द्राक्षाचे दर ठरले अन् मोडले, आता पपईच्या निर्णयाचे काय होणार? व्यापाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष..!

राजेंद्र खराडे

राजेंद्र खराडे |

Updated on: Jan 30, 2022 | 10:58 AM

आता हीच पध्दत पपईसाठीही लागू केली जात आहे. ज्या भागात अधिकचे उत्पादन आहे त्या भागातील शेतकरी असे निर्णय घेत आहेत. द्राक्षासाठी नाशिक, सांगली आणि सोलापूर विभागात दरनिश्चित झाले असून आता नंदुरबार येथे पपईबाबत हा निर्णय झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पपईच्या दराच्या तिढा कायम होता.

द्राक्षाचे दर ठरले अन् मोडले, आता पपईच्या निर्णयाचे काय होणार? व्यापाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष..!
पपईचे संग्रहीत छायाचित्र

नंदुरबार : वातावरणातील बदल, उत्पादनात घट आणि बाजारपेठेतील दर यामुळे शेतकऱ्यांचे नेहमीच नुकसान होत आहे. त्यामुळे आता विक्री अगोदर दर हे निश्चित केले जात आहेत. याची सुरवात (Grape) द्राक्ष उत्पादनापासून झाली असून जिल्हा उत्पादक संघांनी स्थानिक बाजारपेठेत आणि निर्यात होणारे द्राक्ष याचे दर ठरवलेले आहेत. आता हीच पध्दत (Papaya Rate) पपईसाठीही लागू केली जात आहे. ज्या भागात अधिकचे उत्पादन आहे त्या भागातील शेतकरी असे निर्णय घेत आहेत. द्राक्षासाठी नाशिक, सांगली आणि सोलापूर विभागात दरनिश्चित झाले असून आता (Nandurbar) नंदुरबार येथे पपईबाबत हा निर्णय झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पपईच्या दराच्या तिढा कायम होता. याबाबत शहदा येथे बैठक पार पडली असून या बैठकीत एक पपई 7 रुपये 5 पैसेला शिवार खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तर दिलासा मिळणार आहे पण व्यापारी काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.

यामुळे घ्यावा लागला निर्णय..

पपई पीक बहरात असतानाच वातावरणातील बदल आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांनी पपई काढण्यावरच भर दिला होता. शिवाय काही शेतकऱ्यांनी चांगले व्यवस्थापन केल्यामुळे चांगल्या दर्जाचाही माल आहे. पण उत्तर भारतामधील वाढती थंडी यामुळे मागणीत घट अशी कारणे सांगून व्यापारी कवडीमोल दरात पपईची खरेदी करीत होते. गेल्या काही दिवसांपासून असेच प्रकार सुरु राहिल्याने उत्पादनावर झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नव्हता. त्यामुळे शहदा येथे बाजार समिती प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 7 रुपये 5 पैशानेच विक्री करण्याचा निर्णय एकमुखाने झाला आहे.

शहादा तालुक्यात सर्वाधिक उत्पादन

नंदुरबार जिल्ह्यात 4 हजार 500 हेक्टरावर पपई लागवड केली जाते. पोषक वातावणामुळे उत्पादनात वाढही होत आहे. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना पपई उत्पादक शेतकऱ्यांनाही करावा लागत आहे. एकट्या शहदा तालुक्यात 4 हजार हेक्टरावर पपईची लागवड केली जाते. त्यामुळे घटलेल्या दराचा सर्वाधिक फटका येथील शेतकऱ्यांनाच बसलेला आहे. आता बैठकीत निर्णय तर झालेला आहे पण व्यापारी ठरलेल्या दराने खरेदी करतात का नाही हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Grape : ज्याची भीती होती तेच झाले, आता द्राक्ष उत्पादकांसमोर एकच पर्याय, काय स्थिती आहे द्राक्षांच्या पंढरीत, वाचा सविस्तर

Positive News: खरिपात झालेले नुकसान उन्हाळी हंगामातून भरुन निघणार..! सोयाबीनला फलधारणा

सोलापूर बाजार समितीत 61 वर्षातील कांद्याची विक्रमी आवक, 1200 गाड्यांची आवक, 16 कोटींची उलाढाल

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI