Banana Rate : अवकाळी, कडाक्याच्या थंडी नंतरही केळीचा गोडवा कायम, 15 दिवसांमध्ये दर दुप्पट होण्याचे काय कारण?

निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली तरी पुन्हा बाजारपेठेत वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना थोड्याबहुत प्रमाणात का होईना दिलासा मिळालेला आहे. मात्र, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम राहिल्या होत्या. अवकाळी अन् सततच्या पावसामुळे केळी बागांवर किडींचा प्रादुर्भाव तर होताच पण पुन्हा थंडीत वाढ झाल्याने पंधरा दिवसापूर्वी 4 ते 5 हजार रुपये क्विंटल असे दर होते.

Banana Rate : अवकाळी, कडाक्याच्या थंडी नंतरही केळीचा गोडवा कायम, 15 दिवसांमध्ये दर दुप्पट होण्याचे काय कारण?
थंडीत वाढ झाल्याने निर्यातही लांबवणीवर पडत आहे. पण मागणी अधिक असल्याने याचा दरावर काही परिणाम होणार नाही
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 5:00 AM

जळगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली तरी पुन्हा बाजारपेठेत वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना थोड्याबहुत प्रमाणात का होईना दिलासा मिळालेला आहे. मात्र, (Banana production) केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम राहिल्या होत्या. (Untimely Rain) अवकाळी अन् सततच्या पावसामुळे केळी बागांवर किडींचा प्रादुर्भाव तर होताच पण पुन्हा थंडीत वाढ झाल्याने पंधरा दिवसापूर्वी 4 ते 5 हजार रुपये क्विंटल असे दर होते. मात्र, आता चित्र बदलले आहे. कारण थंडी गायब झाली असून उन्हामध्ये वाढ झाली आहे तर दुसरीकडे महाशिवरात्रीच्या पारर्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून मागणी वाढत आहे. त्यामुळे (Banana Rate) केळी दराचे चित्रच बदलले आहे. आता राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये 15 ते 16 हजार रुपये टन असा दर आहे. त्यामुळे देर आए दुरुस्त आऐ, अशीच अवस्था झाली आहे.

व्यापाऱ्यांकडून साठवणूकीला प्राधान्य

केळीचे दर वाढण्यासाठी आता कुठे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अन्यथा निसर्गाचा लहरीपणा त्यात पुन्हा वातावरण पोषक नसल्याने दरात वाढ होत नव्हती. पण गेल्या 8 दिवसांपासून केळी दराबाबत सर्वकाही बदलत आहे. महाशिवरात्रीनिमित्त केळीला मोठी मागणी असते. शिवाय केळीच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे केळीची वाढीव दरामध्ये खरेदी करुन साठवणूक करण्यावर व्यापारी भर देत आहेत. आतापर्यंत केळी खरेदीकडे व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते पण वातावरणातील बदल आणि भविष्यातील महाशिवरात्री यामुळे दरात दुपटीने वाढ झाली आहे.

प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी निर्णय घेतला अन् आता पश्चाताप

मध्यंतरी केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती. शिवाय त्यात पुन्हा ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे वाढीव दर तर सोडाच पण तोडणीही परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी केळी तोडणी न करता थेट केळीच्या बागाच काढून टाकणे पसंत केले होते. यानंतर आता अवघ्या 15 दिवसांमध्ये विक्रमी दर मिळू लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी गडबडीत हा निर्णय घेतला आता त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली आहे.

आता मोजक्याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

निसर्गाचा लहरीपणा त्यात घसरलेले दर यामुळे अनेक शेतकऱ्यांनी थेट केळीच्या बागच मोडल्या आहेत. पण आता गेल्या दीड वर्षात जो दर मिळाला नव्हता तो दर केळीला मिळालेला आहे. त्यामुळे प्रतिकूल परस्थितीमध्ये ज्यांनी जोपासणा केली अशा मोजक्याच शेतकऱ्यांना या वाढीव दराचा लाभ होत आहे. भविष्यातील मागणी आणि शेतकऱ्यांकडील घटलेले उत्पादन यामुळे व्यापारी केळी खरेदी करुन साठवणूकीवर भर देत आहेत.

संबंधित बातम्या :

काय सांगता? दोन वर्षात 14 हजार कांदाचाळींचे नियोजन, असा घ्या अनुदानाचा लाभ अन् कांद्याचे संरक्षण करा

Crop Insurance Scheme : आता शेतकऱ्यांच्या दारात येऊन होणार योजनेची अंमलबजावणी, काय आहे सरकारचा उद्देश?

Cotton Crop: कापसाच्या वाढत्या दरामुळे कृषी विभागाचे धोरणही बदलले, हंगामाच्या अंतिम टप्प्यात विक्रमी दर

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.