AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुध डेअरीच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला मिळणार काम अन् दुध उत्पादकांना प्रोत्साहन

दुधाचे उत्पन्न वाढविण्यासाठी इच्छूक असलेल्या शेतकऱ्यांसाठी हरियाना सरकारने एक हीताचा निर्णय घेतला आहे. हरियाणात 50 जनावारापर्यंतच्या दुध डेअरी उभारणीसाठी रकमेच्या 25 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल तर वाढणारच आहे शिवाय डेअरी सुरु करणाऱ्याच्या हातालाही काम मिळणार आहे.

दुध डेअरीच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला मिळणार काम अन् दुध उत्पादकांना प्रोत्साहन
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 1:21 PM
Share

मुंबई : दुध व्यवसाय हा शेतीचा मुख्य जोडव्यवसाय आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन तर मिळतेच शिवाय डेअरीच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम. दुधाचे उत्पन्न वाढविण्यासाठी इच्छूक असलेल्या शेतकऱ्यांसाठी हरियाना सरकारने एक हीताचा निर्णय घेतला आहे. हरियाणात 50 जनावारापर्यंतच्या दुध डेअरी उभारणीसाठी रकमेच्या 25 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल तर वाढणारच आहे शिवाय डेअरी सुरु करणाऱ्याच्या हातालाही काम मिळणार आहे.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने राज्याची दरडोई दूध उपलब्धता वाढविणे आणि दुग्धव्यवसायातून बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा उद्देश समोर ठेवला आहे. याकरिता हरियाणा सरकारने दूध आणि डेअरीशी (डेअरी) संबंधित अनेक नवीन योजना सुरु केल्या आहेत.

एका अधिकृत प्रवक्त्याने आज सांगितले की, हायटेक मिनी डेअरी योजनेअंतर्गत सामान्य पशुपालकही या विभागाद्वारे 4, 10, 20 आणि 50 दुधाळ जनावरे असतील तर दुध डेअरी उभा करु शकतात. 4 आणि 10 जनावरे असलेल्यांसाठी डेअरी सुरू करणाऱ्यांना या विभागातून 25% अनुदान (सबसिडी) देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 20 आणि 50 दुधाळ जनावरांच्या डेअरीवर व्याज अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

कोणाला मिळेल 90% पर्यंत अनुदान

या योजनेअंतर्गत अनुसुचित जातींच्या व्यक्तींना 2 किंवा 3 दुभती जनावरे घेऊन डेअरी सुरु करायची आहे किंवा डुक्कर पानलाचा व्यवसाय सुरू करायचा आहे. अशा इच्छूकांना 50% अनुदान दिले जाणार आहे. मेंढ्या किंवा शेळ्यांच्या डेअरीसाठी 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनांमुळे दूध उत्पादन (दूध उत्पादन) वाढेल असा विश्वास हरियाणा सरकारला आहे.

लाभ घेण्यासाठी काय करावे

दुग्धव्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्यांना साध्या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करताना कुटुंबातील सदस्यांचे आयडी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, कॅन्सल केलेले चेक आणि बँकेची एनओसी अपलोड करावी लागणार आहे.

कृषीमंत्री यांनी उपस्थित केला होता मुद्दा

हरियाणाचे कृषीमंत्री जे.पी.दलाल यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मस्य, पशुसंवर्धन आणि डेअरी मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्या बैठकीत हा दुध डेअरीचा मुद्दा मांडला होता. शेतकरी आपले उत्पन्न वाढवून प्रगती करु शकेल आणि शेती बरोबरच पशुपालनाच्या व्यवसायालाही चालना मिळेल हा उद्देश यामागचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय हरियाणामध्ये 16 लाख कुटूंबात 36 लाख दुभती जनावरे असल्याचेही त्यांनी सांगितले होते. (Emphasis on animal husbandry to produce milk and get work in the hands of youth)

संबंधित बातम्या :

चवीला गोड अन् औषधी गुण असलेल्या ‘पांढऱ्या कांद्याला’ जागतिक बाजारपेठेत महत्व, गुणधर्मासह लागवड पध्दती

पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया ; प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी

PM KISAN YOJNA : 7 लाख 24,000 शेतकऱ्यांनी अर्ज करुनही का मिळाले नाहीत पैसे ? जाणून घ्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.