AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chemical Fertilizer : रासायनिक खताने उत्पादनात वाढ, शेतजमिनीचे काय? कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांकडून एक ना अनेक उपाययोजना केल्या जातात. काळाच्या ओघात शेतकरीही कमर्शियल झाला असून उत्पादन वाढीवरच भर दिला जात आहे. परभणी जिल्ह्यात रब्बी आणि खरीप हंगामात 1 लाख 72 हजार मेट्रीक टन रासायनिक खताचा वापर झाला आहे. ही आकडेवारी एका जिल्ह्याची असून सबंध देशात वर्षाकाठी 300 लाख लाख टन खताची गरज असल्याचे केंद्राने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. रासायनिक खतामधून उत्पादनात भर पडत असली तरी शेत जमिनीचा विचार होणेही गरजेचे आहे.

Chemical Fertilizer : रासायनिक खताने उत्पादनात वाढ, शेतजमिनीचे काय? कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
रासायनिक खत
| Updated on: Mar 23, 2022 | 6:17 AM
Share

परभणी : (Production Increase) उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांकडून एक ना अनेक उपाययोजना केल्या जातात. काळाच्या ओघात शेतकरीही कमर्शियल झाला असून उत्पादन वाढीवरच भर दिला जात आहे. परभणी जिल्ह्यात रब्बी आणि खरीप हंगामात 1 लाख 72 हजार मेट्रीक टन (Chemical Fertilizer) रासायनिक खताचा वापर झाला आहे. ही आकडेवारी एका जिल्ह्याची असून सबंध देशात वर्षाकाठी 300 लाख लाख टन खताची गरज असल्याचे केंद्राने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. रासायनिक खतामधून उत्पादनात भर पडत असली तरी (Farm Land) शेत जमिनीचा विचार होणेही गरजेचे आहे. कारण रासायनिक खताच्या अधिकच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात तर येतेच उत्पाकतेवर कायमस्वरुपी परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मधला मार्ग निवडण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

खरीप हंगामात अधिकचा वापर

उत्पादनाच्या दृष्टीने राज्यात खरीप हंगामाच महत्वाचा असतो. या दरम्यानच अधिकच्या रासायनिक खताचा वापर केला जात आहे. नगदी पिकाचे उत्पादन कमी काळात पदरी पाडून घेण्यासाठीही रासायनिक खताचा वापर वाढत आहे. अतिरिक्त रासायनिक खत हे मानवी आरोग्यासाठीही घातक असल्याचे सांगितले जात आहे. म्हणूनच पुन्हा सेंद्रीय शेतीचा उगम होत असून यासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे. खरिपातील कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकांसाठी रासायनिक खताचा अधिकचा वापर केला जात असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे.

रासायनिक खतावर काय आहे उपाय?

शेतीपध्दती बदल हा एवढा सोपा नाही पण शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना सेंद्रीय शेती पध्दतीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. शिवाय जमिनीला सेंद्रीय खताबरोबरच रासायनिक खताची जोड दिली तर उत्पादनात भर पडणार असून शेतीचा पोतही चांगला राहणार आहे. सेंद्रीय कर्ब वाढवून हे शक्य होणार आहे. यासाठी कृषी विभागाकडून गांडूळ खत, नाडेप टाके बांधकाम यासाठी अनुदान दिले जात आहे. शिवाय आता खताचे दर वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक खताला सेंद्रीय खताची जोड दिल्यास खर्चही कमी होऊन उत्पादन वाढणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

आगामी खरिपात खत दरवाढीचे संकट

देशात रासायनिक खताचा तुटवडा कायम आहे. यातच रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम खत आयातीवर झाला आहे. अशा परस्थितीमध्ये देशाअंतर्गत खताचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय केंद्राने घेतला असला तरी खताची दरवाढ ही अटळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर रासायनिक खताला सेंद्रीय खताची जोड देणेच हाच योग्य पर्याय आहे.यामुळे जमिनीचे आरोग्य टिकून राहणार असून सुपिकताही वाढणार आहे.

संबंधित बातम्या :

Good News : मार्च अखेरपर्यंत 200 कोटींची कर्जमाफी, State Government चा निर्णय नेमका कुणासाठी?

Sugar Factory : पावसाळ्याच्या तोंडावरच बंद होणार साखर कारखाने, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मिटेल का?

PM Kisan Yojna : अपात्र असूनही योजनेचा लाभ, आता Website च्या माध्यमातून करा परतावा..!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.