वीज जोडणी मिळाली नाही, मात्र 34 हजारांचं बील पोहोचलं, नांदेडच्या शेतकऱ्याला धक्का

महावितरणनं पिराजी झम्पलवाड यांना आजतागायत त्यांना विज जोडणी दिली नाही, पण बील पाठवलं आहे. Mahadiscom send electricity bill to farmer

वीज जोडणी मिळाली नाही, मात्र 34 हजारांचं बील पोहोचलं, नांदेडच्या शेतकऱ्याला धक्का
पिराजी झम्पलवाड, शेतकरी
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 10:50 AM

नांदेड: वाढीव वीज बिलांमुळे महावितरणची सातत्यानं चर्चा होत आहे. महावितरणकडून अनेकदा चुकीची वीज बिल पाठवली गेल्याचही यापूर्वी उघड झालं आहे. नांदेड जिल्हयातील एका शेतकऱ्याला वीज जोडणी नसतानाही महावितरणनं बिल पाठवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंधार तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीज पोहोचली नाही मात्र वीज बिल पोहोचल्याची चर्चा जोरदारपणे सुरु आहे. (Mahadiscom send electricity bill to farmer in Nanded who don’t have connection)

नक्की काय घडलं?

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील जंगमवाडी गावातील शेतकऱ्याला महावितरणनं वीज बिल पाठवलं आहे. लाईट शेतात पोहोचली नाही पण बिल आल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. पिराजी झम्पलवाड या शेतकऱ्याने वीज जोडणीसाठी 2014 साली अर्ज केला होता. या शेतकऱ्यांने आपल्या विहिरीसाठी कृषिपंपाचे रीतसर कोटेशन भरले होते. महावितरणनं पिराजी झम्पलवाड यांना आजतागायत त्यांना विज जोडणी दिली नाही. मात्र, 34 हजारांचे लाईट बिल या शेतकऱ्याला पाठवून महावितरण कंपनीने विक्रम प्रस्थापित केलाय.

पिराजी झम्पलवाड काय म्हणतात?

2014 मध्ये कोटेशन काढले होते. महावितरण कार्यालयात चकरा मारल्या पण वीज जोडणी मिळाली नाही. मायबाप सरकारनं पाठवलेलं वीज बिल माफ करावं, अशी मागणी पिराजी झम्पलवाड यांनी केलीय. वीज बिल माफ केलं नाही तर जगाव की मराव असा प्रश्न निर्माण झाल्याचं शेतकरी झम्पलवाड यांनी म्हटलंय.

वसईत भातगिरणी मालकाला 80 कोटींचं बील, नंतर दुरुस्ती

वसईत एका भात गिरणी मालकाला दोन महिन्यांच तब्बल 80 कोटी वीजबिल एकच खळबळ उडाली होती. एवढ्या प्रचंड रकमेचं बिल हाती येताच गिरणी मालकाला चांगलाच धक्का बसला होता. मात्र महावितरणाने आपल्या चुकीची दुरुस्ती करून गिरणीमालकाला घरपोच सुधारित बिल दिले आहे. तसेच आपली चूक सुधारली. त्याचबरोबर एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलंय. मीटर वाचन करणाऱ्या एजन्सीवर गुन्हाच दाखल करण्यात आलाय.

संबंधित बातम्या:

Mumbai : दोन महिन्याचं बिल पाहून रुग्णालयात दाखल करण्याची वेळ, तुम्हीही रक्कम पाहू हादराल

भातगिरणी मालकाला 80 कोटींचं बिल; महावितरणाकडून चुकीची दुरुस्ती

(Mahadiscom send electricity bill to farmer in Nanded who don’t have connection)

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.