Farmer Digital ID : देशातील शेतकर्यांना खास ओळख; मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक, काय आहे डिजिटल ID, कसा आणि कुठे होणार वापर
Farmer Digital Identity Card : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार नवीन वर्षात अजून एक गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. देशातील शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणेच एक 12 अंकांचा एक खास ओळखपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यात येणार आहे. काय आहे या कार्डचा फायदा, कुठे करणार त्यासाठी नोंदणी?

भारत झपाट्याने विकसीत राष्ट्राकडे आगेकूच करत असला तरी भारताची खरी ओळख ही कृषीप्रधान देश अशीच आहे. आजही 60 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागातच राहते. शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. राज्य सरकारसोबत अनेक अनुदान, योजना राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीएम किसान योजनांसह इतर अनेक योजनांचा थेट फायदा देण्याची प्रक्रिया गेल्या पाच वर्षात राबवण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार नवीन वर्षात अजून एक गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. देशातील शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणेच एक 12 अंकांचा एक खास ओळखपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यात येणार आहे. काय आहे या कार्डचा फायदा, कुठे करणार त्यासाठी नोंदणी? ...
