AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पांढऱ्या सोन्या’च्या खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी खानदेशात

सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी धुळे, पाचोडा, चोपडा, जामनेर येथील शेतकऱ्यांना कापसाचा आधार मिळालेला आहे. येथील खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटलला 8250 चा दर मिळत आहे. मात्र, वातावरणात बदल होत असल्याने कापूस अधिकचा वेळ झाडाला न ठेवता त्याची वेळेत वेचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

'पांढऱ्या सोन्या'च्या खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी खानदेशात
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 11:35 AM
Share

जळगाव : ज्याप्रमाणे सोयाबीनच्या दरामध्ये घट होत आहे अगदी त्याच्या उलट कापसाच्या दरात वाढ होत आहे. हे दोन्हीही खरीपातील पिके उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. मात्र, सोयाबीन हे (Marathwada) मराठवाड्यात अधिकच्या क्षेत्रावर तर कापूसाचे उत्पादन खानदेशात जास्त प्रमाणात घेतले जाते. यंदा पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले तर आता (Record rate of cotton) कापसाला विक्रमी दर मिळत आहे. खानदेशातील पांढरे सोने घेण्यासाठी चक्क परराज्यातील व्यापारी दाखल होत आहेत. त्यामुळे सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी धुळे, पाचोडा, चोपडा, जामनेर येथील शेतकऱ्यांना कापसाचा आधार मिळालेला आहे. येथील खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटलला 8250 चा दर मिळत आहे. मात्र, वातावरणात बदल होत असल्याने कापूस अधिकचा वेळ झाडाला न ठेवता त्याची वेळेत वेचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जिनिंग प्रक्रिया उद्योग सुरु झाल्याने कापूस खरेदीचा वेग वाढलेला आहे. शिवाय कापसाला दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खरीपातील इतर पिकांमधून शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असले तरी कापसाच्या दर हे स्थिर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण यंदा मराठवाड्यात कापसाच्या क्षेत्रामध्ये घट झाली होती तर सोयाबीनचे क्षेत्र हे वाढलेले होते. त्यामुळे कपाशीची मागणी वाढलेली असल्याने मुहूर्ताचे दर हे 10500 होते तर त्यानंतर आता 8200 दर कापसाचे दर हे स्थिरावलेले आहेत.

1 लाख क्विंटल कापसाची आवक

खानदेशात दिवसाकाठी 1 लाख क्विंटल कापसाची आवक होत आहे. या भागातील जिनिंग प्रक्रिया उद्योग सुरु झाल्याने कापसाला चांगला दरही मिळत आहे. कापसाचे हेच दर स्थिर राहतील तर डिसेंबर नंतर यामध्ये सुधारणा होणार आहे. त्यामुळे शेतकरीही सावध भूमिका घेत कापूस विक्रीला आणत आहेत. भविष्यात कापसाचे दर वाढणार असल्याने टप्प्याटप्पाने कापसाची आवक होईल असा अंदाज बांधला जात आहे.

उत्पादन कमी अन् मागणी अधिक

यंदा कापसाचे उत्पादन कमी असल्याने तोडणीला सुरवात झाली की मागणीही वाढलेली आहे. कापूस खरेदीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधील मोठ्या खरेदीदारांचे एजंट खानदेशात दाखल झाले आहेत. अंकलेश्‍वर-बऱ्हाणपूर महामार्गालगत म्हणजेच तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल या भागांत कापूस दर अधिक मिळत आहेत. कारण या भागातून मध्य प्रदेश, गुजरातेत लवकर पोहोचणे शक्य आहे. तर दुसरीकडे भविष्यात कापसाचे दर वाढतील या आशेने शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विक्री करीत नाहीत. मागणी अधिक असल्याने या परराज्यातील व्यापारी हे खानदेशात दाखल झाले आहेत.

असे वाढत गेले दर

मुहूर्ताच्या दरानंतर सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. मात्र, कापसाच्या बाबतीत हे उलटे होत आहे. मुहूर्ताच्या दरानंतरही हे दर टिकून आहेत. सप्टेंबरमध्ये सुरुवातीला 5200, सप्टेंबरच्या अखेरीस 6200 आणि ऑक्टोबरमध्ये 6500, 6800, 700 अशी दरात वाढ होत गेली ती अजूनही कायम आहे. गेल्या दोन – तीन दिवसांत भडगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा आदी भागांत कापसाची विक्री खेडा खरेदी 8250 रुपये प्रतिक्विंटल या दरात झाली आहे. (Cotton price hike, traders from abroad enter Khandesh to buy cotton)

संबंधित बातम्या :

खरीपातील पिकांना ढगाळ वातावरणाचा धोका, शेतकऱ्यांसाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला ?

अनुदानित बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध, या कागदपत्रांची पूर्तता करा अन् बियाणे घ्या..!

योजना शेतकऱ्यांच्या हिताची : प्लास्टिक मल्चिंगचे महत्व अन् 50 टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.