थंडी सुरु होताच मुंबईकरांचा अंड्यावर ताव, मागणी वाढल्याने दरही वधारले

नोव्हेंबर अखेरपर्यंत थंडीची चाहूलच लागलेली नव्हती. आता कुठे थंडीचा कडाका वाढलेला आहे त्याचबरोबर मुंबईकरांचा अंड्यावरील तावही वाढत आहे. अंड्यांच्या अधिकच्या मागणीमुळे ठोक बाजारात 500 रुपये शेकडा तर किरकोळ बाजारात अंड्याचे दर 650 रुपये शेकड्यावर गेले आहेत.

थंडी सुरु होताच मुंबईकरांचा अंड्यावर ताव, मागणी वाढल्याने दरही वधारले
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 1:40 PM

मुंबई : नोव्हेंबर अखेरपर्यंत थंडीची चाहूलच लागलेली नव्हती. आता कुठे थंडीचा कडाका वाढलेला आहे त्याचबरोबर मुंबईकरांचा अंड्यांवरील तावही वाढत आहे. अंड्यांच्या अधिकच्या मागणीमुळे ठोक बाजारात 500 रुपये शेकडा तर किरकोळ बाजारात अंड्याचे दर 650 रुपये शेकड्यावर गेले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरमध्ये शेकड्यामागे 110 रुपयांनी अंड्याचे दर हे कमी झाले होते मात्र, डिसेंबर उजाडताच थंडीचा कडाका वाढला की त्याचा परिणाम दरावरही झाला आहे. ठोक बाजारात 100 अंड्यामागे 50 रुपयांची वाढ झाली आहे तर किरकोळ बाजारात 150 रुपयांनी वाढ झाली आहे.

मागणीमध्ये दुपटीने वाढ

नोव्हेंबरमध्ये अंड्यांच्या विक्रीमध्ये कमालीची घट झाली होती. दररोजच्या तुलनेत 35 लाख अंड्यांनी विक्री ही कमी झाली होती. मात्र, डिसेंबर महिन्याला सुरवात होताच दररोजच्या मागणीत 40 लाख अंड्यांची वाढ झाली आहे. सध्या दिवसाकाठी 78 लाख अंडी ही विक्री होत असल्याचे मुंबई एग्ज असोसिएशनचे अध्यक्ष अफताफ खान यांनी सांगितले आहे. आता मागणी स्थिरावली आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत असेच दर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दोन राज्यातून मुंबईत अंड्याची आवक

मुंबईमध्ये हैद्राबाद, कर्नाटक या राज्यातून तर महाराष्ट्राच्या विविध भागातून अंड्याची मागणी व्यापारी करीत असतात. यावर्षीही अंड्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याने नोव्हेंबरपर्यंत दर हे घसरलेलेच होते पण डिसेंबर महिन्यात हे दर वाढलेले आहेत. आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून आवक होतच आहे पण राज्यातील पुणे, सांगली, जिल्ह्यातील पोल्ट्रीमधूनही अंड्यांची आवक ही मुंबईत सुरु असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

कोरोना काळात झाली होती विक्रमी विक्री

नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत सध्या अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, गतवर्षी कोरोना काळात किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. दररोज 80 ते 90 लाख अंड्याची विक्री होत होती. कारण कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढते म्हणून अंड्याला मागणी होती. तर गतमहिन्यात ही अंड्याची विक्री 45 लाखांवर आली होती. आता थंडी वाढल्याने का होईना अंड्याच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात 100 अंड्यांसाठी 650 रुपये मोजावे लागत आहेत.

1 डझन अंड्यासाठी मोजावे लागतात 72 रुपये

सध्या किरकोळ बाजारात 1 डझन अंड्यासाठी ग्राहकांना 72 रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच 1 अंड हे 6 रुपयाला पडत आहे तर गतमहिन्यात 65 रुपयाला 1 डझन अंडी ही मिळत होती. दरवर्षी थंडीची चाहूल लागताच दरात असा चढ-उतार पाहवयास मिळतोच.

संबंधित बातम्या :

तुतीची लागवड अन् रेशीमचे उत्पादन, उद्योग सुरु करण्यासाठी जाणून घ्या महत्वाची माहिती..

अगोदर लसीकरणाचे प्रमाणपत्र, मगच शेतीमाल बाजारात, कोणत्या बाजार समितीने काढले ‘फर्मान’?

कष्ट करून शेतकरी बेजार, दलाल मात्र मालामाल..! नागपूरच्या भाजीबाजारातले भयाण वास्तव

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.