AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chemical Fertilizer : सरकारच्या एका निर्णयात खरीप-रब्बीचा प्रश्न मिटणार, साठेदरांवर मात्र अतिरिक्त बोजा

दरवर्षी खरीप हंगामात खताची टंचाई ही भासतेच. खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे ही परस्थिती ओढावत आहे. हे कमी म्हणून की काय यंदा रशिया-युक्रेन युध्दाचाही परिणाम यंदा झालेला आहे. त्यामुळे हे संकट अधिक तीव्र होणार अशीच काहीशी परस्थिती निर्माण झाली होती. पण या प्रतिकूल परस्थितीमध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यंदा युरिया आणि डीएपी खताचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारने 2 लाख टन खताचा बंफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.

Chemical Fertilizer : सरकारच्या एका निर्णयात खरीप-रब्बीचा प्रश्न मिटणार, साठेदरांवर मात्र अतिरिक्त बोजा
रासायनिक खत
| Updated on: Apr 02, 2022 | 4:37 PM
Share

पुणे : दरवर्षी (Kharif Season) खरीप हंगामात खताची टंचाई ही भासतेच. खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे ही परस्थिती ओढावत आहे. हे कमी म्हणून की काय यंदा रशिया-युक्रेन युध्दाचाही परिणाम यंदा झालेला आहे. त्यामुळे (Chemical Fertilizer) रासायनिक खताचे हे संकट अधिक तीव्र होणार अशीच काहीशी परस्थिती निर्माण झाली होती. पण या प्रतिकूल परस्थितीमध्ये (Central Government) केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यंदा युरिया आणि डीएपी खताचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारने 2 लाख टन खताचा बंफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खरिपासाठी 1 लाख टन तर रब्बीसाठी 50 हजार टन युरियाचा स्टॉक करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे केवळ शेतकऱ्यांना दिलासाच नव्हे तर वाढत्या दरावरही अंकूश येईल असा आशावाद आहे.

यामुळे दरवर्षी खतांची टंचाई

देशात 80 खताची आयात करावी लागते. यातच खतासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली शिवाय युध्दजन्य परस्थितीमुळे रशियातून होणारी आयात मार्च महिन्यापर्यंत तर बंद होती. ही नव्याने समोर आलेली कारणे असले तरी दरवर्षी पाऊस, अतिवृष्टी, कमी पुरवठा, खतांचे कारखाने बंद यामुळे खतांचा तुटवडा भासतो. याचा परिणाम थेट उत्पादनावर होत आहे. रब्बी पेक्षा खरीप हंगामात डीएपीला अधिकची मागणी असते. यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमुळे केंद्र सरकारने बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साठा करण्यासाठी अशी असणार प्रक्रिया

बफर स्टॉक करण्यासाठी नोडल संस्थांना अगाऊ रक्कम भरावी लागणार आहे. यंदा जितका बफर स्टॉक तेवढी रक्कम अदा करावी लागणार आहे. यामध्ये युरियासाठी प्रतिटन 5 हजार 500 रुपये तर डीएपीसाठी प्रतिटन 24 हजार रुपये भरावे लागणार आहेत. एवढेच नाही तर गोदामभाडे आणि अन्य शुल्क यासाठी खरिपाच्या युरियासाठी 1 हजार 238 तर रब्बीसाठी 1 हजार 122 तर डीएपीसाठी 2 हजार 30 रुपये हे साठवणूकदारांना भरावे लागणार आहेत.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

खरीप हंगामात आवश्यक असलेल्या खतांचा पुरवठाच योग्य वेळी आणि आवश्यक तेवढा होत नसल्याने उत्पादनात घट हे लक्षात आलेले आहे. असे असतानाही देशामध्ये मागणीनुसार खताची निर्मिती होत नाही. हीच बाब सरकारच्या निदर्शनास आल्याने मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर कृषी आयुक्तांच्या नियोजनानुसार जिल्हा निहाय आणि नोडल संस्थानिहाय खतांच्या साठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. गावामध्ये खते उपलब्ध करुन देण्यासाठी गोदामांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. एवढे करुनही यंदा अधिकच्या दरानेच खत खरेदी करावे लागणार आहे हे नक्की..

संबंधित बातम्या :

Lemon : हंगामी पिकेच शेतकऱ्यांना यंदा तारणार, कलिंगडपाठोपाठ लिंबाला ‘सोन्या’चा भाव

उशिराचे शहाणपण : सुर्यफूलाचे क्षेत्र वाढवण्यासाठी Central Government चा पुढाकार, रशिया-युक्रेन युध्दामुळे वास्तव समोर

Photo Gallery : पालांवरचा पाडवा, ऊसाच्या फडात गुढी अन् ऊसतोड मजुरांचा उत्साह गगणाला भिडणारा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.