अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून इंजिनिअर भारतात परतला, आता बांबू शेतीतून मिळवतोय लाखो रुपये

अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून इंजिनिअर भारतात परतला, आता बांबू शेतीतून मिळवतोय लाखो रुपये
बांबू शेती

दीपक गोयल यांनी सुंद्रेल गावामध्ये खडकाळ माळरानावर बांबू शेती करण्या सुरुवात केली. Deepak Goyal bamboo cultivation

Yuvraj Jadhav

|

Mar 30, 2021 | 1:08 PM

नवी दिल्ली: अमेरिकेतील लाखो रुपयांची नोकरी सोडून एखादा तरुण गावात येतो. गावातचं राहून शेती करण्याचा निर्णय घेतो, अशा गोष्टी फारच कमी वेळा घडतात. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील दीपक गोयल हे अमेरिकेत इलेक्ट्रीकल इंजिनिअर म्हणून काम करत होते. ती नोकरी सोडून ते भारतात आले. दीपक यांनी त्यांची पत्नी शिल्पाच्या मदतीनं माळरानावर शेती करण्यास सुरुवात केली. गोयल दाम्पत्यानं 10 वर्षांपासून शेती करण्यास सुरुवात केली. सुंद्रेल गावामध्ये त्यांनी खडकाळ माळरानावर बांबू शेती करण्या सुरुवात केली. त्यासाठी तेथील जमीन शेती योग्य करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. (Deepak Goyal engineer returned from America and started bamboo cultivation)

महिलांना दिला रोजगार

दीपक गोयल यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये बांबू लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे. सध्या बांबू शेतीसाठी 30 कुटुंबांना जोडून घेतलं आहे. याशिवाय परिसरातील 70 महिलांनी रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. दीपक गोयल सांगतात की, भारतात परताना फळशेती करण्याचा विचार केला होता. मात्र, बांबू शेती करण्याचा ठरवलं आणि त्यामध्ये यशस्वी झालो.

त्रिपुरावरुन रोपं आणली

दीपक गोयल आणि शिल्पा गोयल यांनी विविध राज्यामध्ये जाऊन बांबू शेतीमधील बारकावे समजून घेतले. त्यांनी मध्य प्रदेशातील बांबू संशोधन केंद्रांशी संपर्क साधला. पुढे त्यांनी त्रिपुरामधून टुल्डा प्रजातीची रोप आणली. गोयल यांनी आता बांबू शेतीचा विस्तार तब्बल 150 एकरांवर केला आहे. त्यासाठी त्यांनी सुंद्रेल, साईंखेडी, बागदरी, सनावद तहसीलदार कार्यालयाच्या मदत घेतली. गोयल यांच्या बांबू शेती प्रकल्पामुळे 70 महिलांना कायमस्वरुपी रोजगार प्राप्त झाला आहे.

आंतरपीक घेतल्याचा फायदा

दीपक गोयल यांनी शेतकऱ्यांनी बांबू शेती केल्यानंतर इतर पीकं घेता येत नाहीत हा गैरसमज करुन घेऊ नये, असं म्हटलं आहे. बांबू शेतीमध्ये आंतरपीक घेताना त्यांनी आले, अश्वगंधा, पामरोसाची लागवड केली होती. त्याचाही त्यांना उत्पादन खर्च कमी होण्यात फायदा झाला.

मध्य प्रदेश सरकार देतेय अनुदान

मध्य प्रदेश बांबू लागवडीसाठी अनुदान देत आहे. प्रत्येक रोपासाठी सरकारकडून 120 रुपये देण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी होतो. दीपक गोयल सांगतात की बांबूच्या वाळलेल्या पांनापासून कंपोस्ट खत बनवता येते, त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होतो.

संबंधित बातम्या:

मध उत्पादनात जगातील पाच अग्रेसर देशांमध्ये भारताचा समावेश, जाणून घ्या मधमाशी पालनातून किती मिळते उत्पन्न

आधुनिक शेती । शेतात करा सब्जाची लागवड, कमी जागेत मिळेल अधिक नफा

(Deepak Goyal engineer returned from America and started bamboo cultivation)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें