मंदिरे उघडली बाजार ‘फुलला’, दसऱ्याच्या निमित्ताने का होईना झेंडूला दर मिळाला

गतआठवड्यात मंदिरे उघडल्यापासून फुलांचा बाजार चांगलाच बहरत आहे. यातच उद्या दसरा सण असल्याने झेंडूच्या फुलांची मागणी वाढत आहे. दसरा सणात झेंडूच्या फुलाचे विशेष महत्व आहे. आवक कमी असून आता मागणी वाढल्याने चांगला दरही मिळत आहे. ठोक बाजारात 40 ते 60 रुपये प्रतिकीलो दर मिळत आहे तर किरकोळ बाजारात 80 ते 130 रुपये दर मिळत आहे.

मंदिरे उघडली बाजार 'फुलला', दसऱ्याच्या निमित्ताने का होईना झेंडूला दर मिळाला
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : निसर्गाच्या लहरीपणामुळे (The Vagaries of Nature) संपूर्ण खरीप हंगाम आजही पाण्यात आहे. उत्पादनाच्या दृष्टीने हा हंगाम महत्वाचा असतो पण यंदा पावसाने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. मात्र, जोडव्यवसाय म्हणून लागवड केलेल्या पिकांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. गत आठवड्यात मंदिरे उघडल्यापासून फुलांचा (marigold flower ) बाजार चांगलाच बहरत आहे. यातच उद्या दसरा सण असल्याने झेंडूच्या फुलांची मागणी वाढत आहे. दसरा सणात झेंडूच्या फुलाचे विशेष महत्व आहे. आवक कमी असून आता मागणी वाढल्याने चांगला दरही मिळत आहे. ठोक बाजारात 40 ते 60 रुपये प्रतिकीलो दर मिळत आहे तर किरकोळ बाजारात 80 ते 130 रुपये दर मिळत आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे सर्वकाही पाण्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शिवाय बाजारपेठेत शेतीमालाला दरही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण दसरा सणात झेंडूच्या फुलाला विशेष महत्व असते.

झेंडूची फुलं घरोघरी सजावटीसाठी वापरली जातात, पूजेसाठी आणली जातात. दसऱ्याच्या सणासाठी झेंडूच्या फुलांसह आपट्याच्या पानांना मोठी मागणी असल्याने नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसरात झेंडू, शेवंतीसह आर्टीफिसिअल फुलांची देखील मागणी वाढली असून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. हीच परस्थिती इतर शहरांमध्ये देखील पाहवयास मिळत आहे.

पावसाचा परिणाम उत्पादनावरही

पावसाचा परिणाम जसा इतर पीकांवर झाला आहे तसाच झेंडूच्या उत्पादनावर देखील झाला आहे. कारण पावसामुळे झेंडूच्या फुलाचे नुकसान झाले आहे. मात्र, असे असले तरी आवक ही सरासरी एवढीच राहिलेली आहे. मराठवाड्यात अधिकचा पाऊस झाल्याने त्या भागातून आवक कमी झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र, सणामुळे उत्साहाचे वातावरण असल्याने ग्राहकही पडेल त्या दरात झेंडूच्या फुलांची खरेदी करीत आहेत.

या भागातून फुलांची आवक

मुंबई येथूल एपीएमसी मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. झेंडूचे दर वधारले असतानाही ग्राहकांचा उत्साह हा कायम आहे. मुंबई येथील मार्केटमध्ये पुणे जिल्ह्यासह सातारा, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, तसेच जुन्नर भागातून झेंडूची आवक झाली आहे. झेंडूच्या फुलांसह अन्य सर्वच फुलांना मागणी असल्याने फुले तेजीत आहेत.

काय आहेत फुलांचे दर

दसऱ्यामुळे झेंडूच्या फुलांना मागणी आहे. ठोक बाजारात झेंडू 40 ते 60 रुपये किलोने विक्री होत आहे तर किरकोळ बाजारात मात्र, 80 ते 130 चा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तुलनेत ग्राहक आणि शेतकरी यांच्या मधल्या दलाला अधिकचा फायदा होत असल्याचे चित्र आहे. गुलछडी 120-200, बिजली 50-100, शेवंती 80-150, जुई 100-1500, चमेली 1300, जरबेरा 20-40, कार्नेशन – 80-150 (Demand for marigold flower due to festival, prices increase, farmers relieved)

संबंधित बातम्या :

खरीप पीकांची मळणी सुरुयं..मग ही खबरदारी आवश्य घ्या…!

अन्नत्याग आंदोलनाचा समारोप, शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात संघर्ष सुरुच राहणार : आ. पाटील

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू, ग्राहकांचे मात्र वांदे..!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI