Soybean Rate: खरीप हंगामातील मुख्य पिकाच्या दरात मोठे बदल, काय आहे बाजारपेठेतले चित्र?

सरासरीचा दर मिळत असल्याने आवकही वाढली होती. मात्र, हे वाढते दरही काही दिवसापूरतेच मर्यादीत होते असेच म्हणावे लागेल. या आठवड्यची सुरवात तर शेतकऱ्यांना धडकी बसणारीच झाली आहे. सोयाबीनच्या दरात थेट 400 रुपयांची घसरण झाली आहे.

Soybean Rate: खरीप हंगामातील मुख्य पिकाच्या दरात मोठे बदल, काय आहे बाजारपेठेतले चित्र?
सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. पुन्हा सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 11:19 AM

वाशिम : नववर्षाच्या सुरवातीपासून वाढत असलेले (Soybean crop) सोयाबीनचे दर हे 15 दिवसापुरतेच मर्यादीत राहिले असेच सध्याचे चित्र आहे. कारण गतमहिन्यात 5 हजार 800 असलेले सोयाबीन जानेवारीच्या सुरवातीला 6 हजाराचा टप्पा पार करुन 6 हजार 500 वर स्थिरावले होते. सरासरीचा दर मिळत असल्याने आवकही वाढली होती. मात्र, हे वाढते दरही काही दिवसापूरतेच मर्यादीत होते असेच म्हणावे लागेल. या आठवड्यची सुरवात तर (Farmer) शेतकऱ्यांना धडकी बसणारीच झाली आहे. (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात थेट 400 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे दर पुन्हा 6 हजारावर येऊन ठेपले आहे. सध्या शेतीकामासाठी पैशाची आवश्यकता असल्याने साठवलेल्या सोयाबीनची आवक वाढली होती. मात्र, घटत्या दरामुळे शेतकरी आता सोयाबीनची विक्री करतात का पुन्हा साठवणूकीवर भर देतात हे पहावे लागणार आहे. बाजारपेठेतले चित्र शेतकऱ्यांना अस्थिर करणारे आहे.

शेतकऱ्यांनी नेमके काय करावे?

सोयाबीनच्या दरातील चढ-उतार हा काही आता नवीन राहिलेला नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे दरात घट झाली त्याचप्रमाणे मागणी वाढली हे दरही वाढणार आहेत. यापूर्वी तर सोयाबीन हे 4 हजार 800 पर्यंत गेले होते. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला होता. सध्याही तशीच भूमिका घ्यावी लागणार आहे. बाजारपेठेतले दर वाढले की मात्र, टप्प्याटप्प्याने विक्री करणेच योग्य राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजारपेठेत मागणी रोडावल्याने दरात घट झाली आहे पण हे कायमचे चित्र नाही. गेल्या 4 महिन्यात अनेक वेळा दरामध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल झाला आहे. त्याच प्रमाणे सध्याचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी पॅनिक न होता योग्य वेळ पाहूनच सोयाबीनची विक्री करणे महत्वाचे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलेले आहे.

वाशिम जिल्ह्यातील सोयाबीनचे दर

गत आठवड्यापर्यंत सोयाबीन दरात तेजी कायम होती. जवळपास जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत सोयाबीनचे दर 6 हजार 500 रुपये प्रती क्विंटलपर्यंत होते. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली. वाशिममध्ये सोमवारी सोयाबीनला कमाल 5 हजार 800 रुपये क्विंटल, रिसोडमध्ये 6 हजार 150, तर कारंजात 6 हजार 175 रुपये प्रती क्विंटलचे दर मिळाले. अर्थात प्रति क्विंटल मागील दोन दिवसात 300 ते 400 रुपयांनी दर घसरले आहेत.

घटत्या दराचा आवकवर परिणाम

बाजारपेठत शेतीमालाचे दर घटले की, त्याचा आवकवर परिणाम हा होतोच. त्याचप्रमाणे सोयाबीनच्या बाबतीमध्ये झाले आहे. शेतकऱ्यांसाठी हे नवीन नाही. अपेक्षित दर मिळवण्यासाठी या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री आणि साठवणूक ही दरावरच ठरवलेली आहे. सध्याही तशीच परस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, भविष्यातील उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन पाहूनच शेतकऱ्यांनी निर्णय घेणे गरजेचे आहे. मात्र, घटलेल्या दरामुळे मंगळारी आवक कमी झाली होती.

संबंधित बातम्या :

Positive News: अखेर शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तो दिवस उजाडला, उत्पादन वाढीसाठी पुन्हा लगबग

Millet Crop : बाजरी उत्पादन वाढीची सोपी पध्दत, पेरणीपासून काढणीपर्यंतचे असे करा नियोजन

Sunflower: फरदड कापसाला काय आहे पर्याय? मशागत कमी अन् उत्पादन अधिक, वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.