खरीप पीकांची मळणी सुरुयं..मग ही खबरदारी आवश्य घ्या…!

मळणी करताना अनेक अपघात झाल्याचे आपण पाहिलेले आहे. यंत्राचा वापर चांगला असला तरी तेवढाच धोक्याचाही आहे. त्यामुळे योग्य खबरदारी हाच यावरचा पर्याय आहे.

खरीप पीकांची मळणी सुरुयं..मग ही खबरदारी आवश्य घ्या...!
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : पीकाची काढणी (harvesting) मळणी आता शक्यतो (machine-to-mill ) यंत्राच्या सहाय्याने होत आहे. त्यामुळे वेळीची तर बचत होत आहे पण ही यंत्र आहेत. त्यामुळे त्याच प्रमाणात योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मळणी करताना अनेक अपघात झाल्याचे आपण पाहिलेले आहे. यंत्राचा वापर चांगला असला तरी तेवढाच धोक्याचाही आहे. त्यामुळे योग्य खबरदारी हाच यावरचा पर्याय आहे.

अलीकडे मळणीसाठी यंत्रांचा वापर वाढला आहे. यंत्रामुळे माणसांचे श्रम कमी झाले असून, वेळही वाचत आहे. मात्र अपघाताचे प्रमाण वाढले. ते कमी करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. खरीपातील बहुतांश पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. काही पिकांची काढणीपश्‍चात कामे सुरू असून, त्यात मळणी हे अत्यंत महत्त्वाचे काम असते. पूर्वी ज्या कामांना महिन्यांचा कालावधी लागत असे, ती आता काही दिवसांत पूर्ण होत आहे. काळानुरुप हे बदल होत असले तरी यंत्राचा वापर करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

पीक टाकताना घ्यावयाची काळजी

मळणी यंत्राचा वेग अधिकचा असल्याने त्याला लागलीच पीक हे टाकावे लागते. यंत्रात पीक कमी पडू नये म्हणून शेतकरी अधिक वेगाने पीक टाकण्याचा प्रयत्न करतो आणि तेथेच अडचणी निर्माण होतात. घाईगडबड केली की चूक होते अपघाताचा धोका संभावतो. त्यामुळे यंत्रामध्ये पीक टाकण्यासाठी दोन व्यक्ती नेमायच्या. जेणे करुन अपघात होणार नाही. एका व्यक्तीने खालून पीक उचलून द्यावे आणि दुसऱ्या व्यक्तीने ते मशिनमध्ये टाकावे.

नको ते धाडस करु नकात

काही व्यक्ती अधिक उंचीवर उभी राहून किंवा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून थेट यंत्रात पीक टाकण्याचा प्रयत्न करतात. हातांचा वापर करण्याऐवजी पायाने ढकलून पीक ढकलण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तोल जाण्याचा धोका जास्त असते. पिकासोबत हात किंवा पाय आत खेचला जाऊन अपघात होऊ शकतो. सोयाबीन, हरभरा, मसूर, बाजरी इ. झुडपी पिके मळताना विशेष काळजी घ्यावी. पीकाची मळणी सुरु असताना अनेकदा शेतकरी हाताला जुन्या कापडाचा तुकडा किंवा पोते गुंडाळतात. हे देखील तेवढेच धोक्याचे आहे. कारण यामध्ये कापड, पोते यांचे धागे, पट्टी किंवा लोंबणारे भाग हे यंत्राच्या धुराकडे खेचले जाऊ शकतात. त्यामुळे हात आत जाऊन अपघात होऊ शकतो. हातात रबरी किंवा चामड्याचे हातमोजे घालावेत.

कामाचे नियोजन गरजेचे

हंगाम उरकता घेण्याच्य गडबडीत मशिन ऑपरेटर हा सलग काम करतो. त्यामुळे थकवा आलेला असतो. रात्रीच्या वेळी काम सुरु राहिले तर याचा अधिकचा त्रास सहन करावा लागतो. कोणत्याही स्थितीमध्ये थकल्यावर काही काळ तरी विश्रांती घ्यावी. शक्य असल्यास यंत्रावर काम करणाऱ्या व्यक्ती दर काही काळानंतर बदलून आराम देण्याची आवश्यकता असते.

यंत्राची योग्य तपासणी आवश्यक

यंत्र सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी करून घ्यावी. विशेषतः थ्रेशरच्या आत फिरणारे लोखंडी भाग, ड्रममधील भाग सैल नाहीत, त्यांचे आवाज येत नाहीत ना, घासले जात नाहीत ना, हे लक्षपूर्वक पाहावे. अनेक वेळा सतत होणाऱ्या घर्षणामुळे आग लागू शकते. विजेवर चालणाऱ्या यंत्रा संदर्भात विद्युत तारा, जोड उघडे राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. या वायरी फार ताणू नयेत. त्यातून अपघात होऊन विजेचा धक्का बसणे किंवा आग लागणे अशा घटना उद्‌भवू शकतात. (You are soiling the crop with the help of a machine, then take care of it.)

संबंधित बातम्या :

अन्नत्याग आंदोलनाचा समारोप, शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात संघर्ष सुरुच राहणार : आ. पाटील

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू, ग्राहकांचे मात्र वांदे..!

आगोदर प्रोत्साहन अन् आता हात आखडता, शेतकरी कंपन्या अडचणीत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI