AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chicken Price Hike: आता चिकनही महागलं, किती दर वाढले? ग्रामीण भागात मोठी मागणी

कोरोना काळात वैद्यकीय तज्ञांनी मांसाहार करण्याचा सल्ला दिल्याने ग्रामीण भागात चिकनला प्रचंड मागणी वाढली आहे. चिकनच्या दरामध्ये 30 टक्क्यांएवढी वाढ झाली आहे

Chicken Price Hike: आता चिकनही महागलं, किती दर वाढले? ग्रामीण भागात मोठी मागणी
चिकन
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 6:48 PM
Share

पुणे: वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेला आता चिकनसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. कारण, आता ग्रामीण भागात चिकनचे दर वाढले आहेत. कोरोना काळात मागणी जास्त असल्याने दर वाढले, असल्याचं पोल्ट्री व्यवसायिकांचं म्हणनं आहे. तर भाववाढ योग्यच असल्याचं महाराष्ट्र पोल्ट्री असोसिएशन सदस्यांनी म्हटलं आहे. शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी डॉक्टरांनी चिकन, अंडी खाण्याचा सल्ला दिल्यानं दोन्हींचा दर वाढला आहे.

चिकन 240 रुपयांपर्यंत

कोरोना काळात वैद्यकीय तज्ञांनी मांसाहार करण्याचा सल्ला दिल्याने ग्रामीण भागात चिकनला प्रचंड मागणी वाढली आहे. चिकनच्या दरामध्ये 30 टक्क्यांएवढी वाढ झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी 180 ते 200 रुपये किलो असणारे चिकन आज 240 रुपये किलो झाले आहे.

दरवाढ योग्य

चिकनचा दर 240 रुपयांपर्यंत गेले असताना पोल्ट्री व्यवसायिकांनी त्याचं स्वागत केलं आहे. ही दरवाढ योग्यच असून असाच बाजार भाव राहिला तरच पोल्ट्री व्यवसाय टिकेल. अन्यथा हा व्यवसाय अडचणीत येईल असे मत महाराष्ट्र पोल्ट्री असोसिएशन सदस्यांचे आहे.

गेल्यावर्षी खूप संकट

मागील वर्षी बर्डफ्ल्यू व कोरोना काळात चुकीच्या गैरसमजुतीमुळे कुक्कुटपालन व्यवसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. मात्र, जनजागृती झाल्यानंतर व तज्ज्ञांनी चिकन व अंडी खाण्याचा सल्ला दिल्याने नागरिकांकडून चिकनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महाराष्ट्र पोल्ट्री असोसिएशनचे सदस्य भानुदास देशमुख यांच्या नुसार ही वाढ योग्य आहे. पोल्ट्री व्यावसायिकानी मोठे नुकसान सहन केलं आहे. आता अनेक कच्च्या मालाचे बाजारभाव वाढले आहेत. त्यामुळे ही वाढ जास्त नसून सध्याचा बाजारभाव योग्य असून असाच बाजारभाव भविष्यात राहिला तर पोल्ट्री व्यवसाय अडचणीतून बाहेर निघतील, असं भानुदास देशमुख म्हणाले. चिकनचे दर कोसळल्यास पोल्ट्री व्यवसाय बंद पडतील, असे मत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.

चिकनच्या किंमती का वाढत आहेत?

पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन विक्रेत्यांच्या माहितीनुसार कोंबडी खाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची किंमत गेल्या महिन्यात 30 ते 40 रुपयांवर होती. ती आथा 60 रुपयांच्या वर गेली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला हाय प्रोटीन सोया मील 52 रुपयांना विकलं जातं होते ते आता 67 रुपयांना विकलं जातं आहे. या कारणामुळे चिकनच्या किमती वाढल्या आहेत. लॉकडाऊनमुळं पशुखाद्य पुरवणाऱ्यांचं गेल्या आर्थिक वर्षात 26 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. उत्तर भारतात बाजारात चिकन170 ते 180 रुपये किलोंना विकलं जात आहे. होळीच्या दिवसांमध्ये चिकन 200 ते 220 रुपये किलो प्रमाणं विकलं जात होतं.

इतर बातम्या

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर टेम्पोवर ट्रक धडकला, 100 कोंबड्या दगावल्याचा दावा

VIDEO: “चिकन खाल्याशिवाय इथून जाणार नाही”, सांगलीत डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रूग्णाचा अनोखा हट्ट

Chicken Price Hike Maharashtra Poultry owners association member Bhanudas Deshmukh said hike is important for us

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.