Rabi Season : वावरातलं पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, ढगाळ वातावरणामुळे चिंतेचे ढग कायम

रब्बी हंगामाची सुरवात आणि आता शेवटही निसर्गाच्या लहरीपणाच्या सावटाखालीच होत आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन हरभरा पिकावर अधिकचा भर दिला आहे. मात्र, पेरणी होताच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. याचा परिणाम उत्पादनावर झालेला नसला तरी आता काढणी आणि मळणीच्या दरम्यान पुन्हा मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

Rabi Season : वावरातलं पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, ढगाळ वातावरणामुळे चिंतेचे ढग कायम
रब्बी हंगमातील हरभरा पिकाच्या काढणीला सुरवात झाली असून लातूर जिल्ह्यात मळणीची कामे सुरु आहेत.
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 2:32 PM

लातूर :  (Rabi Season) रब्बी हंगामाची सुरवात आणि आता शेवटही निसर्गाच्या लहरीपणाच्या सावटाखालीच होत आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन हरभरा पिकावर अधिकचा भर दिला आहे. मात्र, पेरणी होताच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. याचा परिणाम उत्पादनावर झालेला नसला तरी आता काढणी आणि मळणीच्या दरम्यान पुन्हा (Marathwada) मराठवाड्यात (Cloudy Weather) ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सध्या हरभऱ्याच्या काढणीची कामे मोठ्या जोमात सुरु आहेत. यातच 6 मार्च रोजी ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरी काढणी झालेल्या हरभरा आणि गव्हाची मळणी करुन पीक सुरक्षित ठिकाणी साठवणूकीचा प्रयत्न करीत आहे. गतवर्षी झाले ते यंदा होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. शिवाय मध्यंतरीच्या पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

काढणीसाठी मशनरीचा उपयोग

सध्या काढणी कामे जोमात सुरु आहेत. अशातच मजूरांची टंचाई भासत असल्याने हार्वेस्टरद्वारे गहू, हरभरा काढणीवर भर दिला जात आहे. यामुळे वेळेची बचत तर होतेच पण काढणीपासून मळणीपर्यंतची कामे पूर्ण होत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. दुसरीकडे मजुरांची टंचाई आणि वाढलेली मजूरी यामुळे थेट यंत्राचा वापर वाढत आहे. मजुरांना दिवसाकाठी 500 रुपये रोजगार द्यावा लागत आहे. शिवाय प्रत्यक्ष कढणीला सुरवात होईपर्यंत मदुरांचा भरवसा नाही. त्यामुळे आता ग्रामीण भागातही यंत्राचा वापर होत आहे.

पुन्हा पावसाचा अंदाज

मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. यातच पंजाबराव डख यांनी 6 मार्च पासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे गेली चार महिने पिकांची जोपासणा केली अन् अंतिम टप्प्यात नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी रात्रीचा दिवस करुन काढणी कामे कामे उरकून घेत आहे.

हरभरा उत्पादकतेमध्येही वाढ

पीक कापणीच्या पूर्वी कृषी विभागाकडून सुधारित उत्पादकता काढण्यात आली आहे. मराठवाड्यात सर्वाधिक उत्पादकता ही लातूर जिल्ह्यात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे उत्पन्न वाढूनही जर पावसामुळे नुकसान झाले तर त्याची भरपाई करायची कशी? यामुळे पीक काढणीच नाही तर मळणीची कामेही उरकून घेतली जात असल्याचे शेतकरी नवनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. काढणी आणि इतर कामासाठी दोन पैसे आगाव गेले तरी चालेल पण जोपासलेले पीक पदरात पडणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

Natural Farming : नैसर्गिक शेतीचा असा ‘हा’ फायदा, शेती क्षेत्रात वाढ होण्यासाठी केंद्राचे काय आहे धोरण?

Photo Gallery: काळ्या मातीत बैलगाडी शर्यतीचा थरार अन् तरुणांचा उत्साह शिघेला..!

Cashew : काजू बीच्या बाबतीत बाजारपेठेचे सूत्र ही मोडले, उत्पादन अन् दरही घटले, काय आहेत कारणे?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.