Puntamba : शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनात मोफत फळांचे वाटप, पुणतांब्यात नेमके चित्र काय ?

1 जूनपासून नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनाला सुरवात केली होती. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या तर आता आज सरकारच्या निर्णयाचा आणि धोरणाचा निषेध करण्यासाठी एक वेगळाच प्रयोग आंदोलनाच्या ठिकाणी केला आहे. ज्या शेतीमालाला कवडीमोल दर मिळत आहे अशा सर्वच फळे आणि भाजीपाला हा फुकटात वाटप करण्यात आला.

Puntamba : शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनात मोफत फळांचे वाटप, पुणतांब्यात नेमके चित्र काय ?
पुणतांबा शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 12:14 PM

शिर्डी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन (Puntamba) पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवदेन तर दिले होतेच शिवाय समस्या सोडवण्याबाबत काही दिवसांची मुदतही दिली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर येथील शेतकऱ्यांनी पुणतांबा ग्रामपंचायतीसमोर 5 दिवसीय (Dharna movement) धरणे आंदोलनाला सुरवात केली आहे. आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कवडीमोल दर मिळत असलेल्या शेतीमालाचा मुद्दा समोर केला. सध्या (Onion) कांद्यासह कलिंगड, द्राक्ष याच्या दरात मोठी घट झाली आहे त्यामुळे ही फळे आणि कांदा हा आंदोलनाच्या ठिकाणीच मोफत वाटप करुन सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पहिल्या दिवशी तर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे.

आंदोलनात असा हा निषेध

1 जूनपासून नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनाला सुरवात केली होती. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या तर आता आज सरकारच्या निर्णयाचा आणि धोरणाचा निषेध करण्यासाठी एक वेगळाच प्रयोग आंदोलनाच्या ठिकाणी केला आहे. ज्या शेतीमालाला कवडीमोल दर मिळत आहे अशा सर्वच फळे आणि भाजीपाला हा फुकटात वाटप करण्यात आला. स्थानिक पातळीवर शेतीमालाची काय स्थिती आहे हे दाखवून देण्यासाठी अशा वेगळ्या प्रकारे आंदोलनात उपक्रम राबवले जात आहेत. यावेळी कांदा, द्राक्ष आणि कलिंगड नागरिकांना फुकट वाटले. यामुळे तरी किमान शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणे महत्वाचे आहे.

आंदोलनात गाजतोय अतिरिक्त उसाचा मुद्दा

राज्यात 5 जूनपर्यंत साखर कारखाने हे सुरु राहणार आहेत. असे असताना सबंध राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. पुणतांबा येथील आंदोलनामध्ये ऊसाच्या गाळपासून ते साखरेच्या उत्पादनपर्यंत विषय घेण्यात आले आहेत. राज्यात विशेषत: मराठवाड्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. त्यामुळे शिल्लक ऊस उत्पादकांना अनुदान द्यावे, उर्वरीत ऊसाचे वेळेत गाळप करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. शिवाय दुसऱ्या दिवसापासून पंचक्रोशीतील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी येण्यास सुरवात झाली आहे.

हे सुद्धा वाचा

आंदोलकांच्या निशान्यावर राज्य सरकार

आंदोलनापूर्वीच राज्यभरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांनी राज्य सरकारला दिले होते. शिवाय त्यावर निर्णय घेण्यासाठी आठ दिवसाची मुदतही देण्यात आली होती. असे असताना राज्य सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे 1 जुन पासून पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी 5 दिवसीय धरणे आंदोलन सुरु केले आहे. राज्य सरकारच्या भूमिकेमुळेच शेतीमालाच्या दरात घसरण झाली आहे. शिवाय शेतीमालाचे दर वाढवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नसल्याने आंदोलकांनी राज्य सरकारला निशान्यावर ठेऊन मागण्या मांडल्या आहेत.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.