AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांगली बातमी! मोदी सरकार सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार, अर्ज करा आणि लाभ मिळवा

आता केसीसी फक्त शेतीपुरते मर्यादित नाही. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. किसान क्रेडिट कार्डद्वारे सरकार शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. कर्जावरील व्याज 9 टक्के असले तरी त्याला सरकारकडून 2% सबसिडी मिळते. यासह कर्जावर फक्त 7 टक्के व्याज भरावे लागते.

चांगली बातमी! मोदी सरकार सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार, अर्ज करा आणि लाभ मिळवा
किसान क्रेडिट कार्ड
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 7:26 AM
Share

नवी दिल्ली : जर तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेऊ शकते. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माहितीनुसार सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) दिले जाणार आहे. ते म्हणाले की, साथीच्या काळातही शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान केले गेलेत. सर्व शेतकऱ्यांना केसीसी अंतर्गत आणण्यासाठी सरकार गेल्या वर्षापासून मोहीम राबवत आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, केंद्रीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे आणि पैशांची कमतरता अडथळा बनू नये. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना स्वस्तात कर्ज मिळते

आता केसीसी फक्त शेतीपुरते मर्यादित नाही. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. किसान क्रेडिट कार्डद्वारे सरकार शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. कर्जावरील व्याज 9 टक्के असले तरी त्याला सरकारकडून 2% सबसिडी मिळते. यासह कर्जावर फक्त 7 टक्के व्याज भरावे लागते.

KCC कोण घेऊ शकतो?

शेती, मत्स्यपालन आणि पशुपालनाशी संबंधित कोणतीही व्यक्ती, जरी त्याने दुसऱ्याच्या जमिनीवर शेती केली, तरी याचा लाभ घेऊ शकतो. किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे असावे. जर शेतकऱ्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर सह-अर्जदार देखील आवश्यक असेल. ज्यांचे वय 60 पेक्षा कमी आहे. शेतकऱ्याचा फॉर्म भरल्यानंतर बँक कर्मचारी तुम्हाला पात्र आहे की नाही हे पाहतील.

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया

KCC मिळवणे सोपे आहे, यासाठी आधी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत साईटवर जा आणि इथून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाऊनलोड करा. तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जमिनीची कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा लागेल. येथे तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्ही इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर कोणतेही किसान क्रेडिट कार्ड बनवले नाही. यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

KCC साठी आवश्यक कागदपत्रे

ओळखपत्रासाठी, तुमच्याकडे मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स हे अॅड्रेस प्रूफ म्हणून पाहिले जाते.

संबंधित बातम्या

सरकारकडून निर्यातदारांना गिफ्ट, 31 डिसेंबरपर्यंत प्रलंबित कर परताव्यासाठी करता येणार अर्ज

रेल्वे कौशल्य विकास योजना सुरू, हजारो लोकांना लाभ मिळणार, जाणून घ्या

Good news! Modi government will give Kisan credit card to all farmers, apply and get benefits

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.