Nanded : खरिपाची लगबग अन् हळदीच्या बाजारपेठेत गडबड, व्यापाऱ्यांकडून दरात दुजाभाव

मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचे अधिकचे उत्पादन घेतले जाते. शिवाय हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे मुख्य बाजारपेठ असल्याने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातून हळदीची आवक होत असते. महिन्याभरापूर्वीच हळदीला प्रती क्विटंल 8 हजार रुपये असा दर होता. शिवाय खरिपाच्या तोंडावर दरात अधिक वाढ होईल अशी अपेक्षा असतानाच हळदीच्या दरात 3 हजारांची घसरण झाली आहे.

Nanded : खरिपाची लगबग अन् हळदीच्या बाजारपेठेत गडबड, व्यापाऱ्यांकडून दरात दुजाभाव
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात घसरण झाली आहे
राजीव गिरी

| Edited By: राजेंद्र खराडे

Jun 09, 2022 | 10:51 AM

नांदेड : शेतामधील उत्पादन वाढले तरी शेतकऱ्यांचे उत्पन्न ठरते ते बाजारपेठेमध्येच. खरीप हंगामातील बी-बियाणांसाठी जिल्ह्यातील शेतकरी (Turmeric Crop) हळद विक्री करुन गरज भागवत असतानाच हळदीचे दर असे काय घसरलेत की (Kharif Season) खरिपाची पेरणी करावी की नाही असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. कारण महिन्याभरापूर्वी अधिकच्या दराने हळद अधिकच पिवळी झाली होती. पण आता व्यापाऱ्यांमुळे तीच हळद फिक्कट झाली आहे. महिन्याभरापूर्वी  (Turmeric Rate) हळदीला 8 हजार रुपये क्विंटल असा दर होता. पण गेल्या चार दिवसांपासून 8 हजारावर असलेली हळद थेट 5 हजार 500 वर येऊन ठेपली आहे.त्यामुळे खरिपाची पेरणी करावी कशी असा सवाल उपस्थित होत आहे. आवक वाढल्यामुळे ही परस्थिती ओढावली असल्याचे सांगितले जात असले तरी व्यापाऱ्यांच्या मालाला अधिकचा दर कसा असा सवाल उपस्थित होत आहे.

महिन्याभरातच तीन हजार रुपयांची घसरण

मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचे अधिकचे उत्पादन घेतले जाते. शिवाय हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे मुख्य बाजारपेठ असल्याने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातून हळदीची आवक होत असते. महिन्याभरापूर्वीच हळदीला प्रती क्विटंल 8 हजार रुपये असा दर होता. शिवाय खरिपाच्या तोंडावर दरात अधिक वाढ होईल अशी अपेक्षा असतानाच हळदीच्या दरात 3 हजारांची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर अडचण झाली असून अचानक दर घसरलेच कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शेतकरी कात्रीत सापडला असून हळदीची करावी की साठणूक हा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहेत शेतकऱ्यांचे आरोप ?

महिन्याभरापूर्वीच हळदीला 8 हजार रुपये क्विंटल असा दर होता. आता खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी हळद विक्रीवर भर दिला असतानाच दरात मोठी घसरण झाली आहे. ही व्यापाऱ्यांची खेळी असून शेतकऱ्यांना प्रती क्विंटलमागे 3 हजाराचे नुकसान सहन करावे लागत आहे. आवक वाढल्याने दर घसरले तर मग व्यापाऱ्यांच्या हळदीला 8 हजाराचा दर कसा असा सवाल उपस्थित केला जात आहे. खरिपातील बी-बियाणे आणि पेरणी खर्च हा हळदीतून निघेल अशी अपेक्षा असतानाच हळदीच्या दरात कमालीची घट झाली आहे.

हे सुद्धा वाचा

खरिपावर परिणाम, शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात

मशागतीपासून ते पेरणीपर्यंत शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये खर्च आहे. शिवाय याचे नियोजन शेतकऱ्यांनी हळदीच्या पिकावर करण्याचे ठरविले असतानाच बाजारपेठेतील दरात मोठे बदल झाले आहेत. हळदीचे दर निम्म्यानेच घटलल्याने शेतकरी हवालदिल झाला असून आता खरिपाचा खर्च भागवावा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय पीक कर्ज वाटपातही बॅंकांनी हात आखडता घेतल्याने शेतकऱ्यांकडे पुन्हा सावकाराकडून पैसे घेतल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें