“मी पोल्ट्री फॉर्म टाकणार”, असं तुम्ही म्हणाल, जेव्हा तुम्हाला कळेल महाराष्ट्राला दररोज किती अंडी कमी पडतात

आतापर्यंत अंड्यांचा भाव उच्चांकावर पोहचला आहे.  21 डिसेंबरपर्यंत देशातील खुल्या बाजारातील किंमत 552 रुपये प्रति शंभरवर पोहोचली आहे. तर त्याच अंड्यांचा अधिकृत दर हा रु.521 असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मी पोल्ट्री फॉर्म टाकणार, असं तुम्ही म्हणाल, जेव्हा तुम्हाला कळेल महाराष्ट्राला दररोज किती अंडी कमी पडतात
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 11:09 PM

मुंबईः संडे असो मंडे रोज खा अंडे असे आपण अगदी लहानापासू ऐकत आलो आहे. हीच शक्तिशाली अंडी हिवाळ्यात अनेक प्रकारची आपल्याला शक्ती देत असतात. पण, या शक्तीसाठी आता खिसा मोकळा करावा लागणार आहे. कारण, अंडी आता प्रचंड महाग झाली आहेत. सध्या थंडीचे वातावरण असल्यामुळे राज्यात अंड्याची मागणी वाढली आहे. राज्यातील पारा घसरत असल्याने अंड्यांचे भाव झपाट्याने वाढत आहेत.

अंड्याच्या खुल्या बाजारातील दराने गेल्या 10 वर्षांचा विक्रम आता मोडीत निघाला आहे. 21 डिसेंबर रोजी अंड्याच्या खुल्या बाजारातील दराने 3 वर्षांचा अधिकृत दराचा विक्रमही मोडीत निघाला आहे.

याचा फटका आता राज्याना बसत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रालाही त्याचा फटका बसला आहे. यामुळे आता राज्यात प्रतिदिन जवळपास 1 कोटी अंड्यांचा तुटवडा भासत आहे.

अंड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाकडूनही पाऊलं उचलली जात आहेत. या अंड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी विभागाकडून योजना तयार केली आहे. राज्यात सध्या प्रत्येक दिवशी 1 कोटी अंड्यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे राज्यात प्रत्येक दिवशी 2.25 कोटींहून अधिक अंड्यांची विक्री करण्यात येत असली तरी सध्या उत्पादनामध्ये मात्र प्रचंड घट झाली आहे.

आतापर्यंत अंड्यांचा भाव उच्चांकावर पोहचला आहे.  21 डिसेंबरपर्यंत देशातील खुल्या बाजारातील किंमत 552 रुपये प्रति शंभरवर पोहोचली आहे. तर त्याच अंड्यांचा अधिकृत दर हा रु.521 असल्याचेही सांगण्यात आले आहे.

या तज्ज्ञांच्या मते, 3 वर्षांपूर्वी अंडी 543 रुपये अधिकृत दराने विकली जात होती. त्यामुळे अंड्यांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता नाही असंही तज्ज्ञांनी सांगितले आहे. परंतु, खुल्या बाजारात अंड्यांची मागणी वाढल्याने अंड्यांचे दरही वाढले असल्याचे सांगण्यात आले आहे.

देशातील सर्वात मोठी अंडी बाजार असलेल्या बरवाला मंडीमध्ये गेल्या महिन्यात 100 अंड्यांची किंमत 420 रुपये होती, ती आता 521 रुपये झाली आहे. तर खुल्या बाजारात 550 रुपयांपर्यंत त्याची विक्री केली जात असल्याचेही सांगितले जात आहे.

अंड्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून दोन दिवसांत ही वाढ अंड्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 5 डिसेंबर 2020 रोजी अंड्याची किंमत 420 रुपये होती, तर 6 डिसेंबर रोजी त्याची किंमत थेट 483 रुपयांवर पोहोचली आहे.

यानंतर भावात पुन्हा घसरण झाली आणि भाव 430 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. तर 20 डिसेंबरपर्यंत पुन्हा एकदा भाव वाढल्याने भाव 490 रुपयांवर पोहोचला असल्याचे सांगून 21 डिसेंबर रोजी अचानक भाव 521 रुपयांवर पोहोचला असल्याचे दिसून आले आहे.

अंड्यांचे दर ठरलेले असल्याचे बारवाला मंडईतील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तर उत्पादनात कपात झाल्यामुळे अंड्याची वाढीव दराने विक्री होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोंबड्यांमध्ये आरडी नावाचा आजार दिसून येत आहे. त्यामुळेही त्याचा उत्पादनावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही जण हा धंदा वाढीसाठी प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले जात आहे.

बारवाला मंडईत कोंबड्यांना आरडी नावाचा आजार झाला असून अंडी उत्पादनात घट झाली आहे. आरडी अंतर्गत, कोंबडीच्या पोटात अस्वस्थता येते, त्यामुळे कोंबडीला सतत औषधे दिली जातात.

कोंबड्या मोल्डिंगवर ठेवल्या जातात. या अंतर्गत कोंबड्यांना धान्य दिले जात नाही. फक्त औषध दिले जाते. कोंबडीला डोसनुसार धान्य न मिळाल्यास ती अंडीही घालत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.