महासाथीनंतरच्या काळात किसानक्राफ्ट अ‍ॅप ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान

देशात सर्वत्र आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेती क्षेत्राने प्रचंड प्रमाणात रोजगार आणि उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन दिले आहे. शेतकरी आणि सरकार यांनी झोकून देऊन प्रयत्न केल्याने हरित क्रांतीनंतर भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे शक्य झाले.

महासाथीनंतरच्या काळात किसानक्राफ्ट अ‍ॅप ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान
Kisancraft aap

मुंबई : देशात सर्वत्र आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेती क्षेत्राने प्रचंड प्रमाणात रोजगार आणि उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन दिले आहे. शेतकरी आणि सरकार यांनी झोकून देऊन प्रयत्न केल्याने हरित क्रांतीनंतर भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे शक्य झाले.

बहुसंख्य शेतकऱ्यांचे उत्पन्न अतिशय कमी आहे. याचे कारण म्हणजे, त्यांच्या जमिनीचा आकार लहान आहे आणि शेत मजुरांची वानवा आहे. सरकारने वारंवार प्रयत्न करुनही प्रामुख्याने लहान शेतकऱ्यांचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेले नाही.

याचबरोबर, हवामानाची बदलती स्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष्य, पूर किंवा दुष्काळ अशा अनपेक्षित संकटांचे वाढते प्रमाण यामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. इतकचे नाही, शेतीसाठी लागणाऱ्या साधनांचा खर्च वाढतो आहे. यामध्ये प्रामुख्याने बियाणे व खते यांचा समावेश आहे. अल्पभूधारक शेतकरी हे शेती क्षेत्राचा आणि भारतातील अन्न मूल्यसाखळीचा कणा आहेत. परंतु, वरील परिस्थितीमुळे अलीकडच्या काळात या लहान शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

किसानक्राफ्टचे प्रमोटर मॅनेजिंग डायरेक्टर, रवींद्र के. अग्रवाल म्हणतात किसानक्राफ्टने एक विशेष अ‍ॅप तयार केले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना उपकरणे भाड्याने देण्याची सेवा समाविष्ट आहे. उपकरणे भाड्याने देण्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होते. उपकरणे भाड्याने दिल्याने अनेक शेतकऱ्यांना लक्षणीय उत्पन्न मिळाले आहे आणि त्यांच्यासाठी हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत ठरला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपकरणे भाड्याने देणे, हा जोडधंदा सुरू केला आहे. काही जणांनी भाड्याने देण्याच्या उद्देशाने शेतीची उपकरणे खरेदी केली आहेत.

किसानक्राफ्ट अ‍ॅप म्हणजे मोबाइल फोनद्वारे एका विशेष डिजिटल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून उपकरणे असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना ही तफावत भरून काढण्यासाठी मदत करणारी सेवा आहे. कोविडमुळे शेतमजूरांचा तुटवडा निर्माण झाल्याने उपकरणे भाड्याने द्या ही किसानक्राफ्टची सुविधा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.

किसानक्राफ्ट अ‍ॅप 11 भाषांमध्ये उपलब्ध असून, ते दाखल झाल्यापासून केवळ काही महिन्यांतच लाखो शेतकऱ्यांनी डाउनलोड केले आहे. किसानक्राफ्ट ही बियाणांपासून पिकापर्यंत सर्व सेवा देणारी कंपनी आहे. लहान शेतकऱ्यांच्या उपजीविकेमध्ये व आयुष्यामध्ये सुधारणा करणे आणि शेतीच्या सर्व पेलूंच्या बाबतीत त्यांच्या गरजा पूर्ण करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या उपकरणांमुळे शेतकऱ्यांना जमिनीची मशागत, पेरणी, पीक व्यवस्थापन, कापणी आणि कापणीनंतरची कामे अशा शेतीच्या निरनिराळ्या कामांमध्ये मोठी मदत होते.

शेतमजूरांचा तुटवडा असणे ही समस्या अनेक वर्षे भेडसावत आहे. यामुळे पूर्ण क्षमतेने शेती केली जात नाही. कोविडच्या महासाथीनंतर ही समस्या आणखी बिकट होणार आहे. किसानक्राफ्टने शेतकऱ्यांना उत्तम उपजीविका मिळावी या हेतूने किफायतशीर, योग्य व सहज उपलब्ध तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळवून द्यायचे ठरवले आहे. किसानक्राफ्ट अ‍ॅप हे या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनो चिंता सोडा, आता शेतीमालाचे बाजारभाव तुमच्या मोबाईवरच, कसे ते पहा..!

गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी जे केले, ते महाराष्ट्र सरकारला जमणार का?

अवकाळीने दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ?

Published On - 12:13 pm, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI