AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी विधेयकविरोधी आंदोलनात राहुल गांधी यांची उडी, ट्रॅक्टर चालवून नोंदवणार निषेध

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनात भाग घेणार असल्याचं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे.(Rahul Gandhi will take part in the farmers' agitation)

कृषी विधेयकविरोधी आंदोलनात राहुल गांधी यांची उडी, ट्रॅक्टर चालवून नोंदवणार निषेध
RAHUL GANDHI
| Updated on: Sep 28, 2020 | 4:11 PM
Share

दिल्ली : कृषी विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर देशभरातील शेतकरी आक्रमक झाल्यानंतर, आता काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi ) पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनात भाग घेणार असल्याचं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे. पुढील आठवड्यात पंजाबमध्ये ट्रॅक्टर चालवून ते आंदोलनात सहभागी होतील. (Former Congress president Rahul Gandhi will take part in the farmers’ agitation against farm bill in Punjab)

कृषी विधेयकांविरोधात (farm bill) शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. काँग्रेसनेही विधेयकांना विरोध करत, या आंदोलनात उडी घेतली आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणासोबतच सर्व राज्यात काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन छेडलं जाणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंजाबमध्ये ट्रॅक्टर चालवत या आंदोलनात भाग घेतील.

पंजाबमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर पेटवला

पंजाबमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून जाळपोळ झाल्याच्या घटनाही घडल्याचं समोर आलं आहे. नवी दिल्लीत  आंदोलकांनी इंडिया गेटवर जमून ट्रॅक्टर पेटवला. याबाबत विचारले असता ” 10 ते 15 आंदोलकांनी इंडिया गेटवर जमत ट्रॅक्टर जाळल्याचं समजलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. तसेच आग विझवून ट्रॅक्टर रस्त्यातून बाजूला केला” असं दिल्लीच्या डीसीपींनी माध्यमांना सांगितलं.

#WATCH: Punjab Youth Congress workers stage a protest against the farm laws near India Gate in Delhi. A tractor was also set ablaze. pic.twitter.com/iA5z6WLGXR

— ANI (@ANI) September 28, 2020

दरम्यान मंजूर झालेल्या कृषी विधेयकांवर राहुल गांधी घणाघाती टीका करताना दिसतात. प्रस्तावित कृषी विधेयकं ही शेतकरी विरोधी असून, राहुल गांधी यांनी सरकारला भांडवलदारधार्जीनं म्हटलं आहे. तसेच कृषी विधेयकं राज्यसभेत मंजूर करताना राबवलेली प्रक्रीया आणि झालेल्या गोंधळावर भाष्य करताना त्यांनी भारतातीली लोकशाही मेली आहे, असं म्हणत शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून, लक्ष देण्याचं आवाहन पंतप्राधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे.

संबंधित बातम्या :

कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ : बाळासाहेब थोरात

Agitation | राज्यात धनगर आणि मराठी आरक्षणासाठी तसेच कृषी विधेयकाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं

Bharat Band LIVE | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाच्या जीआरची होळी

(Former Congress president Rahul Gandhi will take part in the farmers’ agitation against farm bill in Punjab)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.