उभा कापूस आडवा, सोयाबीनला कोंब फुटले ; शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे

उस्माबाद, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. (Kharif Hangam) राज्यात सोयाबीनची पेरणी ही 53 लाख हेक्टरावर झालेली होती. पावसाचा फटका मराठवाड्यातील 14 लाख हेक्टरावरील पिकांना बसला असून तसा अहवालही विभागीय कार्यालयात सादर करण्यात आला आहे. मात्र, आता पंचनाम्याचा घाट न घालता थेट मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत.

उभा कापूस आडवा, सोयाबीनला कोंब फुटले ; शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे
उस्मानाबाद जिल्ह्यातील सोयाबीनची पावसामुळे झालेली अवस्था

लातूर : मराठवाड्यातील (Marathwada) आठही जिल्ह्यातील खरीपाच्या पिकाला पावसाचा फटका बसलेला आहे. एवढेच नाही तर फळबागा आणि भाजीपाल्याही जमिनदोस्त झाल्या आहेत. पावसामुळे शेती पिकाचे तर नुकसान झालेच आहे परंतु, उस्माबाद, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. (Kharif Hangam) राज्यात सोयाबीनची पेरणी ही 53 लाख हेक्टरावर झालेली होती. पावसाचा फटका मराठवाड्यातील 14 लाख हेक्टरावरील पिकांना बसला असून तसा अहवालही विभागीय कार्यालयात सादर करण्यात आला आहे. मात्र, आता पंचनाम्याचा घाट न घालता थेट मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत.

नगदी पीक म्हणून शेकऱ्यांचा कल हा सोयाबीनकडेच असतो. तर आजही परभणी हिंगोली जिल्ह्यात कापसाचे पिक घेतले जात आहे. खरीपातील इतर पिकांची काढणी ही अंतिम टप्प्यात असली तरी सोयाबीन आणि कापूस ही मुख्य पिके वावरात असतानाच पावसाने कहर केला आहे.

कधी पावसाअभावी तर कधी अतिदृष्टीमुळे खरीपातील पिकाचे नुकसान हे ठरलेलेच आहे. मराठवाड्यात वार्षिक पावसाची सरासरी ही 671. 6 मिलीमीटर आहे. आतापर्यंत 894. 8 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 221 मिलीमिटर जास्तीचा पाऊस झाला आहे. मरावाड्यातील आठ ही मोठे प्रकत्प हे तुडुंब भरुन वाहत आहेत तर सोयाबीन, कापूस हे पाण्यात आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर काही दिवस पावसाने उसंत घेतली होती पण गेल्या चार दिवसापासून पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. नुकसान पाहणीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आता लोकप्रतिनीधी बांधावर पोहचत आहेत.

सरसकट मदत नव्हे तर सरसकट पंचनाम्याचे आदेश

सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस मराठवाड्यात झाला आहे. त्यामुळे पंचनाम्याचा बाऊ न सरसकट नुकसान झाल्याचे ग्राह्य धरुन मदतीची मागणी हे शेतकरी करीत आहेत. तर हिंगोली येथे शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट कृषीमंत्री यांना फोन करून शेतातील वास्तव काय आहे हे सांगितले. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे यांनी मदतीबाबत काही न बोलता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश कृषी अधिकारी यांना दिले जातील असे आश्वासन दिले आहेत. जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतातील कापूस आडवा झाला आहे तर सोयाबीनला कोंब फुटु लागले आहेत.

परभणीत ढगफुटीसदृश पाऊस

परभणी जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. पावसामुळे आतापर्यंत अनेक गावांचा संपर्क तुटल्याच्या घटना ह्या घडलेल्या आहेत. तर पाथरी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पिके ही पाण्यात आहेत. शेतामध्ये पाणी साचल्याने सोयाबीनला कोंब फुटु लागले आहेत. प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले असून दुधना आणि पूर्णा नदीपात्र हे ओसंडून वाहत आहे. शेतकऱ्यांना पीक काढणीची कामेही करणे मुश्किल झाले आहे.

लातूर जिल्ह्यातही पावसाचे थैमान, सरसकट मदतीची मागणी

लातूर जिल्ह्यात आता पर्यंत 805.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला असून मांजरा धरणही पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नदीलगतच्या शेत जमिनीमध्ये पाणी शिरल्याने शिरुरअनंपाळ तालुक्यातील सोयाबीन हे पाण्यात आहे. आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पिकाची पाहणी करूम पंचनाम्यासाठी काही उरलेच नाही. राज्य सरकारने सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

उस्मानाबादमध्ये शेतजमिन खरडून गेली

गेल्या दोन दिवसांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, वाशी या तालुक्यांध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांचे सांडवे सोडण्यात आले आहेत. तर पावसामुळे सर्वाधिक सोयाबीनचे नुकसान झाले आहे. भूम- वाशी तालुक्यात अनेत शेतकऱ्यांची शेतजमिनही खरडून गेली आहे. शिवाय अणखीन पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने सोयाबीनची काढणी होणार की नाही हा शेतकऱ्यांसमोरील प्रश्न आहे. (Cotton, soyabean damaged due to rains, hope for government assistance to farmers in Marathwada)

इतर बातम्या :

यंदा पेरणी दुबार, पंचनामेही दुबार अन् पाऊस सरासरी पार

काँग्रेसची विनंती मान्य, भाजपचा मोठा निर्णय, शब्द आणि परंपरा पाळणार, राज्यसभा पोटनिवडणुकीतून माघार

करप्याचा कहर, अर्ध्या रात्रीतून पिकताहेत केळी, दीड हजार केळीची झाडे कापली, नांदेडमधील शेतकऱ्याचा संताप

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI