अवकाळीची मदत लवकरच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्वाचे आवाहन, पालन न केल्यास मदतीला मुकावे लागणार

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तहसीलदार, कृषी अधिकारी आणि सर्कल यांच्या सोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये या सूचना दिल्या आहे.

अवकाळीची मदत लवकरच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्वाचे आवाहन, पालन न केल्यास मदतीला मुकावे लागणार
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 5:24 PM

नाशिक : सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या काळात अतिवृष्टी झाली होती. संततधार सुरूच असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल पूर्णतः वाहून गेला होता. काहींचा शेतमाल शेतातच सडून गेला होता. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली होती. त्यानुसार शासनाने पंचनामे केले होते. त्याची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार लिंक नसल्याने खात्यावर ऑनलाइन पैसे जमा होणार नाहीये. त्यामुळे त्याची एकदा खात्री करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

खरंतर शासनाच्या वतीने सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांचे खाते आधारशी लिंक नाही अशा राष्ट्रीयकृत खात्यांवर पैसे जमा होणार नाही.

त्या करिता संबंधित शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन याबाबत तपासणी करून घ्यावे, आधार लिंक नसेल तर ते तात्काळ करून घ्यावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. खरंतर शेतकऱ्यांना सहा महिन्यानंतर ही मदत मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तहसीलदार, कृषी अधिकारी आणि सर्कल यांच्या सोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये या सूचना दिल्या आहे. यामध्ये कृषी अधिक्षक विवेक सोनवणे आणि उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांनी याबाबत स्थानिक पातळीवर सूचना पोहचविल्या आहेत.

20 एप्रिल पर्यन्त नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे ही तात्काळ सादर करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्याबाबतचे परिपत्रक भरून ते देखील 20 एप्रिल पर्यन्त जमा करण्यास सांगितल्याने त्या मदतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या आहे.

आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे एप्रिल 2023 ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनीही बँकेशी आधार लिंक आहे की याचीही खात्री करण्याचे आवाहन केले आहे. त्यामध्ये ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यासह कृषी सहाय्यक यांनी पंचनामे करतांना माहिती घ्यावी असेही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे.

त्यामुळे मदत कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावर जमा होईल, त्याकरिता आधार लिंक नाही म्हणून तुम्हाला मदतीपासून वंचित राहावे लागणार नाही याची काळजी घ्या. आणि तात्काळ बँक खाते आणि आधार लिंक आहे की याची खात्री करून घ्या असे आवाहन केले जात आहे.

Non Stop LIVE Update
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.