AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पपई फळातून चार पटीने वाढवा उत्पन्न, जाणून घ्या नेमकी काय आहे पध्दत?

देशात पपईच्या उत्पादनात वाढ होत आहे. प्रत्येक हंगामात पपईचे उत्पादन घेतले जात आहे आणि बाजारपेठेत त्याची विक्री करुन शेतकऱ्याची कमाई ही सुरु आहे. मात्र, योग्य बहरात आणि प्रक्रिया करुन पपईची विक्री केली तर शेतकऱ्याच्या उत्पन्नात तब्बल चार पटीने वाढ होणार आहे.

पपई फळातून चार पटीने वाढवा उत्पन्न, जाणून घ्या नेमकी काय आहे  पध्दत?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 6:35 PM
Share

मुंबई : देशात पपईच्या उत्पादनात वाढ होत आहे. प्रत्येक हंगामात पपईचे उत्पादन घेतले जात आहे आणि बाजारपेठेत त्याची विक्री करुन शेतकऱ्याची कमाई ही सुरु आहे. मात्र, योग्य बहरात आणि प्रक्रिया करुन पपईची विक्री केली तर शेतकऱ्याच्या उत्पन्नात तब्बल चार पटीने वाढ होणार आहे. शेतकरी प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची नोंदणी आणि विक्री करू शकतात. असेच एक उत्पादन म्हणजे पपई स्क्वॉश, कमी किंमत आणि अधिक मूल्य वाढवणारी ही प्रक्रिया आहे.

केंद्रीय कृषी विद्यापीठ पुसा समस्तीपूर येथील फलोत्पादन विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या उत्पादनवाढीबाबत महत्वाचा संदेश शेतकऱ्यांना दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कमाईमध्ये वाढ होणार आहे.

असा बनवा पपईचा रस

पईचा रस बनवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. ज्यात एक किलो पपईपासून सुमारे चार लिटर स्क्वॉश तयार केले जाते. ते बनवण्यासाठी 1.8 किलो साखर 1 लिटर पाण्यामध्ये मिसळली जाते. याशिवाय 25 ग्रॅम सिट्रिक अॅसिड, शिवाय 350 पीपीएम ची मात्रा, आणि पीपीएमच्या प्रमाणानुसार कि.मी. प्रिझर्वेटिव्ह हे मिसळावे लागते. हा रस प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरुन स्वच्छ वातावरणात आणि फ्रीजमध्ये साठवणुकीस ठेवला जातो. हे प्रक्रिया केलेले उत्पादन 6 ते 8 महिने साठवणुकीत साठवले जाऊ शकते. शेतकरी त्याची व्यावसायिक विक्री करू शकतात. जेणेकरून तो ताज्या फळांपेक्षा चार पट जास्त उत्पन्न मिळवू शकतो.

सेवनाची पद्धत

डॉ. के. प्रसाद यांनी पपई स्क्वॉशचे प्रमाणीकरण तयार केले आहे. त्यामुळे डॉ. प्रसाद शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळवून देण्याचे काम करत आहेत. हे उत्पादन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळविण्यास सक्षम करेलच परंतु कापणीनंतर झालेल्या नुकसानीचा परिणाम म्हणून देखील काम करते. प्रक्रिया केल्याने पपई उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न चौपटीने वाढतेच शिवाय कापणीनंतर होणारे नुकसानही टळते. त्यामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होतो.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ कशी होणार?

डॉ. प्रसाद यांच्या मते, शेतकरी उत्पादन वाढीसाठी कष्ट घेतात मात्र, विक्रीच्या दरम्यान न पोसलेलीच फळे विक्रीसाठी काढतात. ग्रेडिंगमध्ये प्रवेश करू न शकणारी फळे चांगली पोसल्यांनंतरही शेतकऱ्यांना प्रक्रिया करून विक्री करावी लागतात. त्यामुळे त्याच्या किंमतीवर परिणाम होतो. फक्त उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतच गरजेची आहे. याकरिता आवश्यकता आहे ती, ( Farmer Producer Organizations) एफ. पीओ आणि ( Food Safety and Standards Authority of India ) एफएसआय यांच्या मूल्यांवर आधारित त्यांची विक्री. प्रक्रिया केल्याने शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पन्न निश्चित होते.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनो अन्नदाता तर आहातच पण आता उर्जा दाताही व्हा : मंत्री नितीन गडकरी

अळीचा हल्ला थेट तुरीच्या शेंगावर, अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीचे असे करा व्यवस्थापन अन्यथा…

MSP म्हणजे काय ? कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एकच चर्चा…!

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.