AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देर आए… दुरुस्त आए..: ज्वारी पिकाला मिळणार गतवैभव, स्थानिक पातळीवर काय होणार प्रयत्न ? वाचा सविस्तर

ज्वारी हे केवळ रब्बी हंगामातीलच मुख्य पीक नव्हते तर शेती व्यवसयात आणि आहारामध्ये एक वेगळे स्थान होते. पण गेल्या 18 वर्षांमध्ये ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. राज्यात 35 लाख हेक्टरने घट झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील मालदांडी ज्वारीला तर भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. मात्र, आता क्षेत्रात तर घट झाली आहेच पण या ज्वारीचे वेगळेपण टिकवून ठेवण्याचे उद्दीष्ट येथील शेतकऱ्यांसमोर आहे.

देर आए... दुरुस्त आए..: ज्वारी पिकाला मिळणार गतवैभव, स्थानिक पातळीवर काय होणार प्रयत्न ? वाचा सविस्तर
ज्वारीचे क्षेत्र राज्यात घटत असले तरी प्रक्रिया उद्योग उभारुन क्षेत्र वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
| Updated on: Feb 22, 2022 | 10:18 AM
Share

अकोला : ज्वारी हे केवळ (Rabi Season) रब्बी हंगामातीलच मुख्य पीक नव्हते तर शेती व्यवसयात आणि आहारामध्ये एक वेगळे स्थान होते. पण गेल्या 18 वर्षांमध्ये (Sorghum crop) ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. राज्यात 35 लाख हेक्टरने घट झाल्याची नोंद (Agricultural Department) कृषी विभागाकडे झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील मालदांडी ज्वारीला तर भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. मात्र, आता क्षेत्रात तर घट झाली आहेच पण या ज्वारीचे वेगळेपण टिकवून ठेवण्याचे उद्दीष्ट येथील शेतकऱ्यांसमोर आहे. कारण दरम्यानच्या काळात ज्वारीवर प्रक्रिया उद्योगच उभारले गेले नाहीत. शिवाय बाजारपेठेत ज्वारीच्या मागणीत घट आणि उत्पादनावर मोठा खर्च याचा परिणाम थेट क्षेत्रावर झाला आहे. पण आता कृषी विद्यापीठांनी ज्वारीचे क्षेत्र वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एवढेच नाही तर बेकरी युनिट विद्यापीठ स्तरावर उभारले जाणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांची नेमकी भूमिका काय?

ज्वारी या मुख्य पिकापासून केवळ शेतकरीच नाही तर सर्वसामान्य नागरिकही ज्वारीचा आहार करीत नाही. त्यामुळे आता कृषी विद्यापीठांच्या स्तरावर बेकरी युनिट उभारले जाणार आहेत. यामाध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला कामही मिळणार आहे शिवाय बेकरीमध्ये ज्वारीपासून वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा मानस कृषी विद्यापीठांचा राहणार आहे. याशिवाय ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या पौष्टीक शेतीमालाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.

राज्य सरकारकडून निधीचीही पूर्तता

ज्वारी पिकाला नवसंजीवणी देण्याासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घेतला आहे. कृषी विद्यापीठाच्या स्तरावर बेकरी उभारुन या माध्यमातून ज्वारी तसेच इतर शेतीमालाचे प्रोडक्ट बनवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे या पोष्टीक शेतीमालाचे महत्व लक्षात येईल आणि मागणी वाढेल. या अनोख्या उपक्रमासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासाठी 62 लाख 50 हजार रुपायांचा निधीही मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच हे युनिट उभारले जाणार असून पुन्हा ज्वारी या मुख्य पिकाला गतवैभव मिळणार आहे.

रोजगार अन् ज्वारीला गतवैभवही

कृषी विद्यापीठांच्या ठिकाणी बेकरी उभारुन बेकरी उत्पादनावर संशोधनात्मक कार्य केले जाणार आहे. तीन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करुन दुसऱ्या टप्प्यामध्ये उत्पादनाचे ब्रॅंडिंग आणि विक्री यावर भर दिला जाणार आहे. तीन वर्षाच्या या प्रकल्पानंतर मात्र, ग्रामीण भागातील युवक, महिला तसेच बचत गटांना मार्गदर्शन करुन बेकरीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे उत्पादन ज्या ठिकाणी तेथेच उद्योग उभारल्याने सर्व सोय होणार आहे.या प्रक्रिया उद्योगामुळे हाताला काम आणि लोप पावत चालेल्या पिकांचे क्षेत्र वाढणार असा दुहेरी उद्देश असल्याचे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रक्रिया विभागाचे डॉ. संतोष दिवेकर यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

FRP : ज्याची धास्ती शेतकऱ्यांना ‘तोच’ निर्णय राज्य सरकारचा, ‘एफआरपी’ बाबत नेमके काय झाले?

बुडत्याला काडीचा आधार, आठ फळपिकांसाठी विमा योजना, राज्य सरकारचे एक पाऊल पुढे..!

‘झिरो बजेट’ शेतीचा गाजावाजा, प्रत्यक्षात क्षेत्र वाढल्यावर काय होणार परिणाम? आयसीएआरचा धक्कादायक अहवाल

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....