सोयाबीनवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांवर मोठं संकट

सोयाबीनवर उटं अळी आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी अडचणी सापडले आहेत. कीड-नियंत्रणासाठी प्रयत्न करुन देखील शेतकऱ्यांना प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आल्यानं ते मेटाकुटीला आले आहेत.

सोयाबीनवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांवर मोठं संकट
सोयाबीन
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 12:18 PM

चंद्रपूर : राज्यात यंदाचा मान्सून अनियमित असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरं जावं लागले. अनेक शेतकऱ्यांना पीक जगवण्यासाठी जीवाचं रान करावं लागलं. आता चंद्रूपर जिल्ह्यातील शेतकऱ्यासंमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. सोयाबीनवर उटं अळी आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी अडचणी सापडले आहेत. कीड-नियंत्रणासाठी प्रयत्न करुन देखील शेतकऱ्यांना प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आल्यानं ते मेटाकुटीला आले आहेत.

उंट अळी- लष्करी अळीच्या प्रकोपानं शेतकरी हवालिल

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील सोयाबीन शेतकरी संकटात सापडले आहेत. सोयाबीन पिकावरील उंट अळी-लष्करी अळीच्या प्रकोपाने शेतकरी हवालदील झाले आहेत. चंद्रपूरमध्ये तब्बल 10 वर्षांपूर्वी याच भागात अळी संकटाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. यावर्षीचा मान्सूनचा पाऊसकाळ अनियमित असल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. सोयाबीन 335 वाणावर अळीचा जोरदार प्रादुर्भाव दिसून आला आहे. सध्या नंदोरी परिसरातील 10 गावांमध्ये अळीचा प्रकोप दिसून आला आहे. शेतकऱ्यांनी विविध उपाय करूनही कीड नियंत्रण असफल झालं आहे. शेतकऱ्यांसमोर यामुळे मोठं संकट ओढावलं आहे.

भद्रावती तालुक्यात सर्वाधिक प्रभाव

चंद्रपूर जिल्ह्यात उभ्या शेतपिकांवर,लष्करी अळी, उंट अळी, किटक आणि ईतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. भद्रावती तालुक्यात याचा सर्वाधिक प्रभाव दिसतो आहे. 10 वर्षापूर्वी भद्रावती आणि वरोरा तालुक्यात लष्करी अळीने थैमान घातले होते.या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे सोयाबिनचे उभे पीक पूर्णतः उद्धवस्त झाले होते. त्याची पुनरावृत्ती यंदाही दिसून येत आहे. भद्रावती तालुक्यातील वाघेडा, जेना, पिल, धानोली, धामणी, नंदोरी आणि टाकळी या गावातील हजारो हेक्टर सोयाबीनच्या पिकांवर ही लष्करी अळी आढळून आली आहेत.

लष्करी अळीचा प्रादुर्भाव भयानक

लष्करी अळीचा प्रादुर्भाव भयानक आहे. एका रात्रीतून शेकडो हेक्टर उभे पीक ही अळी नष्ट करते. सध्या पानांची चाळणी झाली असून शेंगाही गळून पडल्या आहेत. त्यामुळे या अळीचा 10 वर्षांपूर्वीचा प्रादुर्भाव पाहता शेतकरी वर्गात चिंतेचे सावट निर्माण झाले आहेत. सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं मोठं नुकसान होण्याची भीती गोपाल काकडे आणि रतनदीप कुथे या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपचं आंदोलन

चंद्रपूरच्या मुख्य बस स्थानकाच्या अपूर्ण बांधकामाविरोधात भाजपने आज जोरदार आंदोलन केले. सामान्य चंद्रपूरकरांची ही महत्वाची सुविधा असल्याने भाजपने सरकारला जागे करण्यासाठी ढोल वाजवा आंदोलन केले. अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक वापराच्या ठिकाणी नवे बांधकाम कोरोना प्रारंभ काळापासून अपूर्णावस्थेत आहे. या बांधकामासाठी लागणारा निधी राज्य सरकारने अद्याप वळता झालेला नाही. राज्य सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजपने हे ढोल वाजवा आंदोलन केले. भाजपने या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला बांधकाम पूर्ण करण्याचा इशारा दिला.

इतर बातम्या:

झेंडूचं फूल तोडल्यानं मारहाण, पपईची बाग कापून बदला, नंदुरबार पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

भंडारा जिल्ह्यातील कृषी पंपधारकांची वीज कापली; धानाला पाणी कसं द्यायचं, शेतकऱ्यांसमोर प्रश्न

Chandrapur Soybean crop loss due to worn farmers facing problems

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.