AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maval Tomato Farming : पाऊण एकर शेतातून पिकलं सोनं; गावरान टोमॅटोने मावळमधील शेतकरी मालामाल

Maval Tomato Farming : मावळ तालुक्यात सध्या रब्बी पिके आणि भाजीपाला ची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. तालुक्यातील शेतकर्‍याने गावरान टोमॅटोच्या उत्पादनातून मोठी कमाई केली आहे. खर्च कमी आल्याने त्याला फायदा झाला आहे.

Maval Tomato Farming : पाऊण एकर शेतातून पिकलं सोनं; गावरान टोमॅटोने मावळमधील शेतकरी मालामाल
टोमॅटो उत्पादन भरघोस, शेतकऱ्याला झाला फायदा
| Updated on: Jan 12, 2025 | 1:30 PM
Share

मावळ तालुक्यात सध्या रब्बी पिके आणि भाजीपाला ची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. तालुक्यातील शेतकर्‍याने गावरान टोमॅटोच्या उत्पादनातून मोठी कमाई केली आहे. खर्च कमी आल्याने त्याला फायदा झाला आहे. कसा वाचवला या शेतकर्‍याने अतिरिक्त खर्च? टोमॅटोच्या अधिक उत्पादनासाठी त्याने काय केलं हे याची शेतकर्‍यांना उत्सुकता आहे.

मावळमध्ये रब्बी पिकांना मागणी

मावळ तालुक्यात सध्या रब्बी पिके आणि भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. शेतातील भात काढून झाल्यावर अनेक शेतकरी आता भाजी लागवड करू लागले आहेत. त्यातच या शेतकऱ्यांने एक आदर्श घालून दिला आहे. त्याने अवघ्या पाऊण एकरात गावरान टोमॅटोचे चांगले उत्पादन घेतले. पाऊण एकर मध्ये टोमॅटो ची लागवड करून शेतकऱ्याने लाखो रुपये कमावले.

श्रेयाने केले लखपती

पारंपारिक शेतीतून फारसे चांगले उत्पादन मिळत नसल्याची ओरड नेहमीच होते. तर काही शेतकरी पारंपारिक शेती व्यतिरिक्त काही हटके प्रयोग सुद्धा करतात. मावळ मधील शेतकरी सुनील किरवे यांनी केवळ पाऊण एकर क्षेत्रात श्रेया जातीच्या गावरान टोमॅटोची लागवड केली. यातून आता त्यांना लाखो रुपयांचा नफा होऊ लागला आहे. केवळ 50 ते 60 हजार रुपये खर्च त्यांना या टोमॅटोची लागवड करताना आला. घरच्या घरी टोमॅटो ची पिके तयार करून त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात ही पिके लावली आहे.

सेंद्रिय खतावर दिला जोर

राज्यात अनेक शेतकरी टोमॅटो उत्पादक आहे. पण काही भागात अधिक उत्पादन झाल्याने भाव घसरतो. तर खते आणि फवारणीचा खर्चही अधिक होतो. त्यामुळे उत्पादनाचा खर्च आणि विक्रीचा ताळमेळ बसत नाही. सुनील किरवे यांनी त्यासाठी अजून एक युक्ती वापरली. संपूर्ण सेंद्रिय खताचा वापर करून टोमॅटोची शेती किरवे यांनी फुलवली आहे. बाजारात या गावरान टोमॅटोना साध्या टोमॅटो पेक्षा 5 ते 10 टक्के भाव जास्त मिळत आहे. शिवाय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात या टोमॅटोची मागणी आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार