AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनाच विकत घेता येणार आता कृषी विद्यापीठाचे बियाणे

आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विद्यापीठही पुढाकार घेऊ लागली आहेत. रब्बी हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाचे बियाणे हे विकत घेता येणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाचे बियाणे विकत घ्यावयाचे झाले तर शेतकऱ्यांना थेट परभणी येथील विद्यापीठात जावे लागत होते. आता मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येथील विद्यापीठाच्या केंद्रावरच बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांनाच विकत घेता येणार आता कृषी विद्यापीठाचे बियाणे
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 4:46 PM
Share

औरंगाबाद : रब्बी हा उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा राहणार आहे. त्याअनुशंगाने प्रशासकीय स्तरावरही प्रयत्न हे सुरु आहेत. एवढेच नाही तर आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विद्यापीठही पुढाकार घेऊ लागली आहेत. रब्बी हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाचे बियाणे हे विकत घेता येणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाचे बियाणे विकत घ्यावयाचे झाले तर शेतकऱ्यांना थेट परभणी येथील विद्यापीठात जावे लागत होते. आता मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येथील विद्यापीठाच्या केंद्रावरच बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.

गेल्या चार वर्षापासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत हंगामाच्या तोंडावर बियांणे उपलब्ध करून देत आहे. याचा फायदा मात्र, विद्यापीठालगतच्याच शेतकऱ्यांनाच झालेला होता. यावर्षीपासून औरंगाबाद येथील केंद्रावरही बियाणे उपब्ध असणार आहे. याकरिता शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे अवाहन प्रा. रामेश्वर ठोंबरे यांनी केले आहे. आता शेतकऱ्यांना बियाणासाठी परभणीला जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

विद्यापीठ बियाणास मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, पुरवठा होत नसल्याने शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत होते. आता बियाणे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार असल्याचे प्रा. ठोंबरे यांनी सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येथील विभागीय कृषी विस्तार केंद्र पैठण रोड येथे हे बियाणे उपलब्ध राहणार आहे.

रब्बी हंगामातील या पिकाचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणार

रब्बी हंगामात यंदा शेतकऱ्यांचा भर हा हरभरा पिकावर राहणार आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या बियाणाला प्राधान्य हे दिले जाणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत करडई, हरभरा, ज्वारी, जवस या पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे. याकरिता रामेश्वर ठोंबरे यांच्या 9420406901 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

बियाणांचे असे असणार आहेत दर

ज्वारी परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी सुपर मोती या वाणाच्या चार बॅग ह्या एका शेतकऱ्यास मिळणार असून याची किमंत ही प्रतिबॅग 320 रुपये राहणार आहे. बीडीएनजीके 797 या वाणाचा हरभऱ्याची 10 किलोची बॅग 800 रुपयांना राहणार आहे. तर काबुली बीडीएनजीके 798 ही 10 किलोची बॅग ही 1000 रुपयांना राहणार आहे. करडई पी.बी.एन.एस 12 (परभणी कुसुम ) पी.बी.एन.एस 86 (पूर्णा) ही 5 किलोची बॅग 500 रुपयांना राहणार आहे. तर लातूर 93 वाणाचे जवस याची 5 किलोची बॅग ही 500 रुपयांना राहणार आहे.

शेतकऱ्यांची सोय होणार

दरवर्षी ऐन हंगामात बियाणांचा तुटवडा भासत असतो. शिवाय विक्रते हे कृत्रिम टंचाई निर्माण करतात. यंदा मात्र विद्यापीठाकडूनच पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय ही टळणार आहे. (farmers can buy seeds of agricultural universities now)

इतर बातम्या :

अरे बापरे!! माजी मुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा येण्यापूर्वी कारवर कोसळला वटवृक्ष, औरंगाबादमध्ये रस्त्यावरील कारचं मोठं नुकसान

Nitin Gadkari : पत्नीला न सांगता जेव्हा सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला! नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

गणपती दर्शनाला जाताना अपघात, उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून पुण्यात बाईकस्वारांचा मृत्यू

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.