियम सांगून केंद्रीय पथक निघून गेलं. केंद्रीय पथकाने प्रश्न विचारल्यानंतर त्याला नियम सांगत उत्तर दिलं, पण आमच्या मदतीबद्दल काहीही सांगितलं नाही. अनेक शेतकरी सकाळपासून या पथकाची वाट बघत होते. हे पथक आपल्या व्यथा आणि अडचणी समजून घेऊन मदत मिळवून देईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, हे पथक केवळ 10 मिनिटाची भेट घेत निघून गेले. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथाही ऐकल्या नाहीत, असाही आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

राज्य शासनाकडून काय मदत झाली?

जिल्ह्यात पुरामुळे 4 तालुक्यांमधील एकूण 219 गावं प्रभावित झाली होती. यातील 24 हजार 676 शेतकऱ्यांचे 18 हजार 263 हेक्टर धान, 3 हजार 929 कापूस असे एकूण 22 हजार 193 हेक्टर शेतीचं नुकसान झालं होतं. या सर्व क्षेत्राचे पंचनामे करून शासनाकडून 237 कोटी रूपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यातील 99.49 टक्के निधी वितरीतही करण्यात आला आहे. तसेच 48 तासांपेक्षा जास्त काळ पूराच्या पाण्यात घर असलेल्या 645 कुटुंबांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रूपयांप्रमाणे 64.6 लाख रूपये वाटप करण्यात आले होते.

दुर्दैवाने गडचिरोलीत पुरामुळे 1 मृत्यू झाला होता. मृताच्या कुटुंबीयांना 4 लाख रूपयांची मदत देण्यात आली. काही ठिकाणी जनावरे इतर पशू दगावले. त्यासाठी 54 हजार मदत दिली गेली. घरांमध्ये पूर्ण नूकसान झालेली 6 घरे, काही प्रमाणात नूकसान झालेली 72 घरे आणि पूर्ण नूकसान झालेल्या 10 गोठ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने या सर्व नुकसानाची 9.73 लाख रुपये भरपाई दिली. केंद्रीय पथकाने या मदतीचाही आढावा घेतला.

संबंधित बातम्या :

रडू नका, खचून जाऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत; मुख्यमंत्र्यांनी दिला शेतकऱ्यांना धीर

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

‘माझे लेकरु मला परत द्या’ आईच्या हंबरड्यानंतर प्रवीण दरेकरांनाही अश्रू अनावर

Central Government committee visit Farmer of Gadchiroli for only 10 minutes

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.