AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनला विक्रमी दर, हिंगोलीच्या शेतकऱ्याची चांदी

सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही सोयाबीनला विक्रमी 11 हजार प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा दर मिळाला असून आवक कमी असल्याने हा उच्चांकी दर मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनला विक्रमी दर, हिंगोलीच्या शेतकऱ्याची चांदी
कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 5:57 PM
Share

हिंगोली : पावसामुळे खरिपातील उत्पादनात घट होणार आहे. शिवाय शेती मालाचा दर्जाही ढासळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही सोयाबीनला विक्रमी 11 हजार प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा दर मिळाला असून आवक कमी असल्याने हा उच्चांकी दर मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चढउतार पाहवयास मिळत आहे. आतापर्यंत प्रतिक्विंटल 10 हजार हा उच्चांकी दर मिळाला होता. शिवाय पावसामुळे खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे भविष्यातही दर घटतीलच असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी विक्रमी दर मिळाला आहे. आठवड्या भरापासून बाजार समितीमध्ये नविन सोयाबीनची आवक सुरु झाली आहे. परंतु, जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन वावरातच आहे. त्यामुळे आवक कमी असली तरी दर हे समाधानकारक आहेत. जिल्ह्यात 2 लाख 57 हजार हेक्टरावर सोयाबीनचा पेरा झालेला आहे.

जुन महिन्याच्या सुरवातीला पेरा करण्यात आलेले जेएस 9305 वाणाचे सोयाबीन बाजारात दाखल होत आहे. गुरुवारच्या लिलावात एका शेतकऱ्याच्या सोयाबीनला चक्क 11 हजार 21 रुपये असा दर मिळाला आहे. त्यामुळे आगोदर आणि चांगला दर्जा असलेल्या सोयाबीनला हेच दर मिळतील असा अंदाज बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी व्यक्त केला आहे.

अचानक सोयाबीनच्या दरात उसळी

नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीलाच 10 हजारावर गेलेले सोयाबीन 8 हजार प्रतिक्विंटवर आले होते. सोयाबीनच्या अनुशंगाने लातुरची बाजारपेठ ही महत्वाची मानली जाते. या बाजार समितीमध्येही 8 हजार ते 9 हजाराचा दर मिळत आहे. परंतु, हिंगोली बाजार समितीमध्ये विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता उंचावल्या आहेत.

एकांब्याच्या शेतकऱ्याची चांदी

हिंगोली जिल्ह्यातील एकंबा येथील शेतकऱ्याने केवळ 3 क्विंटल सोयाबीन आणले होते. यालाही सरासरीप्रमाणे दर मिळेल असा आशावाद होता, मात्र, जाहीर निलावात या सोयाबीनला तब्बल 11 हजार 21 असा दर मिळाला आहे. त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याला चांगले उत्पन्न पदरी पडले आहे.

आगामी काळात दर अस्थिर राहणार

चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला सरासरी एवढा भाव राहिल मात्र, पावसामुळे सोयाबीनचा दर्जा हा ढासाळलेला आहे. त्यामुळे बाजारात दाखल होणारे सोयाबीन डागाळलेले असणार त्यामुळे मालाप्रमाणे दर राहतील.

नविन सोयाबीनची आवक सुरु

हंगामाच्या सुरुवातीला पेरा झालेले सोयाबीनची बाजारात आवक सुरु झाली आहे. याचे प्रमाण कमी असले तरी सोयाबीन हे डागाळलेले नाही. पाऊस येण्यापुर्वीच या पिकाची काढणी ही झालेली आहे. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या सोयाबीनला अधिकचा दर मिळत आहे. happy-news-for-farmers-record-break-rate-of-soyabean-in-first-sowing

इतर बातम्या :

नारायण राणेंना उंचीवरून काय बोलणार?; मनिषा कायंदे यांचा खोचक टोला

आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, हत्या करत देहाची विटंबना, डोळे काढले, हाताची बोटं दगडाने ठेचले

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, काटेकोरपणे पंचनामे करा; वडेट्टीवारांच्या सूचना

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....