पाऊस गेला गावाला, आता लागा कामाला ; काय आहे शेतकऱ्यांना सल्ला

आता पाऊस संपला असून शेतकऱ्यांनी खरीपातील रखडलेली कामे आटोपून रब्बीच्या तयारीला लागण्याचा सल्ला हवामानतज्ञ डख यांनी दिला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष: सोयाबीनच्या उत्पादनात घट झालीच आहे. शिवाय पावसात भिजल्याने सोयाबीन हे डागाळलेले आहे. आता पावसाने उघडीप दिली असून या काळात शेतकऱ्यांनी नेमके कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे आणि रब्बीची कशी तयारी करावी याबाबत आपण पाहणार आहोत..

पाऊस गेला गावाला, आता लागा कामाला ; काय आहे शेतकऱ्यांना सल्ला
पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन मळणीची लगबग
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 11:13 AM

लातूर : पावसाचा अंदाज वर्तवला तरी शेतकऱ्यांची धाकधूक होत होती. गेल्या दोन महिन्यापासून हे चक्र सुरु होते. कधी नव्हे ते शेतकरी हे पावसाच्या अंदाजाबाबत कमालीचे जागृत झाले होते. यंदा हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेले अंदाज अगदी तंतोतंत ठरले आहेत. पण आता (Rain Stop) पाऊस संपला असून शेतकऱ्यांनी खरीपातील रखडलेली कामे आटोपून रब्बीच्या तयारीला लागण्याचा सल्ला हवामानतज्ञ डख यांनी दिला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष: सोयाबीनच्या उत्पादनात घट झालीच आहे. शिवाय पावसात भिजल्याने सोयाबीन हे डागाळलेले आहे. (Rabbi Hangam) आता पावसाने उघडीप दिली असून या काळात शेतकऱ्यांनी नेमके कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे आणि रब्बीची कशी तयारी करावी याबाबत आपण पाहणार आहोत..

दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे ती आता कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे बुधवारपासून मराठवाड्यात सुर्यदर्शन होत आहे. अनेक शेतकऱ्यांची अजूनही खरीपातील कामे रखडलेली आहेत शिवाय रब्बीच्या पेरणीला उशीर होत आहे. त्यामुळे आता योग्य नियोजन केले तरच रब्बी साधणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

या कामांना द्या प्राधान्य

रब्बीच्या पेरणीचा मोसम हा सप्टेंबर महिन्यातच असतो. यंदा मात्र, पावसामुळे वेळेत पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. अजूनही खरीपातील पिकांची काढणी आणि मळणी हीच कामे सुरु आहेत. पण सध्या ऑक्टोंबर हीट जाणवू लागलेली आहे. पाऊस अधिक प्रमाणात झाला असला तरी शेतजमिनी ह्या आवळून येत आहेत म्हणजे भुसभुशीत राहिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हलक्या प्रकारची मशागतीची कामे करुन जमिनीत ओल आहे तोपर्यंत पेरणी कामे उरकून घ्यावी लागणार आहेत.

उशीराने पेरणीचा काय परिणाम होणार ?

दरवर्षी रब्बीची पुर्वतयारी म्हणून मशागतीला अधिकचे महत्व दिले जाते. मात्र, खरीप हंगामात नांगरण, मोगडण केल्याने आता पुन्हा मशागत करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने रोटरुन पेरणी केली तरी उगवण क्षमतेवर काही फरक पडणार नाही. शिवाय यंदा दीड महिना उशीराने पेरणी होत आहे. मात्र, याचा उत्पादनावर काही परिणाम होणार नसल्याचे मत कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केले आहे.

सोयाबीनची मळणी अन् कापसाची तोडणी

पावसामुळे सोयाबीन काढणीत अनेक वेळा अडथळे आले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांची काढणीची कामे राहिली आहेत तर काहींनी काढणी करुन गंजी लावलेल्या आहेत. आता 20, 21, 22, 23, 24, 25, 26 व 27 ऑक्टोबर ला राज्यात वातावरण कोरडे राहणार आहे. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी काढणी-मळणी करुन सोयाबीन हे ऊनात वाळवून साठवणूक करणे आवश्यक आहे. शिवाय डागाळलेल्या सोयाबीनची आहे त्या दरात विक्री करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे राहणार आहे.

कांद्यावर फवारणी गरजेची

ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा कांदा पीकावर होत आहे. पावसाळी कांदा लागवड करुन काही दिवसाचाच कालावधी लोटलेला आहे. मात्र, दोन दिवसांपासून थंडी वाढलेली आहे. त्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात मिसळून करणे आवश्यक आहे. शिवाय धुईचे प्रमाणही वाढत असल्याने कांद्याचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे ही फवारणी त्वरीत करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. (Farmers prepare for rabi season as rain stops stalled work)

संबंधित बातम्या :

कशामुळे होतेय मोसंबीची फळगळती ? ; असे करा व्यवस्थापन

केळीमध्येही बुरशीजन्य रोग, वेळीच काळजी घ्या अन्यथा उत्पादनावर परिणाम

नागपूरी संत्री सातासमुद्रापार, मोसंबीच्या निर्यातीचाही मार्ग मोकळा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.