AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Export : निर्यातदारांना आता उन्हाळी हंगामातील कांद्याची प्रतिक्षा, लाल कांद्याचा काय आहे ‘वांदा’ ?

सध्या बाजारपेठेत आवक होत असलेला कांदा हा साठवणूकीतला किंवा खरीप हंगामातलाच आहे. असे असतानाही देशातून कांदा निर्यात ही अत्यल्प प्रमाणात सुरु आहे. कारण  लाल कांदा हा निर्याती योग्य नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कांद्याच्या निर्यातीमध्ये 10 लाख 55 हजार टनाची घसरण झाली आहे. कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाकडे  उपलब्ध आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत कांद्याची निर्यात 24 टक्क्यांनी घसरली आहे.

Onion Export : निर्यातदारांना आता उन्हाळी हंगामातील कांद्याची प्रतिक्षा, लाल कांद्याचा काय आहे 'वांदा' ?
खरीप आणि उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक वाढल्याने दर घसरत आहेत.
| Updated on: Feb 24, 2022 | 5:05 AM
Share

मुंबई : सध्या बाजारपेठेत आवक होत असलेला कांदा हा साठवणूकीतला किंवा खरीप हंगामातलाच आहे. असे असतानाही देशातून कांदा निर्यात ही अत्यल्प प्रमाणात सुरु आहे. कारण (Red Onionलाल कांदा हा निर्याती योग्य नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत (Onion Export) कांद्याच्या निर्यातीमध्ये 10 लाख 55 हजार टनाची घसरण झाली आहे. कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाकडे  उपलब्ध आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत कांद्याची निर्यात 24 टक्क्यांनी घसरली आहे. गतवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 6 लाख 72 हजार टनांवरून चालू आर्थिक वर्षात याच कालावधीत 4 लाख 34 हजार टनांवर आली आहे.2020-21 मध्ये (Maharashtra) राज्यातून किमान 8 लाख टन निर्यात झाली होती, तर 2019-20 मध्ये हा आकडा 7 लाख 29 हजार टन होता. देशातील कांद्याची लागवड करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश सर्वाधिक आहे.

यामुळे घटतेय निर्यात

शेतीमालाची निर्यात परकीय चलन मिळवून उत्पन्नात वाढ करण्यासाठी केली जाते. पण देशांतर्गत बाजारपेठेतच अधिकचा दर मिळत असेल तर कशाला निर्यात असा विचार शेतकरी करुन लागले आहेत. त्यामुळेच निर्यातीचे प्रमाण घटत असल्याचे नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे कार्यकारी संचालक पी.के.गुप्ता यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे दर 18 ते 22 रुपये किलोपर्यंत होते, तर देशांतर्गत बाजारात 20 ते 25 रुपये किलोच्या दरम्यान होते.सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातलेली नाही, मात्र कांद्याचा पुरवठाच होत नसल्याने निर्यातदारांची पळापळ सुरु आहे

उन्हाळी कांद्याच्या आवक नंतरच बदलणार चित्र

सध्या कांद्याची आवक सुरु असतनाही सरासरी एवढा दर मिळत आहे. कारण त्याच प्रमाणात मागणीही सुरु आहे. उन्हाळी कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली की कांद्याचे दर कमी होतील असा अंदाज फलोत्पादन निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अजित शहा यांनी व्यक्त केले. सध्या लासलगाव ठोक बाजारात लाल कांद्याला अडीच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. भारतीय उन्हाळी कांदा पिकांचा हंगाम लवकरच सुरू होत असून तो तीन ते चार महिने चालू राहू शकतो. अशा वेळी निर्यातीत वाढ होण्याची शक्यता आहे,’ असे ते म्हणाले.

कांदा वाहतूकीच्या दरातही वाढ

या आर्थिक वर्षात मालवाहतुकीचे शुल्क 5 रुपये प्रति किलोवरून 11-12 रुपये प्रति किलो पर्यंत जवळपास दुप्पट झाले आहे, ज्याचा परिणाम कांदा निर्यातीवरही झाला. कंटेनरची उपलब्धताही नाही. शिवाय कांद्याची गुणवत्ताही निकृष्ट असल्याने महाराष्ट्रातील बेमोसमी पावसाचा बहुतांश उत्पादनावर परिणाम झालाआहे. बाजार समित्या आणि उपसमित्यामध्ये कांद्याची आवक दिवसाला 40 ते 50 हजार क्विंटलवरून सुमारे 20 हजार क्विंटलपर्यंत आली असल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Photo : पपईची काढणी नव्हे तर रोटाव्हेटरने मोडणी, शेतकरी हताश

फेब्रुवारी महिन्यात ‘या’ पिकांची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा, काय आहे शास्त्रज्ञांचा सल्ला?

Rabi Season: हरभऱ्याचे क्षेत्र वाढले-उत्पादन घटले, अंतिम टप्प्यात नेमके काय झाले ?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.