कहीं खुशी-कहीं गम : थंडीमुळे पीके कोमेजली, फळबागा बहरल्या, नेमका काय परिणाम झाला? वाचा सविस्तर

कहीं खुशी-कहीं गम : थंडीमुळे पीके कोमेजली, फळबागा बहरल्या, नेमका काय परिणाम झाला? वाचा सविस्तर
वाढत्या थंडीमुळे आंब्याचा मोहर बहरला आहे तर दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढत आहे

निसर्गाच्या लहरीपणा तसा नुकसानीचाच असतो. पण फळ आणि पिकांच्या अवस्थेतील फरकामुळे सध्याचे वातावरण हे रब्बी हंगामातील पिकांसाठी नुकसानीचे ठरत आहे, तर फळबागांना बहरण्यासाठी पोषक आहे. थंडी ही तशी रब्बीच्या पिकांनाही मानवते मात्र, वाढत असलेला गारठा आणि आठ दिवस सूर्यदर्शनच नसल्याने याचा विपरीत परिणाम हा रब्बीतील सर्वच पिकांवर होत आहे.

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 18, 2022 | 12:44 PM

बीड : निसर्गाच्या लहरीपणा तसा नुकसानीचाच असतो. पण फळ आणि पिकांच्या अवस्थेतील फरकामुळे सध्याचे वातावरण हे (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांसाठी नुकसानीचे ठरत आहे, तर (mango fruit) फळबागांना बहरण्यासाठी पोषक आहे. थंडी ही तशी रब्बीच्या पिकांनाही मानवते मात्र, वाढत असलेला गारठा आणि आठ दिवस सूर्यदर्शनच नसल्याने याचा विपरीत परिणाम हा रब्बीतील सर्वच पिकांवर होत आहे. तर याच थंडीमुळे आंबा फळबागांना नवसंजीवनी मिळालेली आहे. अवकाळीने फळबागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे हंगाम लांबणीवर पडणार होता पण थंडीमुळे (Stamp on mango orchards) आंबा फळगांना मोहर वाढला असून अंतिम टप्प्यात का होईना उत्पादन वाढेल अशी अपेक्षा फळबागायत शेतकऱ्यांना आहे. तर रब्बीतील पीके जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ती खबरदारी घेणे महत्वाचे ठरणार आहे.

थंडीमुळे मोहर लगडला

मध्यंतरीच्या अवकाळी पावसामुळे आंबा बागांना लागलेला मोहर गळाला होता. आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे फळांची वाढही खुंटली होती. मात्र, थंडीमुळे का होईना मोहर वाढतोय ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. साधारणत: कल्टारचा वापर केलेल्या बागांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर नैसर्गिकरीत्या डिसेंबर जानेवारीमध्ये आंब्याला मोहर येतो याशिवाय नैसर्गिक मोहरही वाढतो. दुसऱ्या टप्प्यात मोहराविणा राहिलेल्या बागा आता वाढत्या बहरतील आणि उत्पादनात वाढ होईल असा अंदाज वर्तवलेला आहे. पोषक वातावरण राहिल्यास यंदाचा हंगाम चांगला राहील असेच संकेत आहेत.

रब्बी हंगामातील पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव

ॉफळबागांप्रमाणे थंडी ही रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसाठीही पोषकच असते. मात्र, प्रमाण वाढले की नुकसानीची ठरते. असाच काहीसा प्रकार या पिकांबाबत होत आहे. वाढलेल्या थंडीमुळे हरभरा पिकावर घाटीअळीचा तर ज्वारीवर लष्करीअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ऐन बहरात आलेल्या पीकांचे नुकसान होत आहे. यापूर्वी अवकाळी पावसामुळे पिकांची वाढ खुंटली होती तर आता वातावरणातील बदलामुळे कीडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे वातावरण कोरडे होताच शेतकऱ्यांना कीडीचे व्यवस्थापन हे करावे लागणार आहे.

आंबा उत्पादन वाढणार, शेतकऱ्यांना विश्वास

हंगामाच्या सुरवातीला अवकाळी पावसामुळे आंबा फळबागांचे नुकसान झाले असले तरी दुसऱ्या टप्प्यात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातही बदलत्या वातावरणाचा परिणाम उत्पादनावर झाला होता. मात्र, सध्याच्या थंडीमुळे झालेले नुकसान भरुन निघेल. दुसऱ्या टप्प्यातील हंगाम लांबणीवर जरी पडला तरी उत्पादनात वाढ होईल असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Crop Insurance: … अखेर कृषी विभागाचे भाकीत खरे ठरले, लातूरात असे काय घडले?

Soybean Rate: खरीप हंगामातील मुख्य पिकाच्या दरात मोठे बदल, काय आहे बाजारपेठेतले चित्र?

Positive News: अखेर शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तो दिवस उजाडला, उत्पादन वाढीसाठी पुन्हा लगबग

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें