AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goat Bank : महाराष्ट्रातील महिलांना’गोट बॅंके’चा आधार, काय आहे नेमकी योजना?

बॅंक म्हणले की पैशाची देवाण-घेवाण असेच चित्र उभा राहते पण महामंडळाची ही बॅंक वेगळी आहे. या बॅंकेच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांमध्ये 1 गर्भार शेळी दिली जाते. पहिल्या येतातील 3 पिल्ले ही गोट बॅंकेला द्यावी लागणार आहेत. त्यानंतर मात्र शेळी आणि उत्पन्नावर पूर्णपणे महिलेचा अधिकार राहणार आहे.

Goat Bank : महाराष्ट्रातील महिलांना'गोट बॅंके'चा आधार, काय आहे नेमकी योजना?
'गोट बॅंके' च्या माध्यमातून शेळी पालनाची महिला शेतकऱ्यांना संधी
| Updated on: Jun 21, 2022 | 9:29 AM
Share

पालघर : यंदाचे वर्ष हे महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी असल्याची घोषणा यापूर्वीच (State Government) राज्य सरकराने केली आहे. त्याअनुशंगाने आता स्थानिक पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. (Development Corporation) महिला आर्थिक विकास महामंडळाने गोट बॅंक हा उपक्रम हाती घेतला आहे. (Goat) शेळीला गरिबाची गाय म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गरीब शेतकरी महिलांसाठी ही योजना संजीवनी ठरत आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते. आता महिला शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या मंडळाने पालघर जिल्ह्यात गोट बॅंक सुरु केली आहे. महिला बचत गटांना यामुळे आर्थिक उभारी मिळणार असल्याचाव विश्वास व्यक्त केला जात आहे.

गोट बॅंकेचे नेमके स्वरुप कसे?

बॅंक म्हणले की पैशाची देवाण-घेवाण असेच चित्र उभा राहते पण महामंडळाची ही बॅंक वेगळी आहे. या बॅंकेच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांमध्ये 1 गर्भार शेळी दिली जाते. पहिल्या येतातील 3 पिल्ले ही गोट बॅंकेला द्यावी लागणार आहेत. त्यानंतर मात्र शेळी आणि उत्पन्नावर पूर्णपणे महिलेचा अधिकार राहणार आहे. म्हणजेच शेळी पालनाच्या व्यवसयाची सुरवातच या बॅंकेच्या माध्यमातून करुन दिली जात आहे. एवढेच नाही तर शेळीच्या विम्यासह लसीकरणाचा खर्च देखील गोट बॅंकेवर राहणार आहे. त्यामुळे शेकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्वाची ठरत आहे.

गरीब महिलांना बॅंकेचा ‘आधार’

अति गरीब महिलांच्या सक्षमीकरणाचा उद्देश समोर ठेऊन ही योजना सुरु करण्यात आली आहे. या शेळीपालनातून मिळणाऱ्या उत्पादनातून चलन तर फिरतेच पण महिलांना आपला एक व्यवसाय उभा करता येतो. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे व्यवस्थापन, महिलांच्या एकंदर क्षमतांचे संवर्धन तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, उद्योजकीय विकास साधणे असा महिला विकास महामंडळाचा उद्देश असून गोट बॅंकेच्या माध्यमातून अनेक गरीब महिलांच्या हाताला काम मिळाले आहे.

पालघरच्या वाडामध्ये उभारली गेलीय बॅंक

गोट बॅंकेचा विस्तार आता राज्यभर होत आहे. यापूर्वी अकोला जिल्ह्यात या बॅंकेची स्थापना झाली होती. गरीब शेतकरी महिलांच्या हाताला काम मिळावे हा त्यामागचा हेतू असून यामधील व्यवहारातही पारदर्शकता आहे. जिल्ह्यातील वाडा येथे ह्या बॅंकेची उभारणी झाली आहे. यावेळी आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जि.प.सदस्या भक्ती वलटे, सागर ठाकरे, अमोल पाटील हे उपस्थित होते.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....