Paddy Crop : धानाची लागवड अंतिम टप्प्यात, कृषी विभागाचा सल्ला वाचा अन् उत्पादन वाढवा

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसलेला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले सध्याचे वातावरण हे स्वीट कॉर्न, बेबी कॉर्नच्या लागवडीसाठी उत्तम आहे. मात्र, लागवड करीत असतानाच च्या शेत जमिन क्षेत्रातून पाण्याचा निचरा कसा होईल हे शेतकऱ्यांना पहावे लागणार आहे. तर दुसरीकडे कीटक आणि रोगराईवरही लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

Paddy Crop : धानाची लागवड अंतिम टप्प्यात, कृषी विभागाचा सल्ला वाचा अन् उत्पादन वाढवा
धान पिकाची लागवड पूर्ण झाली असून आता उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
राजेंद्र खराडे

|

Aug 09, 2022 | 10:31 PM

मुंबई : निसर्गाच्या लहरीपणामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले धान पिकाला मात्र, फायदा झाला आहे. (Paddy Crop) धानाची लागवड आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे येथून पुढे उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.वातावरणातील बदलाचा परिणाम पिकांची उगवण होताच त्यावर जाणवतो. आता अनेक ठिकाणी धान पिकांची उगवण झाली आहे. पिके उगवताच पिवळी पडली असतील त्यावर झिंके सल्फेट 6 किलो 300 लिटर पाण्यात मिसळून एका हेक्टरावरील (Spraying on paddy) धानावर फवारावे लागणार आहे.यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव तर कमी होणारच आहे पण पीकही जोमात बहरणार आहे.तर दुसरीकडे सोयाबीन, मका, बाजरी आणि भाज्यांमधील तण काढून मशागतीची कामे केली तर उत्पादनात वाढ होणार असल्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. चारा पिकांची लागवड करण्यासाठी सध्या पोषक वातावरण असून भाई पुसा चारा-9 आणि पुसा चारा 6 या वाणाची लागवड करावी. एका हेक्टरासाठी 40 किलो बियाणे वापरावे लागणार आहे.

गाजर शेतीमधून वाढेल उत्पन्न

सध्याच्या काळात गाजर लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. पुसाचे सुधारित वाण असलेल्या वृष्टी याची लागवड शेतकरी करु शकतात. हे बियाणे एकरी 4 ते 6 किलो या प्रमाणात वापरावे लागणार आहे. तर पेरणीपूर्वी 2 ग्रॅम कॅप्टन हे बियाणांमध्ये मिसळावे लागणार आहे. तर शेतामध्ये देशी खत आणि फॉस्फरस खत टाकावे लागणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांची टोमॅटो, हिरवी मिरची, वांगी आणि फुलकोबीची रोपे तयार केली आहेत त्यांनी हवामान लक्षात घेऊन बेड पद्धतीने लागवड करावी. पाण्याचा निचरा होईल याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

पाण्याचा निचरा केला तरच उत्पादनात वाढ

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसलेला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले सध्याचे वातावरण हे स्वीट कॉर्न, बेबी कॉर्नच्या लागवडीसाठी उत्तम आहे. मात्र, लागवड करीत असतानाच च्या शेत जमिन क्षेत्रातून पाण्याचा निचरा कसा होईल हे शेतकऱ्यांना पहावे लागणार आहे. तर दुसरीकडे कीटक आणि रोगराईवरही लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.प्रत्येक जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रे अस्तित्वात आहेत. तेथील तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन उत्पादनात वाढ करावी असा सल्लाही देण्यात आला आहे.

किटकनाशकांचा असा करा बंदोबस्त

किटकामुळे उत्पादन घट होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केवळ औषध फवारणीच हा पर्याय नाहीतर शेतकरी देशी पध्दतीचाही अवलंब करु शकतात. शेत शिवारात हलके सापळे बसवून नियंत्रण ठेवता येणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना प्लास्टिकच्या टबमध्ये किंवा मोठ्या भांड्यात पाणी व काही कीटकनाशके मिसळून एक बल्ब लावून तो रात्री शेताच्या मधोमध ठेवावा लागणार आहे. कीटक प्रकाशाने आकर्षित होतील आणि त्याच द्रावणावर पडून मरतील. यामुळे पिकांसाठी हानीकारक असलेले कीटक नष्ट होतील.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें