Cotton Seed: कृषी विभागाच्या निर्णयाविरोधात आता खत-बियाणे कंपन्या, निर्णय एक समस्या अनेक..!

खरीप हंगामातील कापूस वगळता इतर पिकांच्या बियाणांबाबत कृषी विभाग आणि प्रशासनच हलचाल करीत आहे. तर दुसरी विक्रेत्ये कापूस बियाणांची विक्री करण्यास त्यांना परवानगी नाही. कृषी विभागाने हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. हंगामपूर्वीच कापसाची लागवड केली की, बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढतोच. शिवाय त्याचा इतर पिकांवरही परिणाम होतो म्हणून सावध पवित्रा म्हणून कृषी विभागाने 1 जून नंतर बियाणे विक्रीला परवानगी दिली आहे.

Cotton Seed: कृषी विभागाच्या निर्णयाविरोधात आता खत-बियाणे कंपन्या, निर्णय एक समस्या अनेक..!
कापूस पीक
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 3:01 PM

नागपूर : कृषी विभागाने (Cotton Seed) कापूस बियाणांबाबत असा काय निर्णय घेतला की त्याचे पडसाद आता (Kharif Season) खरीप हंगाम तोंडावर असतानाही पाहवयास मिळत आहेत. यातच (Monsoon Rain) मान्सूनचे आगमन यंदा लवकर असल्याने ते एक कारण खत-बियाणे कंपन्यांना मिळाले असून आता महाराष्ट्र फर्टिलायझर्स सीडस्, डिलर्स यांनी केली आहे. त्यामुळे कृषी विभागाने ठरविल्याप्रमाणेच कापूस बियाणांची विक्री होणार की या संघटनेने केलेल्या विरोधामुळे निर्णयात बदल होणार हे पहावे लागणार आहेत. कृषी विभागाने 1 जून नंतर कापूस बियाणे विक्रीला परवानगी दिली आहे. यापूर्वीच पाऊस झाला तर शेतकरी इतर राज्यातून बियाणांची खरेदी करतील त्यामुळे राज्यातही 1 जून पुर्वीच कापूस बियाणे विक्रीची परवानगी देण्याची मागणी होत आहे.

1 जून रोजीच परवानगी का?

खरीप हंगामातील कापूस वगळता इतर पिकांच्या बियाणांबाबत कृषी विभाग आणि प्रशासनच हलचाल करीत आहे. तर दुसरी विक्रेत्ये कापूस बियाणांची विक्री करण्यास त्यांना परवानगी नाही. कृषी विभागाने हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. हंगामपूर्वीच कापसाची लागवड केली की, बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढतोच. शिवाय त्याचा इतर पिकांवरही परिणाम होतो म्हणून सावध पवित्रा म्हणून कृषी विभागाने 1 जून नंतर बियाणे विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, वेळेपूर्वीच पाऊस येत असल्याने बियाणे खरेदीला परवानगी मिळावी म्हणून खत-उत्पादक आणि बियाणे उत्पादक कंपन्यांनी केली आहे.

खत, बियाणे संघटनेची मागणी काय?

कृषी विभागाने जरी 1 जूनपासून कापूस बियाणे विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयानंतर जर पाऊस हा वेळेपूर्वी दाखल झाला तर पेरणी कामासाठी शेतकरी बियाणे हे परराज्यातून आणतील. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान तर होणारच आहे. शिवाय बियाणांची शाश्वती काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वेळेत बियाणे मिळाले नाहीतर परराज्यातून शेतकरी बियाणे आणतील. त्यामुळे येथील विक्रेत्यांचे काय महत्व असा सवाल उपस्थित होते. कृषी विभागाने शेतकरी आणि खत बियाणे विक्रेत्ये यांचा विचार करुन बियाणे विक्रीला परवानगी देणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

बियाणे विक्रीची नियमावली

हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत 1 ते 10 मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून 15 मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकऱ्यांना 1 जून नंतर विक्री केले जाणार आहे.

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.