काटेरी वनस्पतींमध्ये उगविले पेरु; वयाच्या ७० व्या वर्षी शेतकऱ्याची कमाल

शेतात पाण्याची कमतरता होती. त्यामुळं रामसिंह राठोड यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. थेंब-थेंब पाणी रोपांना मिळते. वर्षभर पहारेदारी केल्यानंतर त्यांनी सुमारे ५०० रोपांची लागवड केली.

काटेरी वनस्पतींमध्ये उगविले पेरु; वयाच्या ७० व्या वर्षी शेतकऱ्याची कमाल
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 2:13 PM

नवी दिल्ली : इटावा येथील रहिवासी रामसिंह राठोड यांनी काटेरी वनस्पती असलेल्या जमिनीत फळांची (Orchard Cultivation) शेती (Agriculture) केली. पेरुचे त्यांनी २०० रोप लावले. अनारचे १९०, तर लिंबूचे १०० रोप लावले. यावेळी आपल्या शेतातील उत्पन्न मोफत वाटत आहेत. त्यांच्या मते, यातून पुढच्या वर्षी सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न होईल. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वय महत्त्वाचे नाही. शेतीसाठीही ही गोष्टी लागू होते. इटावा येथील ७० वर्षीय राम सिंह राठोड यांनी असंच काहीतरी वेगळं केलंय. इटावा हे ठिकाणी यमुना आणि चंबळ नदीच्या खोऱ्यात बसलेलं आहे. बाबूळशिवाय काटेरी वनस्पती आहेत. दुसरी शेती केल्यास खूप मेहनत करावी लागते.

अशी सुरू झाली शेती

रामसिंह राठोड शहरात दुकान चालवत होते. दरम्यान त्यांनी कामेट गावात जमीन खरेदी केली. जमिनीच्या मागे भूमाफिया लागले. जमिनीच्या संरक्षणासाठी रामसिंह शेतात घर बांधून राहू लागले. शेतीला कुंपण केले. काही भागात मोहरीची लागवड केली. त्यानंतर शेतीत त्यांना आवड निर्माण झाली. त्यामुळं त्यांनी २०० पेरुचे, १९० अनारचे तर १०० रोप ही लिंबूचे लावले. ही लागवड सुमारे दीड एकर जागेत केली.

सिंचनासाठी असा केला जुगाड

शेतात पाण्याची कमतरता होती. त्यामुळं रामसिंह राठोड यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. थेंब-थेंब पाणी रोपांना मिळते. वर्षभर पहारेदारी केल्यानंतर त्यांनी सुमारे ५०० रोपांची लागवड केली.

इतका झाला फायदा

रामसिंह यांनी पेरुसह इतर फळांची लागवड केली आहे. पहिलं उत्पन्न त्यांनी गरजू, नातेवाईक तसेच मित्रमंडळींना मोफत दिलं आहे. त्यांच्या अंदाजानुसार पुढच्या वर्षीपासून ते दरवर्षी सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न घेऊ शकतील.

कोणतीही गोष्ट कठीण नसते. मन लावून केल्यास त्यात यश मिळतेय. त्यासाठी वयाचेही बंधन नसते. त्यामुळं सुखी आणि समृद्धीचा मार्ग हा व्यक्तीच्या विचारातून जातो. रामसिंह राठोड यांचे वय आता ७० आहे. याही काळात त्यांनी शेतीचं काम सुरू केलं. त्यामुळं कोणत्याही कामाला वयाचं बंधन नसते, हेच यातून दिसून येते. या इटावा येथील शेतकऱ्याकडून शिकण्यासारखं बरचं काही आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.