उभारणीपासून 14 वेळा भरले मांजरा धरण, काय होता उद्देश आणि सध्याचे वास्तव

मांजरा धरण आणि लातूर यासंबंधी काही गोष्टी ह्या खूप रंजक आहेत. तसे पाहिला गेले तर उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्याच्या हद्दीवर हे धरण उभारले गेले आहे. यामध्ये उस्माबाद आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ह्या अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वाधिक फायदा हा लातूर जिल्ह्याला होत आहे. 1980-81 मध्ये या धरणाची उभारणी करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत हे धरण केवळ 14 वेळेस भरलेले आहे. 2016 साली तर आवर्षनाची स्थिती ओढावल्याने हे धरण कोरडेठाक पडले होते. याच दरम्यान लातूरला चक्क रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ही प्रशासनावर ओढावली होती.

उभारणीपासून 14 वेळा भरले मांजरा धरण, काय होता उद्देश आणि सध्याचे वास्तव
मांजरा धरण
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 10:59 AM

लातूर : मांजरा धरण (Manjara Dam) आणि लातूर यासंबंधी काही गोष्टी ह्या खूप रंजक आहेत. तसे पाहिला गेले तर (Beed, Osmanabd, latur) उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्याच्या हद्दीवर हे धरण उभारले गेले आहे. यामध्ये उस्माबाद आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ह्या अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वाधिक फायदा हा लातूर जिल्ह्याला होत आहे. 1980-81 मध्ये या धरणाची उभारणी करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत हे धरण केवळ 14 वेळेस भरलेले आहे. 2016 साली तर आवर्षनाची स्थिती ओढावल्याने हे धरण कोरडेठाक पडले होते. याच दरम्यान लातूरला चक्क रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ही प्रशासनावर ओढावली होती.

मांजरा हे तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेले धरण आहे. या भागात पाण्याचे दुर्भीक्ष असल्याने धरणातील पाण्याचा उपयोग शेतीसिंनासाठी व्हावा हा उद्देश ठेवण्यात आला होता. मात्र, दिवसेंदिवस या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. त्यानुसार गेल्या अनेक वर्षापासून लातूर शहर, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, धारुर आणि केज तर उस्मानाबाद जिल्हातील कळंब शहराला पाणीपुरवठा हा धरणातून केला जात आहे.

धरणाच्या उभारणीनंतर प्रथम 1988-89 मध्ये हे धरण भरलेले होते. त्या दरम्यानच शेतीसिंचनासाठी याचा उपयोग झाला होता. मात्र, आवर्षनाची परस्थिती ओढावली की धरणातील जलसाठ्याचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. लातूर हद्दीत हे धरण नसले तरी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने याच धरणातून पाणीपुरवठा होत आहे. एवढेच नाही तर शहरात वाढत असलेली एमआयडीसी देखील याच पाण्यावर अवलंबून आहे.

धरण बीड हद्दीत आणि पाणी लातूरला यामुळे केज तालुक्यातील शेतकऱ्यांकडून विरोधही झाला होता. मात्र, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिल्याने शेतीसाठी उभारण्यात आलेल्या धरणाचा आता त्या परस्थितीनुसार निर्णय घेतला जात आहे. असे असले तरी आतापर्यंत हे धरण 14 वेळा हे धरण भरले आहे. यापुर्वी 2017 साली हे धरण भरले होते. यंदा मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

त्यामुळे मराठवाड्यातील आठही प्रमुख धरणे ही भरलेल्या अवस्थेत आहेत. मंगळवारी मांजरा धरण हे ओव्हरफ्लो झाले असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा हा सुरु असून पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी सहा दरवाजे हे उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून 149.80 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मांजरा धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे. सध्या धरणातून 149.80 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शिवाय आजही पावसाचा अंदाड हा व्यक्त करण्यात आला असल्याने लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव, टाकळगाव, सारसा, वांजरखेडा, बोडका, पोहरेगाव, नागझरी, जेवळी, टाकळी या मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी सांगितले आहे.

ऊसाच्या क्षेत्रात होणार वाढ, शेतकऱ्यांना दिलासा

मांजरा नदीलगतचा भाग हा ग्रीनबेल्ट म्हणून ओळखला जात आहे. यंदा धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने शेती सिंचनासाठीही पाणीपुरवठा होणार त्यामुळे या भागात ऊसाचे क्षेत्र वाढणार असा अंदाज व्यक्त होत आहे. शिवाय जिल्ह्यात साखर कारखान्यांचे मोठे जाळे असल्याने शेतकऱ्यांना इतर गोष्टींचा सामना हा करावा लागत नाही. (Manjara dam filled to full capacity, dam filled 14 times so far)

संबंधित बातम्या :

….म्हणून राज्य सरकारला ई-पीक पाहणीची गरज भासली, पडद्यामागची गोष्ट

दोन दिवस पावसाचेच, काढलेल्या पिकांची सुरक्षतता महत्वाची

मुदत अंतिम टप्प्यात तरीही ई-पीक पाहणीचा सावळा गोंधळ सुरुच

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.