AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vegetable Rate: ऊन जरा जास्तंय…आणि भाज्यांचे दरही ! कोणती भाजी किती महाग? जाणून घ्या

वाढत्या उन्हाच्या झळा असो की अवकाळी पाऊस असो प्रमाणापेक्षा अधिक झाल्यावर काय होते याचा प्रत्यय यंदाच्या खरिपापासून ते रब्बी हंगाम आणि आता भाजीपाल्यावरही जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत आहे. यामुळे राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे तर दरामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

Vegetable Rate: ऊन जरा जास्तंय…आणि  भाज्यांचे दरही ! कोणती भाजी किती महाग? जाणून घ्या
वाढत्या उन्हामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले असून आता दरात वाढ झाली आहे.
| Updated on: Apr 13, 2022 | 2:13 PM
Share

मुंबई : वाढत्या (Summer) उन्हाच्या झळा असो की अवकाळी पाऊस असो प्रमाणापेक्षा अधिक झाल्यावर काय होते याचा प्रत्यय यंदाच्या खरिपापासून ते रब्बी हंगाम आणि आता भाजीपाल्यावरही जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे (Vegetable Production) भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत आहे. यामुळे राज्यातील (Market) मुख्य बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे तर दरामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विशेषत: पालेभाज्यांवर याचा परिणाम झाला आहे. मुंबई येथील किरकोळ बाजारपेठेत फरसबी, घेवडा, पालक, वटाण्याचे दरांनी शंभरी पार केली आहे. शिवाय याच प्रमाणात आवक राहिली तर दरामध्ये अणखी वाढ होणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत. केवळ मुंबईमध्येच नाही तर राज्यातील इतरत्रही भाजीपाला दराची अशीच अवस्था आहे.

भाजीपाल्याची आवकही घटली

शेतीमालाची आवक घटली की दर वाढणार आणि आवक वाढली तर दरात घट हा बाजारपेठेचा नियमच आहे. गतमहिन्यात मुंबई मार्केटमध्ये दिवसाकाठी 650 वाहनांमधून जवळपास 3 हजार टन भाजीपाल्याची आवक होत होती तर 12 एप्रिल रोजी 579 वाहनांमधून 2 हजार 500 टन आवक झाली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. फरसबीचे दर हे 25 ते 35 रुपयांवरुन थेट 40 ते 90 रुपये किलोवर पोहचले आहेत. तर किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 110 ते 120 रुपये किलो असे आहेत.

किरकोळ मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दुपटीने दर

आवक घटून दर वाढले तरी याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांनाच होतो असे नाही. कारण ठोक बाजारापेक्षा किरकोळ मार्केटमध्ये दुपटीन दर वाढलेले आहेत. फरसबी ठोक बाजारात 40 ते 90 रुपये किलो असली तरी किरकोळमध्ये मात्र 110 ते 120 पर्यंत विकली जात आहे. गाजर ठोकमध्ये 20 ते 30 रुपये तर किरकोळ बाजारात 60 रुपये, घेवडा ठोकमध्ये 40 ते 60 तर किरकोळमध्ये 100 रुपये, बीट ठोकमध्ये 14 ते 16 तर किरकोळमध्ये 60 रुपयाला विकले जात आहे. त्यामुळे आवक घटली असली तरी त्याचा अधिकचा फायदा मध्यस्ती असलेले व्यापारी आणि किरकोळ विक्रत्यांनाच होत आहे.

वाढत्या उन्हाचा नेमका परिणाम काय ?

उन्हाळी हंगामातील सर्व पीके ही उपलब्ध पाणीसाठ्यावरच अवलंबून असतात. शिवाय सरासरीपेक्षा अधिकाच पाऊस झाल्याने जलस्त्रोत हे तुडुंब भरलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल तर केलाच पण भाजीपाल्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे पाणीपातळीत झपाट्याने घट होत असून ऐन गरजेच्या वेळी भाजीपाल्याला पाणीपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे.

संबंधित बातम्या :

Summer Crop : उन्हाळी सोयाबीनचा शेवटचा महिना, योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनात होईल वाढ

Recycling of water: सांडपाण्याच्या पुनर्वापरावर बदलणार शेती व्यवसयाचे चित्र, शेती व्यवसायच जल परिषदेच्या ‘केंद्रस्थानी’

Sindhudurg : वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर नव्या प्रजातीचे कासव, नावावरुन एकवटले कासवप्रेमी!

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.