Grape : शेतकऱ्यांची मंदीत संधी, संकटावर मात करुन अखेर द्राक्षांची निर्यात

यंदा उत्पादनावरील खर्च तर सोडाच पण द्राक्ष निर्यात करण्याच्या दर्जेचे उत्पादन होईल का नाही अशी परस्थिती निर्माण झाली होती. अवकाळी पाऊस, निसर्गाचा लहरीपणा आणि त्यामुळे वाढलेला कीड-रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे द्राक्ष निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, शेतकऱ्यांनी संकटावर मात करीत द्राक्ष निर्यातीचा मार्ग अधिक सुखकर केला आहे.

Grape : शेतकऱ्यांची मंदीत संधी, संकटावर मात करुन अखेर द्राक्षांची निर्यात
द्राक्षाची निर्यात सुरु आहे पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 4:34 AM

सांगली : यंदा उत्पादनावरील खर्च तर सोडाच पण (Grape Export) द्राक्ष निर्यात करण्याच्या दर्जेचे उत्पादन होईल का नाही अशी परस्थिती निर्माण झाली होती. (Untimely Rain) अवकाळी पाऊस, निसर्गाचा लहरीपणा आणि त्यामुळे वाढलेला कीड-रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे द्राक्ष निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, शेतकऱ्यांनी संकटावर मात करीत द्राक्ष निर्यातीचा मार्ग अधिक सुखकर केला आहे. उलट गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यातीसाठी (Registration of farmers) शेतकऱ्यांची नोंदणी वाढली आहे. शिवाय निर्यातीचा श्रीगणेशा झाला असून यामधून का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यंदा निर्यातीची गती वाढली असून युरोप, आखाती देशांसह इतर भागांमध्ये 115 कंटनेरने द्राक्षांची निर्यात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 1 हजार 827 टन द्राक्षांची निर्यात झाली असून यामध्ये वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गतवर्षीच्या तुलनेत नोंदणी संख्या वाढली

द्राक्षांची निर्यात करण्यासाठी आगोदर कृषी विभागाकडे नोंदणी करावी लागते. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा द्राक्ष बागांवर झाला होता. त्यामुळे उत्पादनात तर घट झाली आहे. त्यामुळे निर्यातीवरही परिणाम ग्राह्य धरला जात होता. मात्र, प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकष्टा करीत निर्याती दर्जाचे द्राक्ष तयार केले. गतवर्षी निर्यातीसाठी 4 हजार 283 शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती तर यंदा यामध्ये दीड हजार शेतकऱ्यांची वाढ झाली असून शेतकऱ्यांचा आकडा 5 हजार 808 एवढी झाली आहे. त्यामुळे उत्पादन घटले तरी आता निर्यातीमधून अधिकचे उत्पन्न मिळेल असा आशावाद आहे.

पहिल्याच टप्प्यात 1 हजार 827 टनाची निर्यात

शेतीमालाची निर्यात करण्यासाठी त्या दर्जाचा माल असणे गरजेचे आहे. यंदा तर वातावरणातील बदलामुळे द्राक्षांची निर्यात होते की, नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. असे असतानाही त्यायोग्य द्राक्ष तयार करुन अखेर निर्यातीला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात 1 हजार 827 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. पंधरा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात सुरू झाली आहे. या दरम्यान, 36 कंटनेर द्राक्ष सातासुद्रापार गेली होती. युरोप, आखाती देशांसह अन्य देशातून द्राक्षाची मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी द्राक्षाची निर्यात करण्याचे नियोजन सुरू केले आहे.

उत्पादन घटले तरी शेतकऱ्यांना दिलासा

वातावरणातील बदलामुळे यंदा द्राक्ष उत्पादनात घट झाली होती. अंतिम टप्प्यातील वाढत्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे गेले होते. त्यामुळे उत्पादनावरील खर्चही पदरी पडतो की नाही अशी अवस्था झाली होती. शिवाय निर्यातीवरही परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, शेतकऱ्यांनी अविरत प्रयत्न केल्याने निर्यातीला सुरवात झाली आहे. सध्याची परस्थिती पाहिली तर भविष्यात द्राक्षांची निर्यात मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season: आपला शेतकरीही आता कमर्शियल, पारंपरिक पिकांना डावलून कडधान्यावरच भर

Untimely Rain : अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, तरीही उत्पादन वाढीसाठी कृषितज्ञांचा काय आहे सल्ला ?

अवकाळीच्या नुकसानी खुणा : निसर्गानं सर्वकाही हिरावलं आता शेतकऱ्याचं सरकारकडे हे साकडं!

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.