AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | वाढत्या थंडीने हुडहुडी शेतकऱ्यांना का द्राक्षांना ; बागांमध्ये का पेटत आहेत शेकोट्या? वाचा सविस्तर

आता सर्वकाही सुरळीत असताना गेल्या 5 दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. निफाड तालुक्यात अधिकचा पारा घसरल्याने हुडहुडी भरत आहे. अशा परस्थितीमध्येही शेतकऱ्यांना स्वत: पेक्षा काळजी आहे ती द्राक्ष बागांची. वाढत्या थंडीमुळे फुगवणीच्या अवस्थेतील मण्यांना तडा जाण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकरी हे द्राक्ष बागेत शेकोट्या पेटवून वातावरण उबदार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Nashik | वाढत्या थंडीने हुडहुडी शेतकऱ्यांना का द्राक्षांना ; बागांमध्ये का पेटत आहेत शेकोट्या? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 2:48 PM
Share

नाशिक : द्राक्षाचे उत्पादन पदरी पडेपर्यंत शेतकऱ्यांना काय-काय करावे लागेल याचा नियम नाही. अवकाळी पावसानंतर एकरी 5 ते 7 हजार रुपये खर्ची करुन शेतकऱ्यांनी बागा जोपासल्या खऱ्या मात्र, या ( danger to vineyards) बागांवरील विघ्न काही शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. आता सर्वकाही सुरळीत असताना गेल्या 5 दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. ( Increase in cold in Nashik) निफाड तालुक्यात अधिकचा पारा घसरल्याने हुडहुडी भरत आहे. अशा परस्थितीमध्येही शेतकऱ्यांना स्वत: पेक्षा काळजी आहे ती द्राक्ष बागांची. वाढत्या थंडीमुळे फुगवणीच्या अवस्थेतील मण्यांना तडा जाण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकरी हे द्राक्ष बागेत शेकोट्या पेटवून वातावरण उबदार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वाढत्या थंडींमुळे नेमके काय होते नुकसान?

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यात थंडीची लाटच आहे. वाढलेली थंडी ही द्राक्ष बागांसाठी चांगली नसते. यामुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जातात, शिवाय वाढ खुंटते, वेलींची कार्यक्षमता मंदावते, घडकूज होते एवढेच नाही तर द्राक्षांध्ये साखर उतरण्याची प्रक्रियाच मंदावते. त्यामुळे गोडवा कमी होतो. यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आता थंडीच्या कडाक्यात शेत जवळ करुन द्राक्ष बागेच शेकोट्या पेटवत आहे. त्यामुळे उबदार वातावरण होत आहे.

द्राक्षेच्या बागेसाठी कष्ट घ्यावे तरी किती?

एकतर द्राक्षाची लागवड केली की फवारणी, मशागत यासारखी कामे सुरु होतातच. यंदा तर द्राक्षाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. अतिवृष्टी, अवकाळी आणि त्यानंतर वाढलेली रोगराई यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता वर्षभर जोपासलेली बाग सोडून द्यायची कशी म्हणून शेतकऱ्यांनी हातऊसणे घेऊन का होईना बागेची जोपासना केली आहे. हे कमी म्हणून की काय आता वाढत्या थंडीचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी वाढत्या थंडीचा विचार न करता थेट शेत जवळ करुन शेकोट्या पेटवत आहेत. विशिष्ट अंतरावर शेकोट्या पेटवल्या जात आहेत. त्यामुळे मणीगळ होणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

आंबा पिकाला मात्र, वाढत्या थंडीचा फायदा

सलग 21 दिवस जर तापमानात घट झाली आणि थंडीचा जोर वाढला तर त्याचा परिणाम थेट आंब्यावरील मोहरावर होणार आहे. किमान थंडीमुळे का होईना मोहर वाढतोय ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. साधारणत: कल्टारचा वापर केलेल्या बागांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर नैसर्गिकरीत्या डिसेंबर जानेवारीमध्ये आंब्याला मोहर येतो याशिवाय नैसर्गिक मोहरही वाढतो. दुसऱ्या टप्प्यात मोहराविणा राहिलेल्या बागा आता वाढत्या बहरतील आणि उत्पादनात वाढ होईल असा अंदाज वर्तवलेला आहे. पडलेली थंडी 15 दिवस कायम राहिली तर मोहर फुटण्यास मदतगार राहील. पोषक वातावरण राहिल्यास यंदाचा हंगाम चांगला राहील असेच संकेत आहेत.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनो पुढे धोका आहे | हरभऱ्याचे क्षेत्र वाढले पण दराचे काय, अधिकच्या दराला सरकारच्या निर्णयाचा अडसर

Nashik | 153 दिवसांचे आंदोलन अन् साध्य काय झाले आंदोलनकर्त्यांचे निलंबन, काय आहे नेमका प्रकार ?

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे | पेरणीपुर्वची बिजप्रक्रिया अन् असे करा लष्करी अळीचे व्यवस्थापन

चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.