AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton : कापूस दरात वाढ, शेतकऱ्यांनी निवडला पुन्हा ‘तो’ पर्याय, फायदा की नुकसान..!

कापूस हंगाम हा अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस संपत असताना दुसरीकडे दरात वाढ होत होती. यंदाच्या हंगामात कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी उत्पादनात झालेली घट आणि शेतकऱ्यांनी विक्री केल्यानंतर वाढलेला दर या दोन्ही बाबीतून शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. फरदडमुळे शेतीक्षेत्राचे नुकसान होते शिवाय बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होतो म्हणून शेतकऱ्यांनी फरदडमधून उत्पादन घेणे टाळले होते.

Cotton : कापूस दरात वाढ, शेतकऱ्यांनी निवडला पुन्हा 'तो' पर्याय, फायदा की नुकसान..!
यंदा वातावरणातील बदलामुळे कापसाच्या उत्पादकतेमध्ये घट झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.
| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 10:52 AM
Share

नांदेड : कापूस हंगाम हा अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी (Cotton Stock) साठवलेला कापूस संपत असताना दुसरीकडे दरात वाढ होत होती. यंदाच्या हंगामात (Cotton Rate) कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी उत्पादनात झालेली घट आणि शेतकऱ्यांनी विक्री केल्यानंतर वाढलेला दर या दोन्ही बाबीतून शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. फरदडमुळे शेतीक्षेत्राचे नुकसान होते शिवाय (Outbreak of bondage) बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होतो म्हणून शेतकऱ्यांनी फरदडमधून उत्पादन घेणे टाळले होते. पण सध्याचे वाढत असलेले दर पाहता पुन्हा पळाट्यांना पाणी देण्याचा प्रकार सुरु झाला आहे. शिवाय आता फरदडसाठी खर्च नसल्याने शेतकरी आहे त्या पाण्यावर फरदड जोपासण्यात दंग आहे. जिल्ह्यात कापासाला 10 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपली भूमिका बदललेली आहे.

अगोदर पावसाने फटका पुन्हा दराचा अवमेळ

यंदा कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी त्याचा थेट शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. शेतकऱ्यांकडे साठवणूकीतला कापूस होता तेव्हा कमी दराने विक्री करावी लागली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना कापसाने 10 हजार प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. पण याचा अधिकचा फायदा हा व्यापाऱ्यांना होत आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक केली आहे त्यांची चांदी आहे पण असे शेतकरी बोटावर मोजण्याइतपतच आहेत.

मुबलक पाणीसाठ्याचा होतोय उपयोग

खरिपात झालेल्या पावसामुळे कापसाचे नुकसान होऊन उत्पादनात घट झाली होती. घटत्या उत्पादनामुळे यंदा विक्रमी दर मिळाला आहे. सध्याच्या वाढत्या दरामुळे पळट्यास पुन्हा पाणी देऊन फरदडचे पीक घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. फरदडमुळे इतर पिकांना धोका असला तरी वाढीव दरामुळे शेतकरी नुकसान पत्करुन फरदडे पीक घेत आहेत.विहीर, बोरमध्ये मुबलक पाणी असून त्याचाच उपयोग आता हे पीक घेण्यासाठी होत आहे.

फरदडमुळे काय होते नुकसान?

कापसाचा बहर निघून गेल्यानंतरही तीन-चार महिने कापसाची जोपासना केली. एकतर ऑक्टोंबर महिन्यापासून वातावरणात बदल झाल्याने कापसावर बोंडअळीचा अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. गुलाबी बोंडअळी ही केवळ कापसावर जगत असते. तिचे हे खाद्य जानेवारी महिन्यानंतरही मिळतच राहिले तर तिचे जीवनचक्र तर वाढतेच पण तिच्या पैदासीमधून अनेक अळ्यांची उत्पत्ती होते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकावरही ह्या अळीचा धोका असतो. मात्र, जानेवारीनंतर अळीला कापसाचे खाद्यच मिळाले नाही तर ती सुप्तअवस्थेत जाते. तिचे जीवनचक्र थांबते

संबंधित बातम्या :

बडेजाव सर्जाचा, आख्खं गाव आलंय सेलिब्रेशनला, अल्पभूधारक शेतकऱ्याचं मोठं मन

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : खरिपातील पुनरावृत्ती रब्बीतही होणार का? पिकांची जोपासणा केली तरच उत्पादन पदरात

Organic Farm : हिमाचल प्रदेशचा नैसर्गिक शेतीचा आराखडा तयार, जिथे सुरवात झाला त्या महाराष्ट्रात काय?

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.