शेतकरीही वर्तवणार आता पावसाचा अंदाज, हवामान तज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला

गेल्या काही वर्षांपासून हवानान तज्ञ पंजाबराव डख हे हवामानाचा अंदाज वर्तवत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनाही आता याबाबत अंदाज बांधता येणार असल्याचे त्यानी सांगितले आहे... त्यांच्या या सल्ल्यामुळे शेतकऱ्यांनाच काय काळजी घ्यावयाची हे देखील समजणार आहे

शेतकरीही वर्तवणार आता पावसाचा अंदाज, हवामान तज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला
संग्रहित छायाचित्र

लातूर : यंदा हवामान तज्ञांनी पावसाबाबत दिलेले अंदाज तंतोतंत खरे ठरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही काळजी घेण्याच्या दृष्टीने या अंदाजाचा फायदा होत आहे. पुढील 8 दिवस हवामान कसे राहणार हे हवामान तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे पिकाची काळजी घ्यावयाची कशी, उपाययोजना काय राबवयच्या याचा अंदाज शेतकऱ्याला बांधता येत आहे. गेल्या काही वर्षांपासून हवानान तज्ञ पंजाबराव डख हे हवामानाचा अंदाज वर्तवत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनाही आता याबाबत अंदाज बांधता येणार असल्याचे त्यानी सांगितले आहे… त्यांच्या या सल्ल्यामुळे शेतकऱ्यांनाच काय काळजी घ्यावयाची हे देखील समजणार आहे..त्यांचा एक सल्ला शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे…चला तर मग पाहू पंजाब डख यांनी एका कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना काय सल्ला दिला आहे ते…
पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? पंजाबराव डख यांनी सांगितले काही इंडिकेटर

पाऊस येण्यापूर्वीची ही आहेत लक्षणे…

घरातील लाईट, बल्ब, ट्युब भोवती किडे, पाकुळ्या आल्यातर समजावे पुढील ७२ तासांत पाऊस पडणार आहे.

वारा बंद होणे, सरपटणारे प्राणी बिळातून बाहेर पडू लागले, गर्मी जास्त जाणवू लागली तर समजावे पाऊस पडणार आहे.

पावसाळ्यात दिवस मावळत असताना, पश्चिमेस सायंकाळच्या वेळेला आकाश लालसर, तांबडे दिसले तर जुने लोक ‘बी’ पडलं असे म्हणायचे. अशावेळी 72 तासांत पाऊस पडणार समजावे.

चिमण्यांनी घरासमोरील अंगणातील धुळमातीत आंघोळ केल्यास 72 तासांत पाऊस पडणार समजावे.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सकाळी आपण शेतात गेल्यास पाय ओले झाले, दव पडलेले असले व पत्र्यावरून अंगणात पाणी पडले तर त्यादिवशी पाऊस पडत नाही. ज्यादिवशी दव पडणार नाही त्यावेळी पाऊस होतो.

ज्यावर्षी गावरान आंबा जास्त पिकतो, आपण खुप रस खातो. त्यावर्षी दुष्काळ पडतो, असे समजावे.

वावटळ, वाळुट सुटल्यावर 72 तासांत पाऊस पडणार समजावे.

सूर्याभोवती 11 जुनला दुपारी 12 वाजता गोल रिंगण, खळे दिसले की दुष्काळ पडतो. पावसाचा अंदाज कसा बांधला जातो या संदर्भात पंजाब डख यांनी ही माहिती दिलेली आहे.

शेतकऱ्यांनी पीकाची काय काळजी घ्यावी

17 ऑक्टोंबरपासून पुन्हा पावसाला सुरवात होणार असल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे 10 ते 16 ऑक्टोंबर दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीनची कमीत कमी काढणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर जर पावसाने उघडीप दिली तर यंत्राच्या सहायाने लागलीच मळणी करणे आवश्यक आहे. यापुर्वीच पावसामुळे पीकांचे नुकसान हे झालेले आहे. भविष्यातही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.

बदलत्या वातारवरणाचा द्राक्ष बागांनाही धोका

पावसाबरोबरच वातावरणातही बदल होणार आहे. त्यामुळे केवळ खरीपातील पीकांनाच नाही तर फळबागांवरही या वातावरणाचा परिणाम होणार आहे. द्राक्षाचे पीक आता तोडणी अवस्ठेत आहे. मात्र, धुई, धुके यापासून धोका आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार यांनीही काळजी घेण्याचे अवाहन करण्यात आलेले आहे. 11 ते 16 ऑक्टोंबर दरम्यान, थंडी व सुर्यदर्शन होणार आहे. त्यामुळे या वातावरणात सोयाबीनची काढणी-मळणी तर कापसाची वेचणीची कामे पार पडणे आवश्यक आहे. 17 ऑक्टोंबरपासून राज्यात पुन्हा पावसाचा धोका असल्याचे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे.  (Farmers to predict rain now, weather experts advise farmers)

संबंधित बातम्या:

नैसर्गिक आपत्तीमुळे जनावराचा मृत्यू ; नुकसानभरपाईसाठी असा करा अर्ज…

ज्याला मागणी, त्याच फळाची होणार लागवड ; सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पात्रतेबाबत ‘अफवा अन् वास्तव’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI